मिलो न तुम तो..

Submitted by पाचपाटील on 21 April, 2022 - 11:11

मिलो न तुम तो हम घबराये
मिलो तो आँख चुराये
हमें क्या हो गया है...!

तर कधीकधी हे असं होतंच ना म्हणजे..!
म्हणजे समजा ती त्याला आवडत असते.
आणि म्हणूनच तिला ते जाणवू न देण्याची त्याची
कोशिश चाललेली काही काळापासून..!

मग समजा ती दिसण्याची शक्यता असेल,
अशा जागांवर एक मूर्ख चक्कर मारून येणं वगैरे..
उदाहरणार्थ स्वतःपासून दूर बेखबर कॉरिडॉरच्या
शेवटी...
कधी जिन्यांवर अधेमधे दीदार ए यार..
कधी कॅन्टीनच्या टोकाला एकटीच सितमगार..
किंवा कधी संध्याकाळी पार्कींगमध्ये एक ॲक्टीव्हा
वाऱ्यावर सवार होत असलेली वगैरे...

किंवा मग तिला दिसेल अशा ठिकाणी
स्वतःत मग्न असल्यासारखा तो उगीच चुळबुळत..!
समजा कधी ती दुरून येताना दिसते.
त्याला ते कळतं आपोआपच.
आधी भवताल बदलताना दिसतो.
मग त्याच्या सगळ्या देहयष्टीत झिरपायला लागतात
आमूलाग्र बदल.
मग आता समजा तो लगेच मोबाईलमध्ये गुंग
असल्याचा बेमालूम बहाणा करतोय.
तिच्याकडे साफ दुर्लक्ष वगैरे..
किंवा कॉरिडॉरमध्ये जो दिसेल त्याच्याशी बोलणं
सुरू करतोय...
ते शक्य नसेल तर उगीच खिडकीतून आभाळ
बघत असल्याचा कांगावा..!
किंवा काहीतरी कामानिमित्त तिथून चाललेलो
आहोत, असं नेपथ्य उभं करतोय..!
आणि त्याच्या शेजारून ती हात पाठीशी गुंफून
सळसळत निघून जातेय आणि तो तिची दखलही
नाहीये घेत..!
'मी त्या गावचाच नाही' अशी वदंता पसरवतोय..!

तिच्या लयबध्द खणकावत जाण्यामुळे,
त्याच्या आत जो बहर आलेला असतो,
जी पालवी फुटलेली असते,
ती तो उघडकीस नाही येऊ देत...!
ती सगळी थडथड, ते सगळं वैपुल्य, तो सगळा
तजेला मोठ्या कष्टाने लपवतो..!
त्या प्रयत्नात क्षत होतो..!
निम्मा अर्धा शाबूत उरतो..!
आणि उपयोग तर काहीच होत नाहीये..!
कारण संपूर्ण मनोविश्व बेहाल करणारी ती चाल..!

ओ भोले साथिया देखी जो शोखी तेरे प्यार की
ओ सोहने जोगिया रंग ले हमें भी इसी रंग में ओय होय

आणि त्यात आता हे आणखी एक नवीनच..!
उदाहरणार्थ हा नवीन डिझाइनचा शुभ्र कुर्ता.
त्यावर रंगांची किरमिजी उधळण.
त्यातलं गुडुप्प लोभसपण.
नखशिखांत नैसर्गिक गव्हाळ.
चोवीस कॅरेटचं सोनं हेच.
अप्राप्य. अलिप्त. सुशुप्त.

कधी कधी फुटकळ यश‌ मिळतं.
तिचं इवलंसं बोलणं..! चांदण चुऱ्यासारखं दुर्मिळ..!
आवाजाचा पोत..! तलम मंजुळ फैलाव..!
थुईथुई संगीत.
ओठांचा लय-विलय..
लालबुंद रवाळ हसू..
मऊ मऊ मंद मंद दाणेदार उजेड..

खैरात...!!

अशा वेळी समोरचं जग वितळायला लागतं
आणि तो जागच्या जागी झंकारत उभा..!

किंवा कधी त्याची घायाळ विद्ध नजर..!
परंतु नजरेचा काय भरोसा..! ती पैदाईशी शरारती..!
कधी दगा देईल, खात्री नाही.‌
म्हणून पायांकडे बघत बोललेलं बरं..!
काटकोळी लांबसडक बोटं..! लालबुंद स्वप्नचित्र..!
तिथूनच भासांचे मंथर प्रदेश सुरू होतात..!
मामुली स्पर्शाची गफलत..!
रक्तचंदनी चकवा..!
चोरट्या आनंदाचं किंचित सुख...!

मग कधीतरी तिचं संदली हसू थांबतं
आणि अचूक त्याच क्षणी दिवस मावळतो..!

देवा..!! काय छळवाद आहे..!

ओ भोले जोगिया देखी जो शोखी तेरे प्यार की....

तुझ्या निष्ठूरपणाला अंत नाही.
माझ्या बालिशपणाला धरबंद नाही.
आणि आता अजून कोणत्या नवीन अदा
दाखवणारेस बाई..!!
आता अजून काय बघायचं राहिलंय?
अजून काय काय हाल सहन करावे लागणारेत..!
ओळीने चाल करून येतायत बिनझोपेच्या जालीम
रात्री..!
तू फेकलेल्या प्रश्नचिन्हांच्या पावसात घेरलेला मी..!
श्वासांवरही अधिकार चालवतेस.!
प्राण संकटात..!
इकडे भुरूभुरू सिग्रेटींचे ढग.!
आणि तुझे जलवे तर काही थांबतच नाहीयेत..!

सोसा..! सोसण्यासारखं तसं बरंच असतं,
पण हे सोसत नाही..!
तरीही सोसा..!!
काय करणार..! न सोसून सांगता कुणाला ??
आणि सांगणार तरी काय??
आणि समजणार कोणाला ??

माझं काही तुझ्यासारखं नाही..!
तुझ्या हाताला गाभा सहज लागतो..!
आणि आमचा हा जन्मजात शुष्क सांगाडा
सडाफटींग..!
सांग, ओल कशी शोधावी?

बाकी तुलाही हे अगदीच समजत नाही,
असं नाहीये..
तू काही अगदीच भाबडी वगैरे आहेस,
असंही नाहीये..

उलट, एक डोळस आंधळेपण कवच म्हणून
स्वीकारलेलं..!
एक नंबरची दुष्ट; की सगळं समजून उमजून
ढळढळीत लपवाछपवी..!
आणि पुन्हा ते प्रियंका गांधींसारखं तेज-तर्रार नाक
नकारार्थी हलवत नंतर म्हणावं की,
'अरेच्चा !! हे सगळं कधी झालं!!
मी बेखबर..! मला यातलं काहीच माहिती
नव्हतं अरे..!'

तुम्हीं को दिल का राज़ बतायें
तुम्हीं से राज़ छुपायें
हमें क्या हो गया है...

तर असतात अलीकडे त्याच्या स्टेटस मध्ये
कविता वगैरे..!
त्या इतरांना दिसू नयेत असं सेटींग असतंच
समजा.
जिच्यासाठी असतात तिलाच दिसाव्या अशी आस.
त्याही बघणं होत नाही..!
कधीतरी चुकून अवकाळी प्रतिसाद येतो की, 'ओह्..!
आज कविता वगैरे? काय विशेष??'

तर काही नाही..!
काही विशेष नाहीये बाई...!
होतो असाच आनंद कधी कधी..!
मग जवळ ठेवून काय करणार..!
उधळावासा वाटतो..! उधळतो..!
काय सांगायचं आणखी...!!

आँचल में भर ली हमने
सारी बहारें संसार की
नयी अदा से हम इठलायें
पायी खुशी लुटायें
हमें क्या हो गया है...

मूळ हिंदी गीताचा/कवितेचा स्त्रोत:
https://www.lyricsindia.net/songs/2589

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता पण कवितेपेक्षा कविता लिहिण्याची वेगळी शैली आवडली.

सुशुप्त ह्या शब्दाचा अर्थ कळेल का?

ति हि कदाचित हेच म्हनत असेल

खुपच च्छान

मि पुधे थोदे continue करते तुम्हाला अवदेल

when you look at me
i can touch the sky
i know that i am alive ........

हे गाने बघा आव्देल तुम्हाला

i am alive (by celine dion )

भन्नाट लिहीलयत पाचपाटील. हे गाणं आता जेव्हा जेव्हा ऐकेन तेव्हा तुमचं हे लेखन आठवेल. ( अवांतर: हे गाणं बघायला आवडत नाही मला, पण आता हा लेख वाचल्यावर गाणं बदलूनच गेलं)

पाठीमागे हात गुंफून सळसळत निघून जाणे शक्यच नाही. हात पाठीमागे अडकले की खांदे ताठ होऊन मागे खेचले जातात. त्यामुळे अर्थातच......!
ह्या पोझ मधली चाल डौलदार, उन्मत्त, चॅलेंजिंग, प्रमाथी होऊ शकते. पण सळसळत?
बहुधा पाहाणाऱ्याचे तनमन सळसळून उठले असावे.. म्हणून बाह्य जग सळसळते आहे आणि मी स्थिर आहे ( फार जुन्या काळी मानल्या गेलेल्या सूर्य - पृथ्वी नात्यासारखे) असे वाटले असावे.
आणि इतकी सारी सौंदर्य लक्षणे एकाच तरुणीत कशी? जाऊ दे. eyes of beholder. दुसरे काय !

बाकी छानच. तेव्हढे ते सुषुप्त करा. दहापैकी आठ मार्क. Happy

हे ही वाचा.
ह्यांचे तर दिपार्ट्मेंटल स्टोर आहे.
सगळा माल खणखणीत.

Pages