चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंतारा , ट्रेलर पाहून बघावासा वाटलं नाही. पण नसता पहिला तर खूप मोठ्या अनुभवाला मुकलॊ असतो. अस्सल मातीतला, मातीची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. कथा, पटकथा, अभिनय, छायाचित्रण सर्वांग सुंदर आहे, कन्नड मधून बघितला असता तर संवादातलं सौन्दर्य अजून भावलं असतं , हिंदी मध्ये संवाद थोडे विचित्र 'ऐकू' येतात. हा एक मोठ्या पडद्यासाठीच बनलेला चित्रपट आहे. शेवटाकडे जातांना त्या पूर्ण प्रसंगात तुम्ही समरसून जाता , एक प्रेक्षक म्हणून केवळ बघे उरत नाही. जातीव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाज, संसाधन आणि निसर्ग ह्या सर्वांच्या वर कंतारा!

कंतारा पाहिला. शेवट काही खास नाही. अपेक्षितच आहे.
कर्नाटकातले ग्रामिण लोकजीवन छान दाखवले आहे आणि अ‍ॅक्टिंगही उत्तम.
पण साउथ इण्डियन सिनेमा ची जाहिरातबाजी खुप केली जाते.
माझ्या मते एकदा पाहिला हरकत नाही पण चित्रपट्गृहातच पाहिला पाहिजे असे नाही.

Pages