आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

तमिळ जावेत असंच कायम वातावरण आहे श्रीलंकेत. त्यात भर. तमिळ मजूर कित्येक वर्षे आहेत पण त्यांना मतदान हक्क नाही यामुळेच भडका उडत हता. पण राजीव गांधी सरकारने त्यांची बाजू घेतली नव्हती. हे वाचलं होतं.
पाकिस्तान त्रासदायकच आहे. मुख्यमंत्री नावालाच असतो.
( शांमाकामामा तुम्हीच?)

महागाई वरून लक्ष हटवण्यासाठी शेजारच्या देशातल्या अडचणी पुढे करण्यात येत आहेत.
महागाई ह्या शब्दात "गाई" असल्या कारणाने आणि गाई मध्ये ३६ कोटी देव असल्याकारणाने त्यावर बोलायचे नई

पाकिस्तानचा उल्लेख केल्यामुळे आलेला राग समजू शकतो !
Happy
ते तिकडेही अशीच ओरड चालू आहे !
खायचे वांदे पण तेथील नेत्यांनी धार्मिक गुरूंनी जनतेला धार्मिक मतिमंदत्व आणल्यामुळे सतत काफिर ! काफिर !!
ओरडून इतरांना मोक्ष देत आहेत ...

तेथील नेत्यांनी धार्मिक गुरूंनी जनतेला धार्मिक मतिमंदत्व आणल्यामुळे
सहमत. पण इथे तरी काय वेगळं आहे? धार्मिक मतिमंद लोकांनी सहिष्णू वातावरण बिघडून ठेवलं आहे.

<खायचे वांदे पण तेथील नेत्यांनी धार्मिक गुरूंनी जनतेला धार्मिक मतिमंदत्व आणल्यामुळे सतत काफिर ! काफिर !!
ओरडून इतरांना मोक्ष देत आहेत ...>

बरोबर.

एकाक्ष भुरटे , छोटासा वाद असेल तो !
तू नाही का सर्किट ममताची सतत पाठ राखण करतोस ? अगदी तसा !

कागाळे नाईक , देशात अनेक ठिकाणी अशा मिरवणुका निघाल्या.
मुद्दाम मुस्लिम वस्तीत चिथावणारी गाणी वाजवली, घोषणा दिल्या.
वरचा हैदोस मशिदीसमोर चाललाय.

ममताचं नाव काढलंच आहेस, तर भाजपने ब़ंगालातही आयात लोकांकरवी शस्त्र आणि रामाचं नाव घेत अशाच मिरवणुका काढल्या.
ते लोक रामाच़ नाव घेताहेत. पण भक्तिभाव दिसतैय का त्यातली?
धार्मिक मिरवणुकीची ही कुठली पद्धत?
याला धार्मिक मतिमंदत्व म्हणायचं की नशा ते तू ठरव.

एक भाषा ,एक धर्म पण देशाला प्रगती पथावर नेवू शकत नाही .
ह्याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तान.
एक धर्मीय राष्ट्र आहे मग ते हिंसाचार कोण विरुद्ध करत आहेतं

भारत अनेक धर्मीय लोक असलेला देश आहे.अनेक भाषा अनेक संस्कृती असणारा देश आहे म्हणून आज भक्कम आहे.
Bjp. ल उगाचच झटके येतात.
एक देश एक भाषा.
एक देश एक धर्म.
असल्या वात्रट विचारांची.

भुरट्या , ममताचे नाव काढले !
पण ममता बद्दल बोलायचे नाही , पण त्याच वेळी हिंदू संघटनांच्या हैदोस ( पुन्हा नीट वाच ) बद्दल मात्र आपटून आपटून व्हागाड होई पर्यन्त ओरडायचे !
शाब्बास !!

हे असे विचित्र शब्द कुठे शिकवतात? मूळ शब्द लिहायची हिंमत नाही, तर लिहितोस कशाला?
पुचाट.

सहकारी पक्ष आणि विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्या नंतर इम्रान ने पाकिस्तानी जनतेला इस्लामाबाद मध्ये बोलावले होते , पाठिंबा द्यायला ..

जनता पार्लमेंटमध्ये मतदान करणार होती का ?

पण उठवळ वृत्ती च्या इम्रान ला त्याच्या देशात अराजकता माजवायची होती .
युक्रेन रशियाच्या युद्धात अपरिपक्वतेचे दर्शन घडवून रशियाला सपोर्ट करणे , सध्याच्या अराजकतेला स्वतः जबाबदार असताना अमेरिकेला ओढण्याचा प्रयत्न केला . याच्या अगदी उलट तो बाजवा अमेरिकेशी जुळवून घ्यायला बघतोय !
या बाबत शहाबाज शरीफ ने Beggars can't be choosers इम्रान ला टोला हाणला .

Beggars can't be choosers इम्रान ला टोला हाणला .
पाकिस्तानात पेट्रोलची किंमत काय आहे?

ते पाकिस्तानी चलनात. भारतीय चलनात कन्व्हर्ट केले की ६० रु च्या आसपास.
पण आपल्याकडे महागाई पेक्षा कोण काय खातो, कोण काय घालतो (अंगात), कोण कुठे काय विकतो, कोण कुठली टोपी घालतो (डोक्यात) इ विषय जास्त महत्वाचे

7/8 महिन्यांपूर्वी केंद्रसरकार ने टॅक्स कमी केल्यामुळे इतर राज्यांतील पेट्रोल 20 रु उतरले होते , अपवाद महाराष्ट्र सरकार !
त्या वेळी केंद्राने टॅक्स कमी करून देखील येथील सरकारने कमी केला नव्हता , तेंव्हापासून पेट्रोल दरवाढ विरोधात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आंदोलने बंद केली .
महाराष्ट्र सरकार चा व्हॅट कमी केला तर आपल्या इथेही 60 रु लिटर ने पेट्रोल मिळेल .

अरे पण झंपु, ते पाकी चलन तू इथे वापरु शकतोस का? जिथे आहे तिथेच वापरणार ना? तिथे त्या लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार केला का? साधे प्यायच्या पाण्याचे सुद्धा वांदे आहेत. डॉलर पौंड इथे कन्व्हर्ट केले की लय श्रीमंत होतो माणुस. पण तेच तू जर अमेरीकेत किंवा लंडन मध्ये राहीलास तर तुला ते स्वस्त वाटेल का?

7/8 महिन्यांपूर्वी केंद्रसरकार ने टॅक्स कमी केल्यामुळे इतर राज्यांतील पेट्रोल 20 रु उतरले होते ,
कर्नाटकात पेट्रोलची काय किंमत आहे मग?

साधे प्यायच्या पाण्याचे सुद्धा वांदे आहेत.
वैनींच्या नंदेच्या जावेच्या काकांची मुलीची सासू लाहोरची होती वाटतं Wink

Bjp सरकार देश बुडवणार आहेत.
चहा वाला पंत प्रधान आणि गुन्हेगार गृह मंत्री हे देशाला धोकादायक आहेत
हिंदू ह्या bjp सरकार ला पाठिंबा देवून आयुष्य बरबाद करुन घेत आहेत.
सावध राहा . हिंदू बिलकुल धोक्यात नाहीं.धोक्यात असेल तर हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतात.
Bjp ची गरज नाही.

साधे प्यायच्या पाण्याचे सुद्धा वांदे आहेत.
वैनींच्या नंदेच्या जावेच्या काकांची मुलीची सासू लाहोरची होती वाटतं Wink>>>>> असती तर बरे झाले असते. फुकटात ( निदान रहायचा खर्च वाचला असता. ) लाहोर बघायला मिळाले असते. बाळ झंपु, पाकी टिव्ही मी बघते अधुन मधून. निदान भाषा तरी समजु शकतो ना त्यांची? अगदी पिचपिच्या सारखी अनोळखी भाषा नाही त्यांची. एका पत्रकाराने तिथल्या लोकांची वाईट ( आपण खूप सुखी आहोत, सब उपरवाले की देन ) स्थिती दाखवली होती. अक्षरशः डबक्यातुन पाणी भरुन ते गाढवांवर लादुन घेऊन जात होते. त्या सल्लु शहरुखला पहाण्यापेक्षा जग बघत जा. त्यांचे आणी आपले जगणे काही वेगळे नाही.

असेल तर हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतात.
Bjp ची गरज नाही.>>>>>>

मग मुस्लिमांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या मणी शंकर ने पाकड्यांना आवाहन केले होते का ?

आहो वैनी इथे आमच्या माहीम मध्ये कुठल्याही पत्रकाराने चाळीत जाऊन जनतेचे हाल दाखवले तर ह्याचा अर्थ संपूर्ण भारत असाच आहे असा करावा का बाहेरच्या लोकांनी?
बाकी रमेशनी कर्नाटकात पेट्रोलची काय किंमत आहे मग? ह्या प्रश्नाला बगल दिली दिसत आहे.

झंपु सिरीयसली. इंटर्नेट वर बातम्या नीट बघत जा. आपल्या न्युज चॅनेल वर सर्व काही दाखवत नाहीत. भलेही ते शत्रु देशातले असतील पण तो व्हिडीओ पाहुन मला खरच वाईट वाटले. तिथे सिंध आणी खालील प्रांतात पाण्याचे बरेच हाल आहेत जे आपल्या इथे मराठवाडा आणी काही भागात आहेत तसे. आम्ही पाण्याच्या दुष्काळातुन गेलो आहोत त्यामुळे मला चांगलीच जाणिव आहे त्याची.

<महाराष्ट्र सरकार चा व्हॅट कमी केला तर आपल्या इथेही 60 रु लिटर ने पेट्रोल मिळेल .>
मोदीपण एवढं फेकत नाही.

Reference The Hindu

Global Hunger Index ranks India at 101 out of 116 countries

Jagriti Chandra

NEW DELHI:OCTOBER 15, 2021 10:37 IST

UPDATED: OCTOBER 15, 2021 10:37 IST

Only 15 countries fare worse than India

Only 15 countries fare worse than India.These include Papua New Guinea (102), Afghanistan (103), Nigeria (103), Congo (105), Mozambique (106), Sierra Leone (106), Timor-Leste (108), Haiti (109), Liberia (110), Madagascar (111), Democratic Republic of Congo (112), Chad (113),
Central African Republic (114), Yemen (115) and Somalia (116).

IMG_20220404_144722.jpg

Pages