या मृत्यूने मला काय शिकवलं?

Submitted by पियू on 31 March, 2022 - 14:49

लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.

माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.

कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरुवात माझ्यापासून करते..

माझ्या आजीच्या मृत्यूने मला शिकवलं की एखादा व्यक्ती डेथबेडवर असेल आणि त्याला तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तर सगळं सोडून तिथे जावं. एक दिवस कॉलेज / शाळा / नोकरी वगैरे ला न गेल्याने काहीही अडत नाही. परंतु त्या व्यक्तीशी झालेली भेट ही कदाचित शेवटची ठरू शकते. Sad

कोरोनाने देवाघरी गेलेल्या जवळच्या मित्राच्या मृत्यूने शिकवलं की आयुष्य खूप अनसर्टन आहे. भविष्याची तरतूद करताना वर्तनमानातले जगणे बिलकुल सॅकरिफाय करु नये. Sad

माझं असं झालं आहे
एक मित्र खूप दिवस भेटू म्हणत होता, ये एकदा निवांत म्हणत होता
आज जाऊ उद्या जाऊ करत राहून गेलं
आणि तो गेल्याची बातमी आली Sad
आयुष्यभर हळहळ राहील की भेटायला हवं होतं यार

मित्र गमावणे म्हणजे काय हे समजू शकतो.
स्पेशली जेव्हा माझ्यासारख्या एखाद्याच्या आयुष्यात अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता यावेत ईतकेच मित्र असतात..
त्यामुळे जे माझ्याशी आणि मी ज्यांच्याशी भांडून, वाईट वागूनही जे परत येतात, त्यांना मी पुन्हा जाऊ देत नाही.

मागे एका गेलेल्या मित्राबद्दल ईथे लिहिलेले.. व्यक्तीचित्रण, कथारुपात लिहिल्याने सगळेच संदर्भ/ तपशील अचूक नाहीयेत.. पण जे आहे ते हे आहे
https://www.maayboli.com/node/49577

Ships that pass in the night, and speak each other in passing,
Only a signal shown and a distant voice in the darkness;
So on the ocean of life we pass and speak one another,
Only a look and a voice, then darkness again and a silence.

"Tomorrow," I say, "I will call on Jim,
Just to show that I'm thinking of him."
But tomorrow comes--and tomorrow goes,
And the distances between us grows and grows.
Around the corner!--yet miles away . . .
"Here's a call, sir . . ."
"Jim died today."
And that's what we get, and deserve in the end:
Around the corner, a vanished friend.

माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असणाऱ्या अतिशय हुशार , समंजस , देखण्या भावाच्या त्याच्या वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी झालेल्या अकाली मृत्यूने मला हे शिकवलं को कधीही काहीही होऊ शकतं , त्यामुळे आपल्या माणसांच्या सोबत प्रत्येक क्षण आनंदाने आणि आपल्याला प्राणाहून प्रिय व्यक्ती जरी गेली तरी आपल्याला जगावच लागत ,
असह्य वेदना आहे ही अस दुःख आहे ज्याच्यावर काळ हे सुद्धा औषध नाही
कदाचित मी असंबद्ध लिहितेय
काय लिहितेय हेच कळत नाहीये
भूषण माझं ,आईच आणि दिदीच तुझ्यावर अतिशय प्रेम होत आणि कायम राहील,सगळ्यात लहान होतास पण आमचा आधार होतास तू , आमच्या जगण्यातला आनंद होतास
प्रत्येक क्षणाला तुझं स्मरण होत

जवळच्या व्यक्ती च्या मृत्यू मुळे डोळे उघडले किंवा जीवनाला वेगळे वळण लागले .
ह्या वर मत व्यक्त करावे असे धागा कर्त्याचे मत असेल तर.
माझ्या खूप जवळच्या नातेवाईक चा अपघाती मृत्यू झाला.
त्यांना सकाळी सकाळी जॉगिंग ची सवय होती.
रोज सकाळी पाच ला उठून जॉगिंग करायचे.
आणि ते पण सर्व नियम पाळून रस्त्याच्या खूप बाजू ने .शक्यतो डांबर च्या खालीच.
अशा शिस्तीत राहणाऱ्या व्यक्ती चा अपघाती मृत्यू झाला.
समोरून येणाऱ्या व्होल्व्हो बस च्या साईड diki च दरवाजा अचानक उघडला .
आणि कळायचं आत कपाळमोक्ष करून गेला.
त्या प्रसंग वरून डोळे उघडले.
सर्व बस चालवणाऱ्या लोकांनी पॅसेंजर उतरून सामान काढले को डिकी व्यवस्थित बंद करावी.
दोन तीन वेळा चेक करावी.
एक चूक कोणाचा तरी जीव घेवू शकते

बाकी माझे मन खूप विचित्र आहे.खूप जवळची लोक गेली,वडील गेले,जवळचे मित्र गेले.
माझ्यात एक खूप मोठा दोष आहे
किती ही प्रिय व्यक्ती चा मृत्यू झाला तरी.
मला त्या वेळेस काहीच वाटत नाही.
कोणतेच भाव नसतात.
त्या मुळे रडायला पण येत नाही.ना दुःख वाटत.
खूप तटस्थ वाटत मला.
भावना विरहित होतो.
पण सर्व अंतिम विधी पार पडले घरी आलो की माझा बांध फुटतो.
तेव्हा खूप भावनिक होतो,दुःखी होतो,रडतो पण.
आणि हे दुःख खूप दिवस राहते.

नेत्या विषयी बोललं तर.
राजीव गांधी ह्यांची हत्या खूप मनाला लागली
एक हुशार,बुद्धिवान नेता भारताने गमावला.
त्याला कारण खुष्मस्करी करणारे चमचे.
तुम्ही कोणत्या पदावर गेला की चमचे भोवती जमा हातात

गोड बोलणारी,स्वार्थी वृत्ती ची ही लोक खूप भयानक.
राजीव गांधी ना भारताच्या धोरण विरुद्ध निर्णय घेवून श्री लंकेत शांती सेना पाठवा असा सल्ला देणारे हेच.
आणि तामिळी अस्मिता जागृत करणारे
हेच चमचे.
राजीव गांधी ची हत्या ह्या पासून हे शिकलो.
शिव्या देणारा सल्लागार,मित्र हा कधी ही चांगला गोडबोले असणारे चमचे धोकादायक

माझी मुलगी पाच वर्षांची असताना गेली. आज तिचा नववा वाढदिवस आहे. आणि मी यातून काहीच शिकले नाही.

नौटंकी Sad

मुद्दाम प्रत्येक मृत्यूतून तुम्ही स्पेसिफिक असं काही शिकला असाल असं म्हणायचं नाहीये.. पण या प्रसंगाला तुम्ही ज्या प्रकारे तोंड दिलं असेल ते नक्कीच तुम्हाला खूप काही शिकवून गेले असेल.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे.
फक्त तो मृत्यू येण्यास कोणी ही व्यक्ती जबाबदार असेल तर तो सर्वात मोठा गुन्हेगार आहे.
सरकारी निर्णय,ठरवून केलेली कट कारस्थान,आर्थिक fraud, अपघात,.छळ .
ह्या प्रकारात ज्यांचा मृत्यू होतो त्या गुन्हेगार लोकांना क्रूर मृत्यू दिला पाहिजे.
नैसर्गिक मृत्यू, काही बऱ्या न होणाऱ्या आजाराने आलेला मृत्यू हा स्वीकारला पाहिजे.
दुःख व्यक्त न करता.

>>>>तुम्हाला खूप काही शिकवून गेले असेल.
काही जखमा आणि त्रास हे अश्वत्थामाची भळभळणारी जखम असतात Sad कधीही भरुन न निघणारे.
असो.
इत्यलम!

खरे आहे. या धाग्यावर काय लिहावे हे कळत नाही.
मध्यंतरी माझे एक काका गेले आणि जाणवले ते शेवटचे काका होते. आत्या सर्व आधीच गेलेल्या. म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीत आठ भावंडे होती. पाच भाऊ आणि तीन बहिणी. त्यापैकी आता माझे वडीलच आहेत. चारही काका आणि तिन्ही आत्या आता नाहीयेत. जेव्हा हे जाणवले तेव्हा कळले नाही की याकडे कसे बघावे. माझ्या ईतर भावंडांच्या डोक्यावरचे छत्र गेले म्हणून हळहळ व्यक्त करावी की आपल्या डोक्यावरचे आहे म्हणून स्वत:ला नशीबवान समजावे. की एक दिवस आपल्यालाही हे सत्य स्विकारावे लागणार आहे त्यासाठी मनाची तयारी करावी.

खूप आधी प्रॉपर्टीवरून त्या भावाभावांची भांडणे झालेली आणि तेव्हापासून बोलणे बंद होते. आज फिरून विचार करताना जाणवते की एकतर तो पैसा कोणालाही आयुष्यभर पुरणारा नव्हता आणि जाताना एकही जण तो पैसा वर घेऊन गेला नाही. पण त्यापायी झालेल्या भांडणांनी ईतक्या वर्षांत या लोकांनी काय आणि किती गमावले याची मोजदाद पैश्यात नाही.
तेव्हा जाणवले खरी श्रीमंती काय तर ती माणसांचीच. आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी आपली माणसेच देऊ शकतात. जातानाही आपल्याकडे त्यांच्या आठवणी ठेऊन जाऊ शकतात.

त्या प्रॉपर्टीच्या वादात आमची तर पुर्ण बॅंड वाजली होती. त्या दिवशी मायबोलीवरच्याच एका धाग्यावर लिहिले की आम्हाला वृत्तपत्रही परवडायचे नाही. काही लोकांना ते खोटे वाटले होते. पण प्रत्यक्षात एक काळ होता जेव्हा त्याहीपेक्षा वाईट, म्हणजे कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करायचे विचार एखाद्याच्या मनात यावेत ईतपत वाईट परीस्थिती होती.
पण परीस्थिती बदलली. ती बदलत राहते. आज पोटापाण्यापुरतेच नाही तर थोडेफार मौजमस्तीसाठीही पैसे आहेत. पण जाताना आपणही यातला एकही पैसा नेणार नाही हे घरातल्या आधीच्या मृत्युंनी दाखवलेय. आज पोरांवर खर्च करायला चार पैसे कमी असले तरी चालतील, पण पोरांकडे दोन्ही घरचे आजी आजोबा आहेत ही त्यांची श्रीमंती वाटते. पैसा येतो. पैसा जातो. नशीबात असेल तर पुन्हा येतो. पण माणूस गेला की तो जातोच. आहेस्तोवर त्यासोबत जगून घ्यावे. मृत्यु हे शिकवून जातो..

आईची लेक आणि नौटंकी नि:शब्द. >> +११
मागच्या एप्रिल १७ ला माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा गेला, कोविडने. १ एप्रिल ला अमेरिकेहून इथे आला. दर ठिकाणी केलेल्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. पण आठ तारखेला मुंबई हून पुण्याला गेला आणि ताप यायला लागला. मला अत्ता हे लिहीताना सुध्दा इतकं विचीत्र वाटतय, खुप हेल्पलेस वाटतय. अजूनही खरं नाही वाटत.

४ ऑगस्ट २०१९ ला माझी आई गेली.... माझ्या वाढदिवसाचा दिवस.... श्रावण महिना म्हणुन सत्यनारायण ठरला होता.... पुजेसाठी काय काय वस्तु राहिलेल्या त्या येता येता घेउन येते असा सकाळी ८ वाजता तिचा फोन आलेला.... आणि ८:३० वाजता ती गेल्याचा फोन आला.... धडधाकट, कसलाही आजार नसणारी माझी आई एका क्षुल्लक अपघातात गेली... चाफ्याची फुलं काढताना पडली आणि गेली...

आदल्या दिवशी ३ तारखेला तिच्या घरी सत्यनारायण होता.... म्हणुन आम्ही सगळे जमलो होतो... माझ्या वाढदिवसाला आणलेलं गिफ्ट मला दाखवलं तिने... बघ आवडतय का बदलुन आणु म्हणाली...

काय शिकावं मी या सगळ्यातुन ?
आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते शिकले.... कोणत्याही क्षणी काहीही घडु शकतं ते लक्षात आलं... त्यामुळे प्रत्येक क्षण आसुसुन जगावा, प्रत्येक निरोप प्रेमाने घ्यावा हे शिकले.... आपला आनंद कधीही पुढे ढकलायचा नाही हे शिकले... ज्या वेळी जे करावसं वाटतं ते करुन मोकळी होणार असं ठरवलंय.....
त्या वाढदिवशी मला एका दिवसात तिनं मोठं केलं... आता येणारा प्रत्येक वाढदिवस एका अर्थाने "स्पेशल" आहे माझ्यासाठी .. पण तरी साजरा करणार.. कारण मी माझ्या वाढदिवसाला रडत बसलेलं माझ्या आईलाच आवडणार नाही...

माझे दोन चुलत भाऊ ( जे एकमेकांचे सख्खे भाऊ होते). ते 2013 ला बाईक accident मध्ये सावंतवाडीजवळ गेले.

गोव्याच्या रस्त्यावर ते त्यांच्या लेनमध्ये व्यवस्थित होते पण उलट्या बाजूने येणाऱ्या एका बाईक वाल्याने ट्रकला overtake करण्याच्या नादात यांच्यासमोर एकदम त्याची बाईक आणली. Head-on collision झाले. मागे बसलेला भाऊ उडून ट्रक खाली आला. पुढे बसलेला माझा दुसरा भाऊ व तो दुसरा बाईकवाला एकमेकांवर आपटले. हे तिघेही जागेवरच गेले. मागे जो भाऊ बसला होता त्याचे लग्न होऊन वर्षच झाले होते. पुढे बसलेल्या भावाने हेल्मेट घातले होते. पण बहुतेक टक्कर होताना डोके खाली केले की काय पण तेच हेल्मेट त्याच्या छातीत घुसले. माझ्या भावांची एकच चूक म्हणजे त्यांचा स्पिड जास्त होता. ( साधारण 70-80 असावा). आजही काका-काकू व आम्ही अश्रू ढाळत आहोत. तेव्हापासून मी बाईक कधीच high way वर कधीच चालवत नाही. आपली चूक असो वा नसो... दुचाकीवर असणार्‍यांनाच जास्त suffer करावे लागते. अगदी कुत्र्याला धडकला तरी तुम्हालाच जास्त लागते.

बाप रे!!! एकेक भयंकर आहे.
----------------
माझ्या साबा ७७ वर्षाच्या होत्या. धडधाकट (कदाचित माझ्यापेक्षाही. नॉट किडिंग) पण ४ थ्या स्टेजचा एकदम कर्करोग निघाला व एका महीन्यात गेल्या. मी जे शिकले ते हे -
- रोजच्या जीवनात एक नियमितता (रुटीन) ठेवा. खाण्यापीण्या- झोपण्याच्या वेळा सांभाळा.
- इतरांकरता अमकंच खाल्लं नाही, तमकच कमी खाल्लं असले प्रकार करु नका. फळे, दहीदूध, मासे, भाज्या सर्व काही विपुल असो - नसो, स्वतः चे नीट करा. युअर फर्स्ट ड्यूटी टुवर्ड युअरसेल्फ.
- यामध्ये मला माहीत आहे वैज्ञानिक तथ्य नाही पण त्यांनी लघुरुद्र केला होता. शिवभक्त होत्या. शिवलीलामॄत, नवनाथ ग्रंथ व गुरुचरित्र सर्व च्या सर्व ग्रंथात रुद्राक्ष महीमा नामक पाठात, रुद्राचे फळ दीर्घायुष्य असल्याचे वर्णन आहे. माझा तरी विश्वास आहे. मला खात्री आहे या मुद्द्यावर काथ्याकूट होउ शकतो.

मृत्यू हा सत्य च आहे पण तो माणसाचे लाइफ span पूर्ण होण्याच्या आत कोणत्याच मार्गाने येवू नये.
जेव्हा पण त्याने यावे अकस्मात यावे त्याची चाहूल पण लागली नाही पाहिजे..
Heart अटॅक नी आलेला मृत्यू मला खूप आवडतो.
एक मिनिट किंवा दोन मिनिट काही कळायच्या आत जीवनातून सुटका.
पण कॅन्सर किंवा बाकी आजार किंवा अपघात होवून सहा सहा महिने किंवा वर्ष मृत्यू नी त्याच्या उपस्थिती ची जाणिव करुन देवू नये
ते खूप भयंकर वाटत.

माझे वडील त्यांच्या वयाच्या 75 ब्या वर्षी गेले.
ते पण झोपेत.
त्यांना पण माहीत पडले नसेल मृत्यू कधी आला.
हे सर्वात जास्त सुखाचे मरण.
ना कोणता आजार , ना कोणता शारीरिक त्रास.
शेवट पर्यंत एकदम तंदुरुस्त होते कोणत्याच व्याधी नाहीत.

१. "Life is what happens to you when you are busy making other plans" असे एक वाक्य आहे. ४ नोव्हेंबर २०१८ च्या पहाटे माझे बाबा severe cardiac arrest ने गेले. अक्षरशः काही मिनिटांत सारं काही संपलं. बोलावलेली अँब्युलंस येईपर्यंत ते गेले होते. आम्ही जवळ असूनही काही करू शकलो नाही.
त्या वेळी खरंतर मी ठरवलं होतं की CPR training घ्यायचं. पण गेल्या तीन वर्षांत कोव्हिड आणि इतर कारणांमुळे ते शक्य झाले नाही. हा धागा वाचून त्यावर विचार करत असताना मला याची आठवण झाली. आता मी शोधेन हे ट्रेनिंग मी कसे पूर्ण करू शकते ते.
२. बाबा आणि इतर काही जवळच्या व्यक्तींचे अचानक आणि अकाली मृत्यू पाहिले गेल्या तीन वर्षांत. त्यातून एक जाणीव फार प्रकर्षाने झाली की माणूस अक्षरशः रिकाम्या हाताने जातो. शिवाय तुमच्या शर्टाला, मोबाईलला, गाडीला तुमची आठवण येत नाही. अधिक भौतिक सुखांच्या लोभापायी माणसे तोडू नका. Your legacy is not your physical assets. तुमचे काम, तुमचे विचार आणि तुम्ही जोडलेली माणसे ही खरी लेगसी आहे.
त्या कोको सिनेमात ही कल्पना फार चांगली मांडली आहे. जोवर पृथ्वीवर तुमची आठवण काढणारी एखादी व्यक्ती असेल तोवरच तुम्ही त्या सणाच्या दिवशी पृथ्वीवर येऊ शकता असे काहीसे.
३. आयुष्याची काहीच शाश्वती नाही. आपली पाटी साफ करून ठेवत रहा. उगीच भांडणं, गैरसमज, अढी ठेवून जगू नका. सॉरी म्हणा किंवा माफ करा आणि मोकळे व्हा.
४. माझ्या शाळेचे माजी प्राचार्य पोंक्षे सर गेले तेव्हा त्यांनी दासबोधाच्या नवव्या समासाचे (मृत्यू निरूपण) वाचन करा अशी इच्छा व्यक्त केली होती. Death is the greatest equalizer असा त्याचा आशय आहे. मला हे फार पटले. मी ती पीडिएफ जपून ठेवली आहे आणि अधूनमधून वाचत असते. Gives me a good reality check.
लिंक - http://ioustotra.blogspot.com/2017/05/samas-navava-mrutyu-nirupan.html?m=1

Pages