कदाचित

Submitted by अज्ञात on 29 May, 2009 - 00:43

दिवस येतसे रोज नवा अन
काल होतसे जुना जुना
काळाच्या गर्तेत बुडाल्या
किती सावल्या आणि खुणा

कळूनही हे नश्वर
गाती कोकिळ अवनी सजतांना
फूलपाखरे बागडती
कण क्षार तुषार निवडतांना

आम्हीच का कण्हतो अतिभावे
'आज' जगूया लढतांना
उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना

..............अज्ञात

गुलमोहर: 

आम्हीच का कण्हतो अतिभावे
'आज' जगूया लढतांना
उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना>>> बहोत खुब Happy

क्या कहने, जियो गुरूजी Happy

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अज्ञात बाबु , बढिया है |
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना.... ह्म्म्म...
छान.

संत कबीर सांगुन गेले........तुम्हीही किती छान सांगीतले ! Happy

व्वा!!! खुप छान अज्ञातजी!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

आम्हीच का कण्हतो अतिभावे
'आज' जगूया लढतांना
उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना
....... व्वा!

मस्त, आवडली. शेवटच्या ओळी तर कमाल!
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

आम्हीच का कण्हतो अतिभावे
'आज' जगूया लढतांना
उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना

सही!

सर्व प्रतिसाद दात्यांचे मनःपूर्वक आभार. Happy

अप्रतिम.......शेवटच्या ओळि तर सुरेखच
"उद्याच ना येईल कदाचित
कुणास ठाउक निजतांना"
खुप खुप आवडली...