काय आहे जे मनी.

Submitted by deepak_pawar on 11 February, 2022 - 22:59

काय आहे जे मनी ते, आज राणी बोल आता
चालली ही बघ निघूनी, सांज राणी बोल आता.

पावसाच्या या सरी ही, चुंबिती मातीस आता
अन तुझ्या डोळ्यात का ही, लाज राणी बोल आता.

भारल्या अंधार राती, आजला गेल्या निघूनी
या नभाला चांदण्यांचा, साज राणी बोल आता.

राग का आहे मनी? का राहसी गुमसूम वेडे?
ऐकण्या, तू दे मला आवाज राणी बोल आता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users