ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर वॉल्क लिहून तोच शब्द कसा बरोबर आहे हे सिद्ध करू शकतात
तर ईज्जत वगैरे फार किरकोळ गोष्ट आहे त्यांच्यासाठी
ते लहानपणापासून असेच लिहितात किंवा शाळेत असल्यापासून असेच शिकलो वगैरे पण म्हणतील

बोले तैसा लिहे त्यांची वंदावी पाऊले

सर बरे झाले का ?
सरांना भक्ती आवडत नाही असे दिसतेय. शिवाय ते वॉक, टॉक लिहू लागले आहेत. लालिते सुद्धा सुंदर हस्ताक्षरात येऊ लागली आहेत. गफ्रे नाही सध्या. भक्तांचा अनुल्लेख होतो आहे. त्यामुळे सरांसाठी जिओ और आयडिया जीने दो धोरण बरे राहील.

मात्र सरांचे धोरण च्रप्स चालवत आहेत. नुकतेच त्यांनी मला बाणेदारपणे मी गुगलविरोधी आहे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे आता टू आयसीचीभक्ती बंद करून सुभेदार मेजर साहेबांची भक्ती सुरू. सीओ साहेब तर कधी फिरकतच नाहीत या गोंधळात. ते बरे झाले की एकदम १८७ आयडीज बरे होतील या शुभेच्छा !

जीभ म्हणते मॉर्निंग वॉकला आम्लेट-पावची लज्जत द्या
व्याकरण चुकलेल्या करोनाग्रस्तांना थोडीतरी ईज्जत द्या

ह पा,
ते जीभ म्हणते मॉर्निंग "वॉल्कला" करा प्लिज !

प्रतिसाद वाढलेले बघून पेशंट वाढले की काय असे वाटले होते.. पण आत डोकावल्यावर बरे वाटले. नेहमीचाच टाईमपास सुरू आहे. म्हणजे आपण सारे या लाटेतून सावरतोय Happy

इज्जत या शब्दाला इज्जत म्हणून डोक्यावर मुकुट चढवून ईज्जत केले.
आता इज्जत उतरवणे बरे वाटत नाही, राहू द्या सध्या Happy

म्हणलं होतं ना सर काय ऐकत नसतात
त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ च जणू
सर्वसामान्य माणूस प्रेशर खाली येऊन बदलेल पण सरांचा विषयच खोल
ते भाषातज्ज्ञालाही चार शब्द सूनवतील इतका अधिकार आहे त्यांचा

हे असं असावे माणसाने नेहमी खंबीर
जिओ सर (अंबानी वाले नाही, हिंदी वाले जिओ) जिओ

आज आमचा शेवटचा शिलेदार ऋन्मेष ऑलमोस्ट बरा झाला
गेल्या मंगळवारी पहिली विकेट पडलेली. हा मंगळवार संपता संपता कोरोनाचा बाजार ऊठला आमच्या घरातून
ईथल्या सर्वांच्या शुभेच्छांचे पुन्हा एकदा धन्यवाद _/\_

"बोले तैसा लिहे त्यांची वंदावी पाऊले" - आशुचँप, ह्यातले 'ल' सायलेंट आहेत (वॉल्क सारखे) की अ‍ॅरोगंट? Happy

ह.पा. Rofl

"तुम्ही किनई फारच लब्बाड आहात" - ह्यात परत 'लब्बाड' मधला 'ल' आहेच. Happy

तसं लबाडी वगैरे काही नाही ओ, पण तुम्ही एव्हढे प्लॅटीनम स्टॅटस असलेले सरांचे भक्त, म्हणून म्हटलं, विचारून बघावं. तुम्हाला माहीत नसेल तर कुणाला माहित असणार? Happy

कुठलं काय प्लॅटिनम घेऊन बसलात हो
सरांची खप्पा मर्जी झालीये
भक्तिमार्ग सोसवत नाही आणि मग त्याची शिक्षा आमच्यासारख्या पामराना सोसणे भाग पडते

यात आता 2 च ल आलेत, तेवढे घ्या चालवून

Have lost the track of this thread.
ज्यांना झालाय त्यांना लौकर बरे होण्यास शुभेच्छा.

"Have lost the track of this thread." - सरांच्या धाग्यावर सुसंगतपणाची अपेक्षा व्यक्त करण्याची तौहीन?? लाहोर-व्हाया-कुवैत!!! Happy

"सरांची खप्पा मर्जी झालीये" - Uhoh

सरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. पहिल्या पानावर सरांचे पाच धागे. त्यातले पहिले चार सरांचेच.
Screenshot_20220119-020216_Chrome.jpg

आज आमचा शेवटचा शिलेदार ऋन्मेष ऑलमोस्ट बरा झाला>>> वॉव ग्रेट न्यूज.

इज्जत या शब्दाला इज्जत म्हणून डोक्यावर मुकुट चढवून ईज्जत केले.
आता इज्जत उतरवणे बरे वाटत नाही, राहू द्या सध्या >>>> हे असलं गंडलेलं लॉजीक देतोस मग कशी मिळणार तुला इज्जत लोकांकडून? स्वतःची चूक कबूल करण्यात कमीपणा वाटतो का? गिरे तो भी टांग उप्पर अ‍ॅटीट्युड कायमच!

त्यातले पहिले चार सरांचेच>>
यात आश्चर्य का वाटते तुम्हाला??
ज्याप्रमाणे शागरुख सरांमुळे बॉलिवूड तग धरून आहे त्याचप्रमाणे आपल्या सरांमुळे मायबोली
ते 100 कोटींचा सिनेमा देतात तर
सर आपले शतकी धागा सहज विणतात

मी तर म्हणतो पहिल्या 10 मध्ये फक्त 4 हे फार कमी प्रमाण झालं
सरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून नैतर दहा मध्ये आठ धागे सहज आणू शकतात ते स्वतःचे

हे पटलं. भक्तांनी इतकं अल्पसंतुष्ट राहू नये.
पण सध्या सर हुमायुन मोड मधे न राहता ह्युमन मोड मधे आले आहेत त्यात भक्तांचा काही दोष आहे असे वाटतेय. सरांना त्रास होईल असे धोरण सध्या स्थगित करावे.

गेल्या चारपाच दिवसात नगरपालिकेतून फॉलो अप घ्यायला तीन वेळा फोन आला.
फार काही नाही, पण पेशंट व्यवस्थित आहे ना, त्याला काही सिरीअस त्रास नाही ना वगैरे चेक करायला.
मूळ लेखातून मायबाप सरकारला काहीच पडली नाही असा अर्थ निघायला नको. जे ते करत आहेत ते तरी हायलाईट व्हायला हवे म्हणून हे मुद्दाम ईथे सांगतोय.
आमच्या दारावरही एक पोस्टर लावला आहे ज्यावर लिहिले आहे की ईथे कोविड पेशंट आहेत तर आमच्या मजल्यावर ये जा निषिद्ध आहे.

आमच्याकडे सरकारतर्फे कोणी विचारत नाही.
आताच नव्हे तर पहिली लाट शिगेला पोचली तेव्हा पासून.

माझा मुलगा positive होता. फक्त एक दिवस ताप होता. आम्ही दोघेही negative. एक दिवसानंतर त्याचे isolation करता करता आमच्या नाकी नऊ आले. Happy टीएमसी मधुन किमान चार वेळा फोन आला. दोनदा बाहेरुन लॉबी sanitise करुन गेले.

Pages