एक विचार तुझा...

Submitted by देवभुबाबा on 13 January, 2022 - 23:58

एक विचार तुझा, नि दिवस बनतो माझा...
वाट पाहण्याची कंटस्थताही, आनंद बनतो माझा...
तुझ्या आठवणीत गुंततो, मन चंचल बनतो माझा...
कधी सुखः कधी दुःख बनुन, चेहरा रडतो माझा....

गर्दीतही अनेक नजरा, खिळतात तुझ्यावर...
त्याच गर्दीत हरवलेला, चेहरा बनतो माझा...
पडेल तुझी नजर माझ्यावर हीच असते आशा...
त्यासाठीच धडपड करत मनही झुरतो माझा...

दिवस सरत जातो, न पाहता न बोलता...
प्रत्येक क्षणी मनात काहूर उठतो माझ्या...
आज नाही घडले मनासारखे...
उद्या नक्की सुखावेल, मनं ग्वाही देतो माझा...

दिवसामागून दिवस सरतात, वर्षामागून वर्ष...
स्वप्न बनतात, घडतो स्वप्नांचा महल माझा...
त्याच स्वप्नमहलातील राणी तु...
ना मिळालेले धन, नि अपुर्ण स्वप्न माझा...

Group content visibility: 
Use group defaults