एक विलक्षण कविता - असाध्य वीणा / अज्ञेय

Submitted by सामो on 13 January, 2022 - 11:32

अन्यत्र पूर्वप्रकाशित

"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता असाध्य वीणा मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली.
मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक!
___________
कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे. ही वीणा साधीसुधी वीणा नसून, अत्यंत प्राचीन, पुरातन , महाकाय पुराण वृक्षाच्या शरीरामधून / लाकडातून हिला घडवलेली आहे. घडवल्यानंतर कारागीराने जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याच्या भावनेतून प्राण त्यागले आहेत. राजाच्या दरबारातील तसेच अन्य राज्यातील रथी-महारथीनी वीणेतून सूर छेडण्याचे निष्फळ प्रयत्न केलेली आहेत परंतु हात टेकलेले आहेत.
आज तो क्षण आलेला आहे जेव्हा सर्वांचे आतुर डोळे प्रियंवदाकडे लागलेले आहेत. कसोटीचा क्षण आहे.
प्रियंवद हे शिवधनुष्य पेलू शकतील अथवा नाही - हे तुम्हीच वाचून जाणुन घ्या.
______________
अनेकदा वाचली तरी यातील संस्कृतप्रचुर हिंदी शब्द मला भुरळ घालत रहातात. कवितेला स्वत:ची एक लय आहे, मी म्हणेन अद्भुत व शांत रसातील अशी ही कविता आहे. ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायात वाचलेले "शांत रसाच्या घरी अद्भुत पाहुणा आला" अशा स्वरूपाची ओवी आठवते. तेच शांत-अद्भुत रसांचे (हरी-हर मिलन) मला या कवितेत आढळते. असो. इतक्या सुंदर कवितेला माझ्या परिचयाच्या विटा फार नको. आपण रसिकानॆच अनुभूती घ्या अन ठरवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वह महामौन…. जो शब्दहीन… और सब में गाता है !
अद्भुत!

अज्ञेयांचे लेखन आज एका तपानंतर वाचले, तुमच्यामुळे.

अनेक, अनेक आभार

हुरुप वाढविणार्‍या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
अनिंद्य एक तपानंतर? बरं झालं मग तुम्हाला हा धागा सापडला. आय अ‍ॅम ग्लॅड!!