बोलणंच बंद व्हावं, असं घडलंच काय होतं?...

Submitted by देवभुबाबा on 12 January, 2022 - 06:39

तु मला पाहिलं, मी ही तुलाचं पाहिलं होतं ...
बोलणंच बंद व्हावं, असं घडलंच काय होतं?...

तु हसलीस, मी ही हसलोच होतो....
कर्णसरींतून ध्वनिगमन शांतच घडलं होतं...

कधी येतां, कधी जाता, मी ही अडलोच होतो...
उजेडांतही अंधाराची कोडी सोडवत होतो...

ओढ होती बोलण्याची, ते ही स्पष्टच दडलं होतं ...
हिम्मत करता संयमांती, तुटलं, जे जुडल होतं...

मी बोललो तुला, तु ही तेच ऐकलं होतं...
बोलणंच बंद व्हावं, असं घडलंच काय होतं?...

Group content visibility: 
Use group defaults