मुलाला वाढदिवस गिफ्ट काय देऊ

Submitted by पिहू१४ on 11 January, 2022 - 00:07

माझ्या मुलाचा येत्या संक्रांतीला १२ वा वाढदिवस आहे तर, त्याला काय गिफ्ट देता येईल. एकट्याला खेळता येतील असे इनडोअर गेम्स किंवा इतर काही द्यावं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना गिफ्ट्स काय द्याव्यात हा प्रश्नच असतो. मुली बऱ्या.

मी माझ्या मुलाला एकेक वर्षी एकेक करत या सगळ्या गिफ्ट्स दिल्या - बायसिकल, बेस्ट क्वालिटी फुटबॉल शूज, कोणत्याही त्याला आवडणाऱ्या स्पोर्ट्स ऍकडेमिची 1 वर्षांची फी भरून ऍडमिशन. सध्या ट्रेकिंग बंद असावं नाही तर पगमार्क किंवा तत्सम संस्थेतुन एखादा हिमालय ट्रेक (मनाली किंवा बेस कॅम्पस)

आणि तुम्हाला इनडोअर गेम्स चालणार आहेत, तर PS 4. किंवा आता पुढे 9वी 10वीत भरपूर प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स असतील, तर एक लॅपटॉप.

प्ले स्टेशन फोर.

चांगला वन प्लस स्मार्ट फोन. व फुल नेट अ‍ॅक्सेस.

क्रिकेट चा सेट. किंवा चांगली बॅट

टेक्निक लेगो. आव्डीचा सेट.

टेनिस किंवा शटल ट्युशन्स.

चांगली सायकल.

बारक्यास अनेक उत्तम आशीर्वाद.

वाचना ची आवड असल्यास किंडल.
किंवा घरी नसल्यास सायकल, डिजिटल मोनोपॉली पण खूप आवडीने खेळतात मुलं.. जी टॉक चे घड्याळ

पिहु लेकाला अनेक आशिर्वाद .
आता विषय निघालाच आहे तर , मावळा गेमचा रिव्यु कसा आहे ?
कोणी खरेदी केला आहे का ?

मीही विचारतेच
रमाचा दुसरा बड्डे येतोय
तिचे बाबा ३चाक वाली सायकल घेणारेत
मला एखादा indoor खेळ घ्यायचा आहे, ज्यात ती रमेल असा.
काय घेऊ?
Links दिल्यात तर खूप छान Happy Wink

किल्ली, इथे पाच वर्शाच्या मुली साठी काय गिफ्ट घेउ असा बाफ आहे तिथे बघा. मुलींसाठी भरपूर सजेशन दिल्या आहेत.

मी परवा व्हिवीआना मध्ये बारक्या मुलींसाठी पाठीला लावायचे छोटे बॅक पॅक बघितले. फारच गोड आहेत. बाकी छान सा फ्रॉक / परकर पोलके
सलवार सूट घ्या लच तुम्ही. माझी सजेस्न नेह मीचीचः कलरिन्ग बुक व स्केच पेने, क्रे योन्स अ‍ॅक्टिविटी बुक्स. स्टोरी बुक्स.

थँक्यू सर्वांना , सायकल इतर गेम्स घेऊन झालेत तो एकटाच आहे मग त्याला एकट्याला बोर होत खेळायला म्हणून बौद्धिक गेम्स घ्यावं असं वाटतं,

यार!

सेंटी उत्तर देऊ का?

की फक्त फिजिकल गिफ्ट आयडिया हव्यात?

***

फिजिकल आयडिया :

१२वा वाढदिवस = पोरगं टीनेजर होणारे.

सो,

१. सायकल. + ती रस्त्यावर वापरण्याचे फ्रीडम.

२. जिम सेट. / आवडीचे स्पोर्ट्स इक्विप्मेंट.

३. मेकॅनो स्टाईल गेम सेट्स. लेगो. यातून अ‍ॅब्स्ट्रॅक्ट ३डी थिंकिंग व क्रिएटिव्ह आयडियाज बनायला मदत होते.

४. टेलेस्कोप/बायनॉक्युलर्स. विथ मोबाईल कॅमेरा अ‍ॅटेचमेंट, प्लस अ‍ॅस्ट्रॉनॉमी बेसिक बुक्स, ऑर बर्ड वॉचिंग लर्निंग बुक्स.

५. त्याचे स्वतःचे बँक अकाउंट. ते हाताळायची शिकवण. क्रेडिडेबिटकार्ड, पॅनकार्ड व त्याबद्दल शिकवण.

(या सगळ्यांत त्याला मोबाईल्/टॅब वगैरे ऑलरेडी दिलेले आहे, अन तो ते रिस्पॉन्सिबली वापरतो आहे हे गृहित धरलेले आहे.)

***
"एकट्याला खेळता येईल" वगैरे बाबत.

रागे भरू का तु(म्हा)ला? Angry डोन्ट डू दॅट टु हिम. एकलकोंडा का बनवायचाय? अरे, पोरांना पंख द्या, पंखात बळ द्या अन उडायला शिकवा. त्यांना मित्र बनवायला शिकवा, लोकांत मिसळायला शिकवा. दोन घेऊन दोन द्यायला शिकवा. दुनिया शिकवा यार.. मग त्यांच्या भरार्‍या पाहून कसं भरतं येतं ते माझ्याएवढं झाल्यावर समजेल तुम्हाला!

साला जमलं अस्तं तर सगळ्या आयांनी पोरांना पोटातच ठेवून घेतलं असतं.
माया आहे. प्रोटेक्टिव इन्स्टिंक्ट आहे.
बरोबरे.
अरे पण नाही ना!
ते पिल्लू अंड्याबाहेर आहे.
घरट्याबाहेर ढकलल्याशिवाय पिल्लं उडायला शिकत नाहीत.
अन उडणं शिकणार्‍या पिल्लासोबत त्याचे आईबाप किती काळपात करत असतात ते पहातो ना आपण? ती करा, पण त्यांना उडवा.
सो,
'एकट्याने', 'घरातल्या घरात' = नाही

पण हे एक असो. हे माझे वैयक्तिक मत.

पटत नसेल तर उडी मारून पुढे जा, इग्नोर करा.

(रच्याकने : आज माझ्या लाडक्या पुतण्याचा १६वा बड्डे आहे, म्हणून थोडा वेगळा मूड लागलाय. मघाच बंधूंचे बौद्धिक घेऊन झालेय.)

वर पुस्तकं राहिली. का?

कारण वाचनाची आवड नामक प्रकार असावा लागतो. ते गिफ्ट तुम्ही तुम्हाला द्यायचं आहे. दोघांनी. मुलांना खुप पुस्तकं, मासिकं, पेपर घरभर दिवसरात्र पसार्‍या सारखे दिसायला हवेत.

पुस्तक वाचण्याची किंमत तेव्हाच जेव्हा त्याबद्दल चर्चा होते. तुम्ही वाचलेलं असेल तरच उपयोग.

हे कल्चर आहे. संस्कार आहेत.

बेस्टेस्ट गिफ्ट. 'संस्कार'

१. सायकल. + ती रस्त्यावर वापरण्याचे फ्रीडम.
२. जिम सेट. / आवडीचे स्पोर्ट्स इक्विप्मेंट.
३. मेकॅनो स्टाईल गेम सेट्स. लेगो. यातून अ‍ॅब्स्ट्रॅक्ट ३डी थिंकिंग व क्रिएटिव्ह आयडियाज बनायला मदत होते.
४. टेलेस्कोप/बायनॉक्युलर्स. विथ मोबाईल कॅमेरा अ‍ॅटेचमेंट, प्लस अ‍ॅस्ट्रॉनॉमी बेसिक बुक्स, ऑर बर्ड वॉचिंग लर्निंग बुक्स.
५. त्याचे स्वतःचे बँक अकाउंट. ते हाताळायची शिकवण. क्रेडिडेबिटकार्ड, पॅनकार्ड व त्याबद्दल शिकवण.

>>> आ.रा.रा. सगळे पर्याय मस्त सुचवलेत.

आ रा रा जी तो दिवसभर बाहेर असतोच खेळायला , खंडीभर मित्र आहे , सर्वप्रकारचे मैदानी खेळ खेळत असतो ,पण घरात असताना कधीतरी खेळायला गेम्स हवेत भाऊबहीण नसल्याने आणि काही कारणाने आम्ही त्याला सध्या वेळ देऊ शकत नाही म्हणून एकट्याला म्हटलं आहे

आ.रा.रा., +१ मस्त पर्याय! शक्यतो स्क्रीन टाइम वाढेल असं काही नको कारण कोव्हीडमुळे तो आधीच प्रचंड वाढलेला आहे.
त्याच्या आवडीची डिश त्याला बरोबर घेऊन बनवता येईल. जर स्वयंपाकघरात आधीच एंट्री झाली नसेल तर या निमित्ताने करता येईल.

हा मोदी"जी" सारखा जी लावू नका.

आपल्या मराठीत देवालाही अरे जारे करतात.

लिस्टीतल्या फिजिकल आयडिया घ्या, बाकी पार्ट इग्नोर करा.

@पिहू१४

जर स्वयंपाकघरात आधीच एंट्री झाली नसेल तर या निमित्ताने करता येईल.
<<
वन ऑफ द बेस्टेस्ट सजेशन्स.

माझ्या डोक्यातून सुटलं कसं काय?!

डिड आय टेक इट फॉर ग्रांटेड??

But then again, considering his age, he might not consider as a gift. This suggestion is an LPT. "Life Pro-Tip", rather than a gift idea.

मी स्वतः वाचनवेडी आहे त्यालाही आवड आहे,आताचं समोरुन मागणी आलीय पुस्तक गिफ्ट हवय शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम यापैकी एक , आतापर्यंत छोटे मोठे पुस्तकं वाचून झाले आहे

आताचं समोरुन मागणी आलीय पुस्तक गिफ्ट हवय शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम यापैकी एक
<<
वा वा वा. पुस्तक तो बन्ताईच है. फॉर अ चेंज आंबेडकरांचं काहीतरी ओरिजिनल लिखाण द्या. पोट्टं रॅडिकल बनेल..

प्लस (पन्नास-)एक काही गिफ्ट द्या अजून.

स्वयंपाक घरात आधीच प्रवेश झालाय चहा,खिचडी, बटाटा भाजी, पोळी येते.पीठ स्वतः मळून ,कंटीग सुध्दा . वंशपरंपरागत आलेले गुण वाचनाचा माझ्या कडून आणि स्वयंपाकाचा अहो कडून (डोळा मारणारी बाहुली)

आंबेडकर द्या... पण १२ वा वाढदिवस आहे तर आवल मेल मधुन हॅरी पॉटरही (अजुन वाचलं नसेल तर) देऊ शकता. बरोबर हेडमास्टरांच्या सहीचं अ‍ॅडमिशन पत्रही जोडा.

वाह! भारीच आहे. मी खूप उशीरा स्वयंपाक शिकले याचं मला वाईट वाटत कधीकधी.
पुस्तक मागत असेल तर दिलीप कुलकर्णी यांचं हसरे पर्यावरण हे पुस्तक सुचवेन. यात सोप्या भाषेत मुलांना आवश्यक अशी पर्यावरणाची ओळख करून दिली आहे.

Boy deserves to have some fun . Don't overkill the sanskar bit. Mine craft God of war GTA FIFA call of duty are some nice games for PS four.

Minecraft लिहून खोडलं मी. Wink
त्या पुस्तकांची चर्चा प्रमाणे रोज रात्री आम्ही Minecraft ची चर्चा पण करतो. पण मनस्ताप ही काही कमी होत नाही.

मोबाईल वर free fire download आहे चारदोन दिवसातून खेळतो जास्त इंटरेस्ट नाही . बुद्धीबळ वैगरे सारखं पण एकट्याला जमतील असं .

हॅरी पॉटर किंवा त्याच्या आवडीच्या सिरिजचा क्लासिक/अँटिक बांधणी असलेला संच देऊ शकता.
चांगला, प्रो-क्वालिटीचा डार्ट बोर्ड
बो अ‍ॅन्ड अ‍ॅरो/आर्चरी सेट
आर्ट-क्राफ्टची आवड असल्यास कॅलिग्राफी सेट
शब्दकोडी/रिडल्स. वयानुसार सोपी/अवघड अशी भरपूर पुस्तकं मिळतात
गाणी ऐकायला आवडत असतील तर चांगल्या प्रतीचा ब्लुटूथ स्पीकर सेट किंवा हाय-एन्ड हेडफोनस
म्युझिकची आवड असेल तर इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड
अ‍ॅमेझॉन प्राइमवर त्याच्या आवडीचे चित्रपट किंवा डॉक्युसिरिज रेन्ट किंवा विकत घेउन
मोSSSSSSठा लेगो सेट

३डी बिल्डिन्ग सेट, टेलिस्कोप, बायनाक्युलर्स >>> +१

सायन्समध्ये रूची असेल तर जरा वरच्या लेवलची पण अभ्यासक्रमात नसलेली पुस्तकं - हे मुलांच्या दृष्टीनं बोरिंग गिफ्ट आहे. मी अशी गिफ्ट अश्विनीपौर्णिमेला देते Biggrin

त्या पुस्तकांची चर्चा प्रमाणे रोज रात्री आम्ही Minecraft ची चर्चा पण करतो. >>>>+1 त्यात NBA, ps4, Roblocks, Weeknd, Ariana Grande, (American pop stars) Avengers, Disney stars, American History, Tesla, World wars, सगळे नवीन PG13 movies या सगळ्या गोष्टी मी स्वतःला रूची नसूनही मुलांशी गप्पा मारता याव्यात म्हणून माहिती करून घेते, याबाबत वाचते व थोडंफार शिकते.
मला एक पालक म्हणून कमी आणि मित्र म्हणून अधिक रेलेव्हेंट रहायचयं.
मी मुलाला बाराव्या वर्षी The Boy's Body Book
दिले होते (वाढदिवसाला नाही), जे पौगंडावस्थेतील प्रश्न असतात ते तो मला किंवा बाबाला काही कारणाने विचारू शकला नाही तर त्यात वाचून कळावे म्हणून...
आजकाल मी मुलांना बजेट सांगते व तुम्हीच ठरवा काय हवं वाढदिवसाला म्हणते, मगं काहीही मागितले तरी नाही म्हणत नाही किंवा बजेट वाढवत नाही !!! (संस्काराचे दुकान बंद असते त्या दिवशी, जी ले अपनी जिंदगी दिवस Happy )

बाकी वर बरेच चांगले पर्याय आले आहेत.

३डी बिल्डिन्ग सेट, टेलिस्कोप, बायनाक्युलर्स >> मायक्रोस्कोप पण

टीनेजच्या सुरुवातीपासून माझ्या मुलांना स्वैपाकाची उपकरणे दिली आहेत : चाकू, मँडोलिन, ओल्ड फॅशनचे व्हिस्क , कॅपुचिनो साठी फेस बनवणारे फ्रॉथिंग टूल, यंदा एक कोरिअन स्टोनवेअर भांडं आहे लिस्टमधे.
रेसिपीची पुस्तके देऊ शकता

देशात असाल तर गड किल्ले ट्रेक ची आवड असेल तर तिथे पाठवा. पन सर्व सुरक्षिततेची काळ जी घेणार्‍या व ट्रेनिन्ग असलेल्या गृप बरोबर पाठवा. ही आईचा पदर सोडून एक स्वतंत्र पुरुष बनायची सुरुवात आहे. त्या अनुसार त्याला घरात व घराबाहेर उत्तम जगता येइल असे काही अनुभव त्याला द्या. पण मजा पण येउद्या. ट्रेक वर खड्ड्यातले पाणी पिणे, चुलीवर पोहे मॅगी बनवणे एंजॉय करु द्या.

उत्साह असेल तर एक छान शी पार्टी ठेवा वर्गातल्या मुलींना पण बोलवा.( बेबी क्रशेस) व बंडुल्याला मान्यवर ची शेरवानी नाहीतर एक मस्त पैकी डिझायनर सूट घ्या ( ट्क्सिडो जॅकेट वगैरे) त्याला एकदम मस्त ग्रोन अप वाटेल.

रू ट बीअर/ जिंजरेल/ ग्रोन अप फिंगर फूड, छोटासा डान्स फ्लोअर अशी थीम ठेवता येइल.

त्याचा ईंट्रेस्ट पण लक्षात घ्या.. आवडी प्रमाणे असले तरंच ते गिफ्ट ठरते नाहितर आई वडिलांचा अट्टहास ठरतो.

Surely You're Joking, Mr. Feynman! हे पुस्तक द्या. आवडेल त्याला.

थँक्यू सर्वांना , खुप लालूच दाखवूनही पुस्तकं हवं ह्या वर ठाम आहे. आता वरील तीन पैकी कोणाचे पुस्तक‌ देऊ समजेना म्हणून वाचनालयाचे वार्षिक सभासदत्व देण्याचे फायनल करण्यात आले आहे . आणि माझ्या कडून क्युब देणार आहे न सांगता. खुप छान पर्याय उपलब्ध झाले आहेत पुन्हा एकदा आभार

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
माझ्याही मुलाचा वाढदिवस लगेचच आहे. त्याला जवळच्याच स्पोर्ट्स क्लबची क्रिकेटची मेंबरशिप घेऊन देत आहे. सध्या काही दिवस त्यांनी ते बंद ठेवलेय. पण नंतर स्लॉट्स मिळत नाही.
बॅडमिंटन, टेनिसचे सर्व स्लॉट्स बुक आहेत. कुणी आरंभशूर गळाले कि बॅडमिंटनचा स्लॉट मिळू शकेल असे कळवले आहे. इथला अनुभव बघू कसा आहे ते.