दाटी

Submitted by स्मिता द on 27 May, 2009 - 06:16

दाटी

खुप झाली दाटी
करुया छाटणी म्हणालास
एक एक फांदी दुर केली
फ़ांदी भोवतालचे तंतु तर
आपोआप गेले
ही काढ...
ती पण काढ...
तुझ्या सुचना ऐकत गेले
मग हळु हळू लक्षात आले
तु हे दाटी कमी करण्यासाठी नाही करतेस
पुर्ण झाडच काढायचय तुला
बहुदा मुळापासुन...
कारण आत्ता पर्यंत ईतक्या
गर्द, गच्च दाटीतही कधी
दाटी झाली फ़ार
असा तुझा सुर नव्हता
म्हणायचास फ़क्त...
किती गर्द छान वाटतय ना....

गुलमोहर: 

छानच मांडलिये.

छानच मांडलय

नेमका अर्थ लागत नाहीये ! सांगशील तरच मस्त म्हणेन Happy

कुटुंब ?

पक्सशी सहमत Happy

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

धन्यवाद रैना, कविता..प्रकाश आणि विशाल

कवितेचा अर्थ सांगावा लागणं यासारख दुर्दैव नाही त्या कवितेच..असो
ही तो आणि ती अश्या दोघांच्या सबंधातली कविता आहे..तो दुरावतोय तिच्या पासुन पण सुरवातीला तिच्या हे लक्षात येत नाही परंतु त्याच्या वागण्याचा जसा जसा अर्थ उलगडायला लागतो तेव्हा लक्षात येते कि अरे याला आपण नकोय..आपल्यातला एक एक धागा किंवा फांदी तो अशी तोडुन टाकतोय्..बस यापेक्षा जास्ती काही नाही

बासुरे, मला हाच अर्थ लागला होता. छान आहे.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

मला एकत्रित कुटुंबाचा अर्थ लागला आधी...असो ! एकाच कवितेचे अनेक अर्थ असु शकतात. आणि ते कदाचित कविचे अभिप्रेत असतील असेही नाही.कविता आवडली .तू सांगीतलेला अर्थही तंतोतंत !

कवितेचा अर्थ सांगावा लागणं यासारख दुर्दैव नाही त्या कवितेच>>> असं काही नाही !
इथे(मायबोलीवर) ते शक्य आहे म्हणुन लोक विचारतात. कुठे जर पुस्तकात वाचली तर कोण जातेय विचारायला ? आपापले अर्थ लावून लोक रिकामे होतातच ना !

चू. भू. द्या घ्या Happy

छान कविता. अर्थ रेडीमेड असल्याने लावलाच नाही.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

बासुरी,
तुमची कविता खूप सुंदर आणि हळवी आहे. पण तुमच्या "कवितेचा अर्थ सांगावा लागणं यासारख दुर्दैव नाही त्या कवितेच" या विधानाशी मी सहमत नाही होऊ शकत. तो कवितेचा दोष नसतो. ज्यांना समजली नाही त्यांचाही नसतो. कवीची अनुभूती ही वाचकाचीही असण्याची शक्यता कमी असते. आणि ती अनुभूती आल्याखेरीज वाचक केवळ आपल्या परीने कवितेचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, हा अर्थ नसावा कदाचित. अशा परिस्थितीत त्याने कवीला अर्थ विचारला तर कवीने त्यात आपला पराभव न मानता आपल्याला अपेक्षित अर्थ सांगून वाचकाला त्या अनुभूतीत सामील करून घेण्याने दोघांनाही आनंद मिळेल.
शुभेच्छापूर्वक,
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

आवडली कविता.
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी

व्यक्तीमधलं गुंतलेपण संपत आलं की हे असच होत राहतं.
मग ते कुटुंबातले असो किंवा मैत्रीतले असो. आशयाला धरून.

बासुरी, किती कमी शब्दांत किती अर्थांची दाटी.... बहोत खूब.
कवितेच्या अर्थाचं म्हणशील तर अशा रूपकात्मक कविता प्रत्येक वाचणार्‍याला वेगवेगळ्या अर्थाचं वलय दाखवतात. माझ्यासारखा एखादा वाचक हे ही जाणून घ्यायला उत्सुक असतो की... ह्यातलं किंवा ह्याहून कोणतं वेगळं वलय मनात घुमलं कवीच्या... ह्या शब्दांत उतरताना?

"किती गर्द छान वाटतय ना" पासूनचा " खूप झाली दाटी" हा प्रवास छानच मांडलाय.
प्रश्नचिन्हाचा सिग्नल मला तरी आडवा आल्याच जाणवलं नाही .

<<कवितेचा अर्थ सांगावा लागणं यासारख दुर्दैव नाही त्या कवितेच..असो>>

बासुरी, वेडी आहेस का? मला सांग ग्रेसच्या कविता सगळ्यांनाच पुर्णपणे उमजतात का? जी. ए. सरांचं लेखन सगळ्यांनाच कळतं का? त्याचा अर्थ ते त्या कवितांचं किंवा लेखनाचं अपयश असं होत नाही. तुला अपेक्षित अर्थ लागला होता मलाही. पण होतं काय की कविता वाचताना प्रत्येक जण तिच्याकडे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातुन पाहात असतो, त्याप्रमाणे अर्थ लावतो. तो योग्यही असु शकतो अयोग्यही. इथे तुझ्या कवितेची ग्रेस अथवा जी.ए. सरांच्या लेखनाशी तुलना करण्याचा हेतु अजिबात नाही. फक्त तुला अभिप्रेत असणारा अर्थ आम्हालाही उमजावा हिच इच्छा होती. मग ती कविता कळणे, जगणे जास्त सोपे होते. तु नेहेमी सुंदर लिहीतेस. त्यामागच्या कल्पना, संकल्पना सुरेख असतात, अभिनव असतात म्हणुन हा प्रपंच.
असेच लिहीत राहा याच शुभेच्छा !

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

धन्यवाद स्वर, अश्विनी, कौतुक, कर्णिक, क्रांती, दाद,प्रकाश , विशाल आणि bhaanasa...:)

कर्णिक, प्रकाश आणि विशाल खुप सुरेख समजावुन सांगीतले..:)

दाद नेहमी प्रमाणे खुप छान..:)