प्रवाशांच्या सेवेसाठी_अर्थात एस. टी......!

Submitted by यक्ष on 25 November, 2021 - 02:02

सध्या चाळिशीच्या वर असलेल्या बहुतेक मराठीजनांन्ना 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे वाक्य म्हणजे त्यांच्या जुन्या आठवणींशी पट्कन connect करणारे असावे....

एस. टी....यष्टि....लालपरी !

एकदा एकजण एस. टी चौकशी काउंटरपाशी एक उद्दाम प्रवासी 'तो अमुक अमुक ठिकाणी जाणारा लाल डबा केंव्हा उगवणार आहे हो?' अशा तिरकस प्रश्नाला ' साहेब तुम्ही शिकलेले नाही दिसत ! तुम्हाला एस. टी बद्दल माहीती हवी असेल तर देतो....लाल डबा म्हणजे काय?' असे तत्परतेने उत्तर देणारा काउंटरवरचा कर्मचारी अजूनही स्मरणात आहे.

एस. टी. च्या 'सुरक्षित आणि अपघात विरहित बस सेवा' ह्या वाक्यावर अजूनही विश्वास आहे!

माझ्या लहानपणापासून ते पुढील शिक्षण व करिअर च्या सुरुवतीच्या प्रवासाचा साक्षिदार एस. टी आहे आणी ह्याबद्दल मी एस. टी. चा आयुष्यभार ऋणी राहीन... नवीन पिढीचे टोमणे दुर्लक्षून मी अजूनही शक्य तेंव्हा एस. टी. प्रवास करत जुन्या आठवणी जाग्या करतो.

निमित्त आहे आज दैनिक सकाळ मध्ये श्रीमान ब्रिटिश नंदी ह्यांचा 'बहुजनहिताय बहुजनसुखाय्' ह्या मनाला स्पर्शून जाणार्‍या लेखाचे!
आजची एस. टी. व परिवाराची दुर्दशा मन हेलावून टाकणारी आहे. कोण, कुणामुळे, कशामुळे ह्यात मला जायचे नाही.
ज्यांचे एस. टी. वर प्रेम आहे त्यांनी हा लेख जरूर वाचावा असे सुचवेन....

एस. टी. ने मला जे दिले त्याबदल्यात मलाही काही करता येईल का ? असे वाटते....एक सामान्य नागरिक म्हणून करण्याला मर्यादा अहेत पण एखादी संधी मिळाल्यास जरूर करेन!

तोपर्यंत सगळ्या निर्णय कर्त्यांनी सहानुभुतीपुर्वक विचार करावा अशी नम्र विनंती!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहणत.
एस्टी ही अगणित आडगांवात फक्त वाहतुकीचं साधन नसून ती जीवनाचा एक अविभाज्य भाग असते. एस्टीच्या वेळेशी गांवाचीच नाहीं तर घराघरातील कामंही जोडली गेलीं असतात.

अगदी पटलं.
सध्याच्या एसटी च्या स्थिती बद्दल काय करता येईल हे माहीत नाही.पण अजूनही शक्यतो राज्य परिवहन मंडळाच्याच वाहनाने लांब ठिकाणी जातो.प्रायव्हेट ट्रॅव्हल वर विश्वास ठेवावासा वाटत नाही.

2012 नंतर दर 5 वर्षांनी नवीन काँट्रॅकत करून पगाराचा स्लॅब वाढवणे हे मागच्या सरकारने केले नाही , असे काल एक एसी सिटी बसचा कंदत्तर बोलला( ह्यांचा संप नाही) . आमच्या दिपार्टमेंटचेही हेच असल्याने तो काय बोलला , हे मला लगेच समजले. आताची ही पगारवाढ 2017 ला होणे अपेक्षित होते. साधारण 5000 प्रतिमाह , एक वर्षाचे 60000 व 5 वर्षाचे अंदाजे 3 लाख होतात. इतके प्रत्येक कर्मचार्याचे नुकसान केलेले आहे.
-------------
मागच्या भाजप फडणवीस सरकारचे हे पाप आहे,

ह्या महायुती सरकारने आता निदान ह्या टर्ममधली तरी एक स्लॅब वाढ जाहीर केलेली आहे. 41 % की काहीतरी.

दिवसेंदिवस देशाच्या तिजोरीवरचा सामान्य लोकांचा अधिकार संपत जाईल , असे निर्णय घेतले जात आहेत. पूर्वीच्या काळीही राजेशाहित 10000 वर्षे हेच घडले आहे, जनतेने फक्त कर भरणे व राजाकडे टेम्पररी नोकर्या करणे, राजघराणे मात्र कायमस्वरूपी नोकरीवर. 1947 नंतर लोकशाही आली आणि जनतेकडे पैसा येऊ लागला. पण वाजपेयी सरकारने पेन्शन बंद केली, मोदी सरकारने नोकर्या व पगार बंद केले. म्हणजे सरकार फक्त आमदार खासदारांना पेन्शन व पगार देणार.पुन्हा गाडे लोकशाहीकडून राजेशाहीकडे सुरू आहे. पेन्शन सोडा, गॅसची सबसिडी सोडा, हे सोडा, ते सोडा, आम्हाला मात्र कोविडच्या नावाने आणि मंदिराच्या नावाने पैसा द्या.

--

एसटी नी लोकांना खूप काही दिले.
1) कुठे डोंगराच्या पायथ्याशी एकट्या लहान गावात पण एसटी च जायची रात्री मुक्कामाला.
कोणतेच साधन नसलेल्या त्या गावातील लोकांना तोट्यात जावून एसटी नी आपलेपणा नी सेवा दिली.
२) गाव खेड्या तील , वाड्या ,वस्तीतील मुलांना शाळा ,कॉलेज मध्ये सुरक्षित तीच पोचवत होती
३) लांबच्या प्रवासात गाडी खराब झाली तर प्रवाशांना काळजी करायचे काहीच कारण नसायचे दुसरी एसटी सेवेला हजर असायची.
जेव्हा एसटी ऐन भरात होती तेव्हाची एसटी स्टँड,ती लोकांची गर्दी,प्रतेक स्टँड मध्ये असलेले कॅन्टीन लोकांना अहोरात्र अन्न पुरवायचे.
अजुन ते आठवतेय.
आता एसटी ची अवस्था कठीण झाली आहे त्याला राजकीय कारणच आहेत.

एस.टी. आणि भारतीय पोस्ट खाते यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ते हसतमुखाने चांगली सर्व्हिस देतात.