माझं ते दीक्षित डाएट

Submitted by चैतन्य रासकर on 23 November, 2021 - 07:13

माझं ते दीक्षित डाएट चालू असताना
तू चीझ बर्स्ट पिझ्झा खातेस
अन माझ्या त्या ढेरीकडे
कुत्सित नजरेने बघतेस

सकाळचा नाश्ता करायचा नाही
असं ठरलं होतं आपलं
बटाट्याचे वडे तळताना
तुला काहीच कसं नाही वाटलं?

दिवसातून फक्त दोनदा जेवणार होतो
कमी गोड कमी खाणार होतो
तुझ्या या साजूक तुपातल्या बिर्याणीचं
मी काय बरं करणार होतो?

सोळा तास लंघन करायचं होतं
हाल्फ चड्डीवर पळायचं होतं
त्या इन्शुलीनला फैलावर धरून
ताळ्यावर आणायचं होतं

पण तू मास्टरचेफ बघू लागलीस...

पण तू मास्टरचेफ बघू लागलीस
किचन ओटा ही तेलकट करू लागलीस
बिनसाखरेच्या चहा सोबत
मैद्याच्या कुकीज देऊ लागलीस??!!

आता दोन जेवणामध्ये काही खायचं नाही
सारखं फ्रिज उघडून बघायचं नाही
तू डोळ्यांची भाषा शिकून घे
बोलायला सुद्धा तोंड उघडायचं नाही

तुझे ते मैदा,साखरेचे डबे फेकून देणार
माझी तरी ढेरी नाही कुरवाळणार
तू जेवायला काही ही वाढ
मी फक्त पंचाव्वन मिनिटेच जेवणार

मी फक्त पंचाव्वन मिनिटेच जेवणार...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसातून फक्त दोनदा जेवणार होतो
कमी गोड कमी खाणार होतो
तुझ्या या साजूक तुपातल्या बिर्याणीचं
मी काय बरं करणार होतो?
>>

म्हणजे दीक्षित डाएट तुम्हाला कळलंच नाही.

दिवसातून दोन वेळा हवं ते, हवं तेवढं खाणे, मधल्या वेळात काय काय चालतं याची व्हॉट्सएपवर माहिती मिळवणे आणि गणपतीला भरेपट मोदक हाणले तरी शुगर 140 च्या वर वाढली नाही असे सांगणे म्हणजे दीक्षित डाएट.

आता असे करून पहा आणि नवी कविता लिहा Wink

काही डायट वैगेरे करायची गरज नाही आता च पाच पंचवीस वर्ष पासून ह्या diet नावाचे फॅड आले आहे.
आणि आहार तज्ञ ना सोन्याचे दिवस आले आहेत.
जेवढी भूक आहे तेवढेच खा,जास्त प्रक्रिया केलेले अन्न,पिझ्झा,बर्गर,cold drinks, दारू हे टाळा.
नियमित व्यायाम करा ,बस बाकी काही करायची गरज नाही.