आलू साग-पुरीसाठी

Submitted by mrunali.samad on 21 November, 2021 - 08:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

● दोन मध्यम आकाराचे बटाटे
● तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून
● कडिपत्ता
● तीन-चार हिरव्या मिरच्या
● मोहरी
● चणा डाळ अर्धा छोटा चमचा
● मीठ
● हळद
● बेसन एक चमचा
● तेल
● कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

● कुकरमधे दोन चमचे तेल तापवून घ्या.
● तापलेल्या तेलात मोहरी,चणा डाळ, हिरव्या मिरच्या,
कडिपत्ता टाकून परतून घ्या
● आता चिरलेला कांदा टाकून पाच मिनटे छान परतून घ्या.
● चिरलेले बटाटे घालून परतून घ्या.
● हळद घाला आणि मीठ चवीपुरते.
● पाव ग्लास पाणी घाला.
● कुकरला तीन शिट्ट्या करून घ्या.
● एक चमचा बेसन आर्धी वाटी पाण्यात मिक्स करून घ्या.
● कुकर गार झाल्यावर, हे बेसन कुकरमध्ये घाला.
● आता पाच-दहा मिनटे बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत मंद
गॅसवर असू द्या.
● शेवटी कोथिंबीर बारीक चिरून वरून घाला.
● आता गरमगरम पुर्या तळा आणि आलु साग-पुरी चा
आस्वाद घ्या.
IMG_20211121_191006.JPG
आजच केले होते. पुर्या देखण्या नाहीएत.चालवून घ्या. Wink

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाण दोन मोठी आणि दोन छोट्या माणसांच्या नाष्ट्याचे आहे.
माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ तुझ्यावर विश्वास ठेउन करून बघणार आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच वाचतेय बटाटा भाजीत बेसन पण combination हिट आहे कारण बटाटावडा खातोच आपण आवडीने. अस्मिता चा फोटो पण सहीच आहे.

होय, इकडे पण रस्त्यावर नाष्टा सेंटरमधे आणि हॉटेलात अशी भाजी मिळते पुरीसोबत.

मृ तुझ्यावर विश्वास ठेउन करून बघणार आहे. >> मी पण .
छान वाटतेय रेसिपी . धन्यवाद विस्तृत रेसिपीबद्दल.
करून पाहिली की फोटोरुपी गुरुदक्षिणा पाठवीन .
अस्मिता छान दिसतेय तुझी डिश .

लै भारी. नवीन व्हेरीएशन आहे ट्राय करुन बघायला हवे. अजुन एक नवी चव अ‍ॅड होणार.
वेगवेगळ्या प्रदेशातील खाल्लेली आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, हरयाणा, पंजाब, गुजरात.

फोटोमधील भाजीचा रंग अजिबात आवडला नाही कारण ती पिठल्यासारखी दिसते आणि पिठलं is poison for me. तो गुंइगुंइ पदार्थ अजिबात आवडत नाही.
तर ही भाजीची रेसिपी आवडली आहे, पण लाल रंग होईल अशी बनवण्यात येईल. थोडं चमचाभर बेसनही हैदराबाद स्टाईल भाजीच्या टेक्स्चरसाठी घालण्यात येईल. पण चमचाभरच.

आत्ताच केली. मस्त चव आहे. कृतीबद्दल धन्यवाद Happy
फोडणी आणि परतणे इ. पातेल्यात करून मग ते पातेले कूकर मधे ठेवून भाजी शिजवली. एरवी बटाटा फारसा न खाणार्‍या माझ्या मुलीने पण आवडीने खाल्ली.

काल शेफ अजय गुप्ता ह्यांची बेडमी पुरी व भाजीची रेसीपी पाहिली. ह्या भाजीत देखील त्यांनी फोडणीतच दोन चमचे बेसन खरपूस भाजून घेतले आहे. व बेसन लाडवांचा बेसन भाजायचा वास असतो तितके भाजून घ्या असे सांगितले आहे. पुरी व भाजी उत्तम आहे. बिना कांदा लसून आले अशी जरा पातळ भजी आहे. चोप्रा ह्यांच्या चॅनेल वर बघा नक्की. भाजीला दाट पणा यायला बेसन घातले आहे.

Pages