आस मनाला, पुढच्या क्षणाला, समोर येऊ दोघे...

Submitted by देवभुबाबा on 20 November, 2021 - 04:02

आस मनाला, पुढच्या क्षणाला, समोर येऊ दोघे...

आठवणींच्या पुस्तकातली पालटली अनेक पाने...

तुलाच आठवून, आळवले ओठी, ओढ-मनीचे गाणे...

नाजूक डोळे, गौरकांतीला नक्षत्रांचे लेणें...

मनात भरले, सौन्दर्याचे, नटलेले ते सोने...

क्षणात विरले, पाण्यात भरले, डोळ्यांवरचे हसु...

कुजबुजलेल्या ओठांवरचे शब्द ना आळवत बसु...

आस मनाला, पुढच्या क्षणाला, समोर येऊ दोघे...

भिडतील पुन्हा, जुळतील पुन्हा मनोमानीचे धागे...

पाहशील ना, बोलशील ना, गुपित सारे सारे...

भेटशील ना, ऐकशील ना, मनाचे सार सारे...

Group content visibility: 
Use group defaults