अवचित गवसावे काही जे..

Submitted by अनन्त्_यात्री on 17 November, 2021 - 04:14

प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला डिवचून नव्या
उत्तरास
शोधत यावा

वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून पुरत्या पुसून जाव्या
सार्‍या
हळव्या खुणा

सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास

अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या

Group content visibility: 
Use group defaults

>>>>अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या

सुंदर कडवे.

सुंदर...