स्वप्न तुझें, स्वप्न माझे, स्वप्नवत पाहशील तु...

Submitted by देवभुबाबा on 17 November, 2021 - 01:16

जपेन मी तुला, अशीच मनात रहा...
डोळे बंद करशील तेव्हा, मला आठवून पहा...

जेव्हा जेव्हा आठवशील, तू सहजच हसशील...
आरश्यात पाहुन केसांवरती, हात फिरवशील...

कुणी तुला पाहतंय का?, याची तुला भीती वाटेल...
डोळ्यांआडून लपंडाव, प्रतिबिंबात दाटेल ...

हळूच छोटी टिकली काढून, कपाळावर लाव...
चाहुल लागताच येण्याची, दाराकडे धाव...

गडगडणाऱ्या नभांतुन, बरसेन मी...
कडाडणाऱ्या विजेसंगे, कोसळेन मी...

तळपणाऱ्या सुर्यासंगे, तळपेंन मी...
सळसळणाऱ्या वाऱ्यासंगे, हरपेन मी...

तुला जाणीव होईल, स्पर्शाने...
तू फुलून येशील, हर्षाने ...

आठवणींच्या जगामध्ये, आपणच असु...
चंद्रकोरीच्या झोपाळ्यात, काही वेळ बसु...

हिंदोळे घेताना, चांदण्यात रमशील तु ...
स्वप्न तुझें, स्वप्न माझे, स्वप्नवत पाहशील तु...

Group content visibility: 
Use group defaults