किनखापी आभाळाने

Submitted by अनन्त्_यात्री on 12 November, 2021 - 11:44

किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र

क्षणथेंब शिंपुनी दमले
काळाचे घटिकापात्र

थोपवल्या आवेगांच्या
डोहात बुडाली रात्र

रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र

जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?

Group content visibility: 
Use group defaults

वा !! आवडलं !
का कोण जाणे पण.. हे वाचताना मला..

" घरभर सरणाचे पात्र सांडूनि जाई...
फिरुनी फिरुनी माझा वंश निर्वंश होई ! "

हे सारखं आठवत होतं !

किनखापी रुपेरी जरीच्या वेलबुट्टीचें काम केलेलें रेशमी कापड. कवीला म्हणायचंय आभाळात रुपेरी ढग आल्याने ते किनखापी कापडासारखे दिसतंय. Lol

छान..
अर्थ काय घ्यावा या कवितेचा?
पाऊस न पडल्याने पावसाळा कोरडा गेला
आणि त्यामुळे कायम अन्न देणारे शेत (अक्षयपात्र) सुकून गेले( फुटले)
दुष्काळाचे अघोरी पिशाच्च जागवून शेतकऱ्याचा बळी गेला..
असे सुचवायचे आहे का?
आजनकाल पेपर वाचुन हेच रसग्रहण होते. आणि शब्द ही चपखल बसतात इथे.
कविराज .. काही चुकले असेल तर क्षमा करा

या कवितेबद्दल थोडंसं:

साधारण ३ वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीबाहेरच्या रस्त्यावर अनेक धडपडणारे चित्रकार स्वत:ची चित्रे मांडून बसतात त्यातील एकाचे- साल्वादोर दाली शैलीचे surrealist चित्र बघताक्षणी भिडले होते. एका धूसर, काळपट, मनावर दडपण आणेल अशा अवकाशातल्या, एकमेकांशी सकृत् दर्शनी संबंध नसलेल्या चित्राकृतींचे (लाल पिवळ्या तार्‍यांनी गजबजलेले वितळते आकाश, ana-digi hour glass, सांडव्यावरून पाणी जाणारा धरणडोह, perpetual motion machine, अणुस्फोटानंतरचा मश्रूम ढग इ.) ते एक वेधक चित्रण होते.

त्या चित्राचा शब्दानुवाद करण्याचा ओबडधोबड प्रयत्न म्हणजे ही कविता(?). चित्राच्या चौकटीच्या जागी कवितेत त्रान्त यमक आहे,

विविध चित्रशैलींबद्दल माझ्यासारख्या अनभिज्ञांना माहिती देणारे सुगम मराठी लेखन माबोवर कोणी केले असल्यास कृपया तपशील द्यावे .