कॅलिग्राफी

Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच बोकलत!
ते तेवढं शाह'सू'नो करा. (दीर्घ)
म्हणजे मला तरी तो दीर्घ उकार वाटतो. गूगल केलं तर दोन्ही दिसतायत. अधिकृतपणे कुठला आहे ते बघा.

बोकलत सुरेख जमून आली आहे कॅलिग्राफी.

शालीदा जुना माबो आयडी. ते सुद्धा सुंदर कॅलिग्राफी करतात. आता ते माबोवर नाहीत.
त्यांच्या personal blog वर एकदा भेट देउन बघा.

मनीमोहोर, स्वस्ति, वावे आणि वीरू तुम्हा सगक्यांचे खूप खूप आभार.
हो वावे मलाही तेच वाटतंय की तो दीर्घ असायला हवा. कारण राजमुद्रेवर तो दीर्घ आहे. पण मी नेटवर बघितलं तिथे बहुतेक ठिकाणी तो ऱ्हस्व आहे त्यामुळे मी गोंधळून गेलो.

स्वतः च नाव इतक्या सुंदर अक्षरात बघून टडोपा Happy .
राजमुद्रा मस्तच, ते उकरांचे stroks फारच भारी दिसत आहेत.

स्वतः च नाव इतक्या सुंदर अक्षरात बघून टडोपा Happy .
राजमुद्रा मस्तच, ते उकरांचे stroks फारच भारी दिसत आहेत.>>>+1 Happy

सुं द र.
आधीच तुमचं अक्षर देखणं ,रेखीव त्यात ही कलाकारी ही सुंदर जमलीय.
वरची राजमुद्रा छानच !

बोकलत, मस्तच!
अजून येऊ द्या.

मराठीतली इ, द, क्ष, र, स, इत्यादी अक्षरे पल्लेदार कॅलिग्रॅफीत लिहिलेली बघायला खूप छान वाटतात.

अक्षरांचे लोंबकळणारे पाय, मात्रा, वेलांट्या, सुटी टोकं कुठेतरी कशीही वळवली/ लांबवली की झाले सुलेखन असा माझा समज होत आहे.

कौशल्य वाढलंय.
शेवटचा तिरका फटकारा मारून निब वर उचलल्याने ओघळ दिसत नाही. स्पष्ट रेघ आली आहे.

पण हे लिहायचे कसे? म्हणजे की स्क्रीनवर लिहिले तर तो स्क्रीनशॉट फोटो वाटसप माध्यमातून पाठवता येतो हे खरंय.
पण इथेही तो फोटोच द्यावा लागतो. राइटिंग बॉक्समध्ये आपण टंकून लिहितो त्या फॉन्टमध्ये जमत नाही.

धन्यवाद शालीदा आणि srd Happy
Srd, कोरल आणि फोटोशॉपमध्ये तसा काही ऑप्शन आहे असं ऐकून आहे जेणेकरून आपण स्वतःचा फॉन्ट बनवू शकतो. मला याबाबत जास्त माहिती नाही. पण हाताने जी लिहिण्यात मजा आहे ती कीबोर्डवर टाईप करण्यात नाही.

कौशल्य वाढलंय. <<< म्हणजे "अक्षरांचे लोंबकळणारे पाय, मात्रा, वेलांट्या, सुटी टोकं कुठेतरी कशीही वळवली/ लांबवली की झाले सुलेखन असा माझा समज होत आहे." असे नसावे. Happy

जगदंब मस्त जमलं.
त्या पानावर शालीनी पण छान लिहिले आहे.

Pages