सर्वांमध्ये नसते हिम्मत, कठोर निर्णय घ्यायला...

Submitted by सुर्या--- on 22 October, 2021 - 07:10

तुझ्या मनात जागा केली, तेव्हाच मी जिंकलो...

सोबत नसली तरीही, मनातून मी जिंकलो...

असेल तुझीही मजबुरी, नकार मला द्यायला...

सर्वांमध्ये नसते हिम्मत, कठोर निर्णय घ्यायला...

वेळ सरली, आयुष्याला वेगळे वळण लाभले...

संसारात हवे नको ते, सर्व तुला लाभले...

तरीही एक कोपरा मनाचा, कायमच खाली असेल...

एकांतातील आठवणीत, तिथे मीच असेंन...

आठवणींचे क्षण तुला नक्कीच सुखावतील...

मी तसा वाईट नव्हतोच, ज्या आठवणी माझ्या दुखावतील...

आता खूप पुढे गेलोय, मागे वळून पाहताना...

आयुष्यही थोडंच उरलय, स्वप्नात तुला पाहताना...

कधी वाटलंच तर, थोडी हिम्मत नक्की कर...

भेट नाही, बोलणं नाही, छोटासा message गुपचूप कर...

तुझी खुशाली कळव, माझे हाल विचार...

क्षणिक सुख देऊन, जीवनाचं सार्थक माझ्या कर...

Group content visibility: 
Use group defaults