अलिगढ - 'खाजगीपण' , 'समलैंगिकता' या विषयांवरील भाष्य करणारा प्रभावी चित्रपट

Submitted by सामो on 18 October, 2021 - 04:19

मायबोलीवरती 'अलिगढ' सिनेमाचा रिव्ह्यु शोधला. सापडला नाही. कोणाला माहीत असेल तर द्यावा. मी हा लेख तेथे कमेंट म्हणुन टाकेन. कारण २०१५ चा सिनेमा आहे. पण मी आत्ता पाहीला.
-------------------------------------------------------------------

https://m.media-amazon.com/images/M/MV5BZDUzYTRjMDAtNDkwMi00ZWY1LWI1OWEtM2VjY2NjNzNhOTRmXkEyXkFqcGdeQXVyMTExNDQ2MTI@._V1_FMjpg_UX1000_.jpg
.
काल 'अलिगढ ' हा सिनेमा पाहीला. सत्य घटनेवरती आधारित हा सिनेमा, मनोज बाजपाईने अक्षरक्षः भूमिकेचे सोने केलेला. सिनेमाची सुरुवातच धुक्याने वेढलेल्या एका शहरातल्या रस्त्याने होते. रस्त्यांवरच्या बल्बचा डिप्रेसिंग प्रकाश. एक हातरिक्षेवाला रिक्षा चालवत येतो. मागे मनोज बाजपाई अर्थात ' प्राध्यापक सिरस' बसलेले असतात. दोघे उतरतात व सिरस यांच्या घरामध्ये जातात. मग कट-कट-कट-कट सिरस यांच्या घरात दिवा चालू होतो-बंद होतो चालू होतो - बंद होतो. आपल्याला माहीत नाही खोलीत नक्की काय चालले आहे.
आता इतक्या रात्री रस्त्यावरुन अर्वाच्य गप्पा मारणारे, २ तरुण येतात व "या दोघांचे अजुन चालूच आहे वाटतं" वगैरे बोलत सिरस यांच्या घरात घुसतात. काही तरी गलबला होतो
आणि हा गलबला काय होता हे सिनेमात हळूहळू संथपणे उलगडत जाते. एका बाजूला प्रेक्षकांना गलबल्याचे कारण कळत जाते तर दुसरीकडे सिनेमाभर प्राध्यापक सिरस यांचे संवेदनशील, कविमन, हळवे व्यक्तीमत्व उलगडत जाते. प्रेक्षक, प्राध्यापकांच्या जीवनात, अधिकाधिक गुंतत जातो व जसजसे हे पात्र कळत जाते, प्रेक्षकांच्या घशात अक्षरक्षः आवंढा दाटून फक्त, ते त्या रात्री प्राध्यापक सिरस यांच्या झालेल्या विटंबनेमुळे. 'समलैंगिकता' या विषयावरच्या अतिशय संवेदनशीलतेने हाताळल्या गेलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा.
हा सिनेमा जितका 'समलैंगिकता' विषयाबद्दल आहे तितकाच 'मॉरल पोलिसिंग' अर्थात संस्कृतीचा ठेका घेतलेल्या मक्तेदारांविषयी आहे. तितकाच ' 'वैयक्तिक खाजगीपण' या विषयावर भाष्य करणारा आहे. अगदी लहान गोष्ट आहे - घरामध्ये २ भाडेकरु रहात आहेत. एक बाहेर गेल्यावरती, त्याची परवानगी न घेता, दुसर्‍या भाडेकरुने त्याची खोली वापरणे असो की दुसर्‍याच्या बेडरुम मध्ये शिरुन त्या व्यक्तीचे खाजगी क्षण कॅमेर्‍यात त्या व्यक्तीच्या नकळत टिपून घेणे असो.
प्रेम, आकर्षण यांची भाषा एकच आहे, वैश्विक आहे, मग ते 'भिन्नलिंगी' असो वा 'समलैंगिक' हेसुद्धा काही प्रसंगांतून हिंट केलेले आहे. हा आणि असा रिव्ह्यु तुम्हाला कुठेही मिळेले उदा - http://www.pahawemanache.com/review/aligarh-2016-review
.
पण आता मी कसे रिलेट केले ते सांगते -प्राध्यापक शिरस हा कविमनुष्य आहे. खूप संवेदनशील आहे. त्यांचे एक कवितेचे पुस्तक छापलेले आहे - 'पायाखालची हिरवळ'. ६४ वयाचा-एकटा रहाणारा-अंतर्मुख-कवि मनाचा आहे. त्यांचा कटुपणाही लाऊडली व्यक्त होतच नाही तर एक मूक आक्रोश, त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसत रहातो. मनोज बाजपाईचा हा अभिनय निव्वळ अफाट आहे. त्याचे डोळे, चालणे-बोलणे-उठणे-बसणे हाच आक्रोश आहे. कोर्टातही विचारले गेलेले प्रश्न 'मग तुमच्या पुरुष कोण होता?' ' ६४ व्या वर्षी लैंगिक सुखाची एवढी भूक?' - हे असे प्रश्न म्हणजे मानसिक बलात्कार आहे.
मला आवडलेला आणि ताकदवान वाटलेला एकच प्रसंग निवडण्यास सांगीतला तर मला तसे करता येणार नाही पण प्रयत्न करते. - एका पार्टीमध्ये सिरस गेलेले दाखवलेले आहेत. या पार्टीत कोण्या एका गाण्यावरती एक पुरुष लाजत , मुरकत नाचताना दाखविलेला आहे. ते गाणे, सिरस एन्जॉय करतात. काय अभिनय आहे मनोज बाजपाईचा.
एका वार्ताहाराची भूमिका केलेल्या, राजकुमार रावचा अभिनयही दमदार आहे, मनोज बाजपाईसमोर उभे रहाणे कोण्या ऐर्‍या गैर्‍याचे काम नाहीच.
नसेल पाहीला तर हा सिनेमा, जरुर पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टवणे, वरचा प्रतिसाद आवडला. चित्रपटांविषयी चर्चा करताना, मुख्यतः बायोग्राफी वगैरे असेल तर काही गोष्टी नकळत स्पॉयलर ठरू शकतात. आपला पहिला प्रतिसाद नकळत का होईना पण स्पॉइलर होता. आता तो एडिट होईल का नाही ठाऊक नाही पण हा लेख व प्रतिक्रिया वाचून एखाद्याने चित्रपट पाहायला घेतला तर त्या व्यक्तीला नक्कीच फरक जाणवणार. बराच काळ लोटल्याने मला आता या चित्रपटातले सगळे काही आठवत नाही आहे पण हा चित्रपटातील महत्त्वाचा प्रसंग आहे हे मात्र खरं.

@फिल्मी, लोकांना ही बातमी माहिती नसेल हे माझ्या डोक्यात आले नाही.

वरच्या लेखात राजकुमार राव यांचे पात्र एका पत्रकारावर बेतलेले आहे असे लिहिलेले दिसते. एक्स्प्रेसच्या दीपू सेबास्टिएन नावाच्या पत्रकाराने या बातमीचा पुरवठा केला होता. कदाचित या पत्रकारावर हे पात्र बेतलेले असेल.
स्पॉइलर अ‍ॅलर्ट

मी इंग्रजी फक्त इंडियन एक्स्प्रेस वाचतो. बाकी कोणी हे कव्हर केले नसेल ही शक्यता डोक्यात आली नाही. पण चित्रपट आला तेव्हाही त्या अनुषंगाने त्यांच्याबद्दल लिहून आलं नसेल?

'पायाखाली हिरवळ' काव्यसंग्रह (ई-बुक) बुकगंगेवर मिळाला.

आता ही पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे यांसारख्या ओळी अधिकच खिन्न करतात वाचताना:

केव्हातरी तुटलेल्या तारा सहज निखळून पडल्या
उल्का बनून स्वप्न झालेल्या
घटना शिल्लक आहेत - त्यांचे काव्य नष्ट झाले आहे

एका वळणावरती ओढ्याच्या, जे भेटले होते शब्द
स्वतःतच मश्गुल झालेले
फडफड उरली आहे - आता फक्त पंख कापायचे आहेत

Pages