सांग ना सये, ऐकशील का?

Submitted by सुर्या--- on 15 October, 2021 - 23:35

माझ्या कविता तुला साद घालतात,

सांग ना सये, ऐकशील का?

उचंबळून येणाऱ्या आठवणी शब्दांमध्ये सांगतात....

पाठी फिरुनी फक्त एकदा बोलना, सांग ना सये, ऐकशील का?

गहिवरलेल्या मनातून आणि दाटून आलेल्या कंठातून,

शब्द नाही फुटणार...

हृदयातून हळहळणारा मी, मुक्यानेच साद घालेन...

जाणीव होईल तुलाही तेव्हा, सांग ना सये, ऐकशील का?

एकांतात तुला भेटतील चांदण्या, स्पर्शून जाईल हवा...

मी सुद्धा तेव्हाच, मोजत असेंन चांदण्या,

जी कमी पडेल मोजण्यात, तीच गुंतलेली असेल तुझ्याशी बोलण्यात...

तुझ्या मनातील भावना, तिला तरी सांगशील का? सांग ना सये, ऐकशील का?

तीच मला सांगेल तुझ्या मनीचे गुपित...

पुन्हा मी तिलाच सांगेन आणि धाडेन गुपचूप निरोप,

तिचंतरी थोडं म्हणणं, एकांतात ऐकशील का?

सांग ना सये, ऐकशील का?

चांदणीसुद्धा थकेल, म्हणेल आता तुम्हीच बोला....

तेव्हा छतावर बसू आपण दोघे...

पाठीला पाठ टेकून आभार मानु तिचे...

सांग ना सये, ऐकशील का?

तेव्हाही कदाचित तू बोलणार नाहीस आणि

माझेही धाडस होणार नाही...

मग मान वर करून मी त्या चांदणीशीच हसेन...

सांग ना सये, ऐकशील का?

पुन्हा तिला सांगून धाडेन एक निरोप...

ऐकण्यासाठी माझे मन, समोर माझ्या येशील का?

सांग ना सये, तेव्हातरी चांदणीच त्या ऐकशील का?

Group content visibility: 
Use group defaults