सेलेब्रेटींविषयी पसरवली जाणारी खरी खोटी माहिती.

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2021 - 13:40

आमच्या शेजारी राहणार्‍या काकूंना कालपरवापर्यंत असेच वाटत होते की कधीच भारताला आणि भारतीयांना मदत न करणार्‍या शाहरूख खानने पाकिस्तानला अमुक तमुक कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे त्यांनी शाहरूख खानचे चित्रपट घरात बघणे केव्हाचेच बंद केले होते. त्यामुळे शाहरूख खान आवडणार्‍या काकांचे मात्र बरेच वांधे झाले होते. कारण तो जाहीरातीत दिसला तरी काकू चॅनेल बदलायच्या. मी मागे एकदा त्यांना समजवायचा प्रयत्न केलेला की काकू या अफवा अश्याच मार्केटमध्ये ऊठत राहतात, यात तथ्य नसते. पण काकूंनी मागेच व्हॉटसप युनिवर्सिटीमध्ये अ‍ॅडमिशन घेतले असल्याने त्यांचा सिलॅबसच मुळापासून गंडलेला होता.

आपल्याकडे काही चित्रपट कलाकारांबद्दल वाईट माहिती भले ती चुकीची का असेना वेगात पसरवली जाते. आणि चांगली माहिती मग ती १०१ टक्के का खरी असेना ती दाबायचाच प्रयत्न केला जातो. त्यामुळे काकांची मदत करायची मनापासून ईच्च्छा असूनही माझा नाईलाज होता.

पण काल मायबोलीवर एक शाहरूखच्या दातृत्वाबद्दलची लिंक हाती लागली. मी ती काकांना फॉर्वर्ड केली. काकांनी काकूंना दाखवली. आणि आज संध्याकाळी गार्डमधून घरी येताना काकाकाकूंच्या घरून तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दिवाणा सनम ऐकू आले.

तुमच्या शेजारच्या काकांची मदत करायची असल्यास खालील लिंक जरूर वापरा. मला तर हे ईतके सारे वाचतानाही दम लागला. शाहरूखच्या ईतर कलागुणांच्या प्रेमात आधीपासूनच होतो. त्याच्या शून्यातून स्ट्रगल करत मिळवलेल्या सुपर्रस्टार्पदाबद्दल त्याच्या मेहनतीबद्दल आदरही होता. पण त्याचे हे दातृत्व आणि सामाजिक बांधिलकी बघून हा आदर कित्येक पटीत वाढला.

शाहरुख खान हा आपल्या देशासाठी कोणत्या प्रकारे तरी उपयोगी आहे का?

------------------------------

शाहरूख हा एकच कलाकार नाही जे त्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जातात.
असे ईतरही कैक कलाकार आहेत, असतील. कदाचित माझ्याही मनात काही कलाकारांबद्दल अशीच गैरसमजातून निर्माण झालेली अढी असेल.
तर आपण या धाग्यावर अश्या कलाकारांबद्दलच्या खर्‍या माहिती शेअर करून खोट्या माहितींना झोडपून काढूया आणि एकमेकांच्या मनातील गैरसमज दूर करूया.

धागा मुद्दाम सेलेब्रेटींविषयीच ठेवला आहे. चित्रपट कलाकार, खेळाडू वगैरे. राजकीय नेत्यांना यात आणू नये ही विनंती _/\_

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा उडवा, कंटाळा आला पिसं काढून. अ‍ॅडमिनला उद्देशून नाही हे. धागाकर्त्याला साकडे आहे.
दोन दिवस शिल्लक राहील इतकाच कोळसा आहे. आता चीन प्रमाणे वीज गुल होईल. त्या वेळी धागे कसे काढणार ?

राहू द्या सर. कुठे तरी सत्य सुरक्षित राहू द्या.
ईथे येणारी माहिती प्रतिसादांच्या भाऊगर्दीत हरवून न जाता जास्त लोकांच्या नजरेस पडेल. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरता येतील हे संदर्भ. मायबोलीवरच नाही तर बाहेरही वापरता येतील. उदाहरणार्थ मी शाहरूखचा चाहता असूनही माझ्यासाठीच वरीलपैकी कित्येक माहिती नवीन होती. त्यामुळे अश्या प्रकारच्या आणखी माहीतीच्या लिंक आल्या ईथे तर चांगलेच आहे.
पण हो, काही यात चुकले असेल तर खुशाल खोडा. फक्त हा धागा वाद घालायला नसून माहितीच्या साठ्यासाठी आहे एवढे फक्त लक्षात ठेवा.

शारुख ने जी काय मदत केली आहे ती मदत सगळेच सेलिब्रिटी करत असतात.त्यांची इन्कमच एव्हडी असते. सरकारच्या गुड बुक्स मध्ये राहायला करावीच लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जेव्हा संकटात येतात तेव्हा सोशल मीडियावर त्या मदतीचे मेसेज फिरवून सहानुभूती मिळवू शकतात.

@ऋन्मेऽऽष
मी माझ्या घरात शारुखचे मंदिर बांधणार आहे. किती देणगी देऊ शकशील?

देणग्या सगळे कलाकार देतच असावेत. पण मी किती देणग्या दिल्या ह्याचा लेखाजोखा बहुदा शाहरुख अमिरलाच मांडावा लागतो.

सचिन चे नाव आले कि आकस, द्वेष, सिद्ध असे शब्द येतील. मग कुणीतरी सचिनचे नाव घेणाऱ्यांना वगळून इतरांची नावे घेत चर्चा कशी असावी याचा वस्तुपाठ वगैरे वगैरे सुरू करणार. मग इतर देशांनी गांभीर्याने घेतलेल्या चौकशी एजन्सी च्या अधिकृत वेबसाईट ची लिंक दिली असेल तरी लिंक देणारा अपात्र म्हणून लिंक सुद्धा अपात्र होणार. अत्यंत किळसवाणे काम केल्याचा वास दरवळणार. प्रतिसादांचा दुर्गंधी येत आहे असे वातावरण निर्माण होणार.
इतरांच्या बाबतीत इथे वर्षानुवर्षे न्यायालय भरत असते. त्यात हिंदू मुस्लीम. पुरोगामी सनातनी असे वळण लागणार.
हा धागा अपवाद असणार का?

शारुख ने जी काय मदत केली आहे ती मदत सगळेच सेलिब्रिटी करत असतात >>>> बघायला आवडेल. अर्थात तुलना करायचा हेतू नाही. फक्त शाहरूखने काही ग्रेट केलेय हा माझा गैरसमज दूर होईल ईतकेच Happy

दुसरी गोष्ट म्हणजे ते जेव्हा संकटात येतात तेव्हा सोशल मीडियावर त्या मदतीचे मेसेज फिरवून सहानुभूती मिळवू शकतात. >>>>> शाहरूखने हे केले असते तर माझ्यासारख्या कित्येक चाहत्यांना हे ईतके दिवस माहीत नव्हते असे झालेच नसते.

देणग्या सगळे कलाकार देतच असावेत.>>> सगळे भरभरून देत नसावेत असे मला वाटते.

पण मी किती देणग्या दिल्या ह्याचा लेखाजोखा बहुदा शाहरुख अमिरलाच मांडावा लागतो.>>> हो, हे दुर्दैवाने खरे आहे. जाब यांनाच विचारला जातो Sad

https://hindi.opindia.com/miscellaneous/entertainment/tony-ashai-aneel-m...>>>>>> हे नक्की काय आहे, खरे की खोटे? खोटे असेल तर आनंद होईल आणी खरे असेल तर????? मला शिव्या दोन्ही बाजूने पडतील कारण इथे हातात दगड घेऊन खूप उगाळले जाते.

रश्मी आपल्या लिंकमध्येच लिहिले आहे... entertainment Happy

बर्र, आपण धाग्यात दिलेली लिंक पाहिली का? शाहरूखने केलेली एकूणच मदत काय काय आणि किती आहे. मला वाचूनच धाप लागली. अर्ध्यावरच सोडले Happy

बघायला आवडेल. अर्थात तुलना करायचा हेतू नाही.>>>> सोनू सूदला विसरताय का? सयाजी शिंदे, मकरंद अनासपूरे, नाना पाटेकर यांची पण कामगिरी मोठी आहे. फक्त पैसाच पुरवावा असं नाही.

सोनू सूदला विसरताय का? सयाजी शिंदे, मकरंद अनासपूरे, नाना पाटेकर यांची पण कामगिरी मोठी आहे. फक्त पैसाच पुरवावा असं नाही.>>>>>>++++ १२३४५६७८९१९०

ऋन्मेष, दिलीप कुमारनी हाजी मस्तान वगैरे लोकांसोबत फोटो काढले होते, जेव्हा त्यांना कळले की लोक बोलतायत. त्याच वेळेस त्यांनी माघार घेतली. पुन्हा त्या फंदात पडले नाहीत. आपल्या स्वार्था साठी कोणाशी कसे संबंध ठेवावे हे शाहरुखला कळत् नसेल तर एकतर तो निरागस आहे किंवा जाणुन बुजुन दुर्लक्ष करतोय.

दिलीप कुमारनी हाजी मस्तान वगैरे लोकांसोबत फोटो काढले होते, जेव्हा त्यांना कळले की लोक बोलतायत. त्याच वेळेस त्यांनी माघार घेतली. पुन्हा त्या फंदात पडले नाहीत.>>>>>>≥>>>>>>>

करीम लाला ला इंदिराजी भेटायच्या असे झिपऱ्या रौत्या बोलला तर त्याला काँग्रेसी नेत्यांनी झिपऱ्या ला बवासिर होई पर्यंत हाणला होता , त्याच प्रमाणे मस्तान आणि थोरले ठाकरे यांचे दोस्तीपूर्ण संबंध होते .

सर,
धागा मंदावलाय कृपया हेडिंग बदला....(म्हणजे त्यात शारुख अ‍ॅड करा )
शारुखसारख्या सेलेब्रेटींविषयी पसरवली जाणारी..........अस काही तरी करा.

मी काय म्हणतो, एक मायबोली सारखी शाखाबोली वगैरे वेबसाईट काढायची का? त्यात फक्त आणि फक्त शाहरुख खान बद्दलचे धागे, चर्चा, विनोद, वादविवाद, भांडणे, उत्सव - उपक्रम -स्पर्धा वगैरे असतील.
भन्नाट वेबसाईट होईल, चाहते द्वेष्टे सगळ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.

सोनू सूदला विसरताय का? सयाजी शिंदे, मकरंद अनासपूरे, नाना पाटेकर यांची पण कामगिरी मोठी आहे.
>>>>
तुम्ही ठराविक नावे घेतली. याचा अर्थ सगळेच हे करत नाहीत. बरोबर ना ?
वर कोणीतरी म्हटलेय जे दातृत्व शाहरूखने दाखवलेय ते सारेच दाखवतात. मला हेच दाखवायचे होते की सारेच नाही.
आणि हो, मला असे करणार्‍या सर्वांचेच कौतुक आहे. पण आपल्याकडे काहींना शाहरूखच्या या गुणाचे कौतुक करायला जड जाते Happy

आपल्या स्वार्था साठी कोणाशी कसे संबंध ठेवावे हे शाहरुखला कळत् नसेल तर एकतर तो निरागस आहे किंवा जाणुन बुजुन दुर्लक्ष करतोय.
>>>>
कोणाशी काय संबंध ठेवले? वर तुम्ही ती एंटरटेनमेंट लिंक शेअर केली आणि जी खरी की खोटी हे तुम्हालाच माहीत नाही त्याला अनुसरून म्हणत आहात का?

OpIndia is a steaming heap of garbage. हि कसली पत्रकारिता म्हणे ? फेसबुक पोष्टी आणि ट्विटर वरून अन्व्हेरिफाईड फोटो घेऊन फालतू लेख पाडायचे. फेसबुक ट्विटर बघायला भंपक Op India कशाला पाहिजे, आमचे आम्ही बघतो कि.

रश्मी, तुम्ही दिलेल्या दुव्यात Op वाल्याचं काय कर्तृत्व आहे म्हणे ? सोमि वरून पोष्टी उचलून बातमी म्हणून चिकत्तवल्या आहेत. खरंच लोक कसं काय अनायरोनिकली ऑपइंडिया वाचतात आणि शेअर करतात समजत नाही.

हा मागे एकदा एका गावात कार्यक्रमाला गेला होता. म्हणजे त्याचा सत्कार होता. तर लोकांना त्याने 1 करोड रुपयांची ब्याग दिली. ब्याग दिल्यावर तो लगेच जायची घाई करू लागला. लोकांनी ब्याग उघडून बघितली तर त्यात करकरीत 500 च्या नोटा होत्या. लोकं खूप खुश झाले आणि ते बाजूच्या दुकानावर भजी, वडापाव खायला गेले. वडापाववाल्याने नोट दोन्ही बाजूला बघितली तर एक साईडने कोरी होती. तो गावकऱ्यांना बोलला अरे तुम्हाला उल्लू बनवलंय. लोकांनी बाकीच्या नोटा चेक केल्या तर त्या पण एक साईडने कोऱ्या होत्या. मग लोक्स त्याचा पाठलाग करू लागले. त्याच्या लक्षात आलं की लोकांना आपली लबाडी समजली आहे. तर तो गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकं काढून बोलला काय झालं कशाला पळताय माझ्या मागे? तेव्हा लोक्स बोलले खाली उतर हलकट माणसा सांगतो काय झालं ते. दुसऱ्या बाजूने बायका पण याच्या गाडीच्या मागे धावत होत्या. त्या पण याला शिव्या देत होत्या ' मेल्या मुडदा बसविला तुझा' , 'लाज कशी नाही वाटत हरामखोर' अशा शिव्या देत सगळे त्याच्या मागे पळत होते. त्यांना पळताना पाहून याला खूप बरं वाटत होतं. तो लोकांना बोलला दोन नोटी एकमेकांना चिटकवून टाका म्हणजे पन्नास लाख होतील. ते ऐकून लोकांनी याच्या गादीवर दगडं मारायला सुरुवात केली. पण शेवटी गाडीच ती. भुर्रकन निघून गेली. त्या गावातली माणसं आजही याचा पिक्चर रिलीज झाला की रात्री मोठया पडद्यावर लावतात आणि हा दिसला रे दिसला की दगड, शेण अंडी फेकून मारतात.

अहो कॉमी, म्हणूनच मी विचारतेय की हे काय आहे? या माणसाविषयी ( टोनी ) मी मागे पण वाचले होते, म्हणून ऋन्मेषने हा धागा काढल्यावर वाटले की ही लिंक कोणाच्या नजरेखालुन गेली असेल तर कळेल.

मी सांगतो ऑप ने तो लेख लिहायच्या आधी काय झालं असणार.

ऑप वाल्यानी सोमि पोस्ट बघितली. पोस्ट कर्त्याला फोटोचा सोर्स विचारला. इतर दाव्यांचा सोर्स विचारला. पोस्ट वाला नुसतं गालातल्या गालात हसला.

ऑप नी पोस्टकर्त्याच्या निखळ स्माईल वर मोहून जाऊन लेख पाडला.

( असे हजारो लाखो फोटो मिनिटभरात सगळ्या नेत्यांचे तयार होऊ शकतात. चालेल का ते ?)

कुठे तरी सत्य सुरक्षित राहू द्या. >>>>
सत्यपणाची मोहोर लावण्याआधी तुम्ही काय शहानिशा केलीत सत्यपणाची ते वाचायला / पुरावे बघायला मिळतील का?

हा धागा वाद घालायला नसून माहितीच्या साठ्यासाठी आहे एवढे फक्त लक्षात ठेवा >>>>
ज्या माहितीचा साठा होणे तुम्हाला आवश्यक वाटते ती तुमच्या स्वतःच्या / घरच्या उपकरणांवरही साठवता येईल. इथे काय माहितीचा पांजरपोळ उघडलाय का?

रस्त्यावर पडलेला प्रत्येक पो उचलून मायबोलीवर आणायचे काय प्रयोजन.....

@ अ‍ॅडमिन / वेबमास्टर ---
धाग्यांची प्रतवारी आणि ते उडवणे / ठेवणे याचा निर्णय तुमच्यापैकी कोणाचा अधिकार आहे मला कल्पना नाही.
याबाबत संबंधिताना समज दिल्यास मायबोली परिवार आभार मानेल.
किंवा तुमचे / संस्थळाचे याबद्दलचे निकष -- वैयक्तिक / कायदेशीर --- कुठेतरी मांडलेत तर सर्वांना एक रेफरन्स स्केल राहील.
मग तुम्हाला निदान अशा अरण्यरूदन पोस्टी अधूनमधून वाचाव्या लागणार नाहीत.
कृपया, काही करता येईल का?
जो तो काय वाचावे / वाचू नये याचे स्व-नियंत्रण करेलच, जसे आजवर केले.

हे नक्की काय आहे, खरे की खोटे? खोटे असेल तर आनंद होईल आणी खरे असेल तर????? मला शिव्या दोन्ही बाजूने पडतील कारण इथे हातात दगड घेऊन खूप उगाळले जाते >>>>>>>>>>
हे मात्र खर आहे !
ती पाकिस्तानी डुकरं बॉलिवूड मध्ये पैसा ओतत असतात , आणि त्याच्या बरोबर अक्षय कुमार ,अनिल कपूरचे देखील फोटो आहेत या गोष्टीचा राग येतो .

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 October, 2021 - 02:40
आमच्या शेजारी राहणार्‍या काकूंना कालपरवापर्यंत असेच वाटत होते की कधीच भारताला आणि भारतीयांना मदत न करणार्‍या शाहरूख खानने पाकिस्तानला अमुक तमुक कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे त्यांनी शाहरूख खानचे चित्रपट घरात बघणे केव्हाचेच बंद केले होते. >>>>> Proud आता या काकु म्हणजे मीच आहे. ऋ माझे नाव लिहायला का लाजला देव जाणे. Proud

देणग्या सगळे कलाकार देतच असावेत. पण मी किती देणग्या दिल्या ह्याचा लेखाजोखा बहुदा शाहरुख अमिरलाच मांडावा लागतो.>>>> कॉमी, तुम्ही इथेच चुकताय. शाहरुख चे वडिल हे जन्माने पाकिस्तानी आहेत. त्यांनी फाळणीनंतर ( बहुतेक ) पाकीस्तान सोडला. पण शाहरुखचे चुलते, भाऊ हे सारे अजून तिथे आहे. शहारुख त्यांना भेटतो कधीतरी. हे गैर अजीबात नाही, कारण इथल्या पंजाबी व सिंधी हिंदुंचे नातेवाईक देखील अजूनही पाकीस्तानात आहेत. पण शहारुख, इथल्या नट नट्यांना आपलया चित्रपटात वाव द्यायचे सोडुन पाकी नट नट्यांना मॉडेल्स ना वाव देतो हे भारतीयांना खटकते. कारण जेव्हा कश्मीर चा मुद्दा येतो, तेव्हा हेच पाकी नट नट्या तेव्हा पाकीस्तानची बाजू घेतात. मग लोकांचे टाळके सटकुन शहारुख डोक्यात जातो.

आता अमीर. इतके दिवस सर्व सिनेमे ठीक चाललेले असतांना, केवळ मोदी आले म्हणून मला देश सोडावासा वाटतो हे अमीर व त्याच्या दुसर्‍या बायकोचे किरण चे वाक्य लोकांना खटकले. अमीरच्या आधीच्या बायकोला रीनाला व दोन्ही मुलांना २० वर्षे जे वाटले नाही, ते अमीर व किरणला ४ वर्षात वाटले. अमीरची मुले इथेच मोठी झाली तेव्हा अमीरला भारत खटकत नव्हता, मग अचानक असे काय घडले? नशीब, अमीरने तो विचार सोडुन पाणी संघटना वगैरेत सक्रिय भाग घेऊन आपला मार्ग बदलला.

आता दुसरे, दिलीपकुमार जन्माने पाकीस्तानी. पण त्यांनी कधी असे म्हणले नाही की मी आता रीटायर झाल्यावर, वय झाल्यावर पाकीस्तानात परत जातो. उलट कारगील युद्धाच्या वेळी त्यांनी नवाज शरीफला फोन करुन तुम्ही धोका देताय हे स्पष्ट सुनावले होते. शहारुखने कधी अशी हिम्मत केली? आपल्या जवानांचे हाल करुन त्यांचे डोळे काढुन ( आठवा सौरभ कालिया ) पाकी सैनिकां नी विटंबना केली, तरी शहारुख, सलमान व अमीर चूप. मग लोकांनी काय हार तुरे देऊन सत्कार करायचे का? तुमचे सिनेमे पाकीस्तानात हिट होतात म्हणून त्यांच्या काहीही कारवाया खपवुन घ्यायच्या का? आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते?

नसिरुद्दीन शाहचे पण नातेवाईक पाकीस्तानात आहेत. त्याची आई जायची पण तिकडे. पण म्हणून नसीर कधी गोत्यात आला का? कोणी त्याच्यावर संशय घेतला का? मग शहारुखच का? याचे उत्तर आता तुम्हीच शोधा.

मग शहारुखच का? याचे उत्तर आता तुम्हीच शोधा.
Submitted by रश्मी. on 13 October, 2021 - 16:27
>>>
कारण तो सुपर्रस्टार आहे !
म्हणून त्याच्या विरोधात आलेल्या कुठल्याही माहीतीची शहानिशा न करता आपण ती पुढे फॉर्वर्ड करता.
आता हेच बघा, आपणच शेअर केलेल्या (खर्‍याखोट्या) लिंकमध्ये अनिल कपूरही आहे. पण चर्चा कोणावर होतेय. तर शाहरूखवर Happy

बाळ ऋ, अनिल कपूर, जॉनी लिव्हर हे दुबईला द्साऊदच्या कार्यक्रमात पूर्वी गेले होते, म्हणून जाम थोबाडले गेलेत. अजून काय हवे ? आणी तो सुपरस्टार आहे हे तूच ठरवले का? मागल्या काळात अक्षय, अमीर आणी सलमान यांचे बरेच सिनेमे एका पाठोपाठ एक हिट झालेत. मग ते कोण सेवक आहेत का? सांगुनच टाक. अक्षय चे किती सिनेमे हीट झालेत ते बघ एकदा.

आणी त्या फुल लिंक मध्ये शहरुखचे नाव असल्याने आणी तू धागाकर्ता असल्याने लोक शारुख वर्च बोलणारच की.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा