हाच क्षण

Submitted by अनन्त्_यात्री on 8 October, 2021 - 06:37

चाल चाल चालत गेलास
वणवण भटकून थकून गेलास
हाच क्षण मोलाचा
रोवून पाय
थांबायचा

दार दार ठोठवत गेलास
उंबरा उंबरा झिजवत राह्यलास
हाच क्षण मोलाचा
तोडून दार
घुसायचा

वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा

Group content visibility: 
Use group defaults

अर्रे मस्त!!! Happy
>>>>>>>>>>वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा

सगळ्यांनी लिहा. नवनवे अनुभव वाचकांपर्यंत पोचवा. तुअमच्यासारखं फक्त तुम्हीच लिहू शकता.

सुंदर...