प्रपोज

Submitted by अभिषेक बच्छाव on 3 October, 2021 - 11:48

अगं थांबशील का, थोडं बोलायचं होतं,
खुप काही साचलयं,थोडं मांडायचं होतं..

नाही काल परवाची ही गोष्ट खूप जुनीच आहे,
दिवस असो की रात्र आठवण मात्र तुझीच आहे..

मित्रांच्या मैफिलीतही आजकाल एकट एकट वाटतयं,
सगळं काही सोडून तुझ्यासोबत फिरावसं वाटतयं..

तुझ्याशी बोलायला आज धाडसं मी करून आलोय,
सकाळी सकाळी देवळात जाऊन नारळ मी फोडून आलोय..

या आयुष्याच्या वाटेवर साथ माझी देशील का?
तुझ्या सुंदरशा नावापुढं नाव माझं लावशील का?

- अभिषेक बच्छाव

Group content visibility: 
Use group defaults