गांधीजी की जय--( वीक एंड )

Submitted by निशिकांत on 2 October, 2021 - 10:47

गांधीजी की जय--( वीक एंड लिखाण )

आपल्या समाजात व्यक्तीपूजेचे मोठे स्तोम आहे. चांगल्या विभूतींची पूजा करणे गैर नाही. पण त्यांचे आदर्श ठेवून आचरण केले नाही तर अशी पूजा फक्त एक कर्मकांड बनून रहाते. एके काळचे मोठे मोठे लोक आपण नमस्कार करण्यासाठीच वापरतो.
हेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दिनांचे पण आहे. रोज कोणता ना कोणता दिवस असतोच असतो. बालिका दिवस, व्हॅलंटाइन डे, भाषा दिवस, ज्येष्ठ नागरिक दिवस असे अनेक. मग आपण तो दिवस साजरा करतो म्हणजे काय करतो? कविता, लेख, एखादी सभा, भाषणे वगैरे वगैरे. यात औपचारिकतेचा भागच जास्त असतो. एक साधे उदाहरण महिला दिनाचे घेऊ या. हा दिवस कित्येक वर्षापासून साजरा केला जात आहे. पण महिलांची ( शहरी सोडून ) परिस्थिती जैसे थेच आहे. आपण अशा दिवसामागचा हेतू लक्षात घेऊन कांहीच करत नाही. हेच स्त्रीभ्रुणाच्या आणि नवजात मुलींच्या बाबतीतही घडते. मुलगा व्हावा म्हणून या काळातही एखादी मुलगी कर्नाटकातील येल्लम्मादेवीला अर्पण केल्याचे बघून समाजाच्या बधीर मनाला कांहीच वाटत नाही ही खरी शोकांतिका आहे.
हेच नेमके जयंत्या आणि स्मृतीदिनांच्या बाबतीतही घडते. आपण सर्व नेत्यांचे या दिवशी गुणगाण गातो. त्यांचे तत्वज्ञान त्रिकालाबाधित असल्याचे सभांमधून सांगतो. त्यांचे तत्वज्ञान दहा टक्केही पाळले असते तर समजात अमुलाग्र बदल दिसला असता एव्हाना. एकेकाळी ज्यांना वंदन करावे अशा व्यक्ती समाजात भरपूर होत्या. त्यांनी समाजाला आकार देण्याचे बहुमुल्य काम केले. आजच्या काळात भोवती नजर टाकून बघा. दिसतात का कुणी विभूती. शायर इलाही जमादार यांनी ही खंत व्यक्त करताना लिहिलेल्या एका गझलेतील दोन शेर खाली देतोय.

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?

रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?

हेच माझ्या डोक्यात काहूर उठवत होते कांही वर्षांपूर्वी. गांधी जयंती साजरी झाली धुमधडाक्यात. आणि नंतर इलाहीजींची वरील गझल वाचून विचाराचे चक्रीवादळ उठले. मग मन या जयंती साजरी करण्याच्या पध्दतीचा आणि वास्तवाचा विचार करू लागले आणि त्यातून एक कविता जन्मास आली. कविता उपरोधिक झालीय या उद्वेगातून. पहिल्या चार ओळी लिहिताना मनात आले की एक खेड्यातील अनपढ शेतकरी आपल्या नातवाला विचारतो की आज तारीख काय आहे. त्यांने दोन ऑक्टोबर असे सांगण्यापासून या रचनेची सुरुवात झाली आहे. बघा कशी वाटते ती.

काय म्हणलास पोरा, आज
दोन ऑक्टोबरय व्हय?
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सगळ्या हापिसात फोटो तुझे,
कैक गावी गांधी रोड
एवढं करून तुझ्या तत्वाशी
बसत नाही जोड
सगळं बघून उपोषणाला
बसशील वाटतय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

खादी भंडरातुन घेतोत
झेंडे, पायजम्याच्या नाड्या
तू रहिलास आश्रमात
आम्ही बांधल्या माड्या
माया जमा करील त्यालाच
म्हनत्यात दिग्विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

नेते लोक भाषण करतील
तुझे गुण गाऊन
झकास बोलता येतय त्यांना
येळ प्रसंग पाहून
सभा संपली, भूक लागली
कोंबडीची नाही गय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सत्याग्रह शस्त्र शोधलस
स्वातंत्र्य त्याचं फलीत
आम्ही घेतलं हातात जसं
माकडा हाती कोलीत
वेळी अवेळी सत्त्याग्रह
आम्हाला जडलीय सवय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आजच्या गांधीचं काय सांगू
दिल्लीत बसत्यात
क्वत्रोची कोन इचाराव तर
गालामंदी हसत्यात
तरण्या गांधीला मिळणारय म्हने
सिंहासनाचं वलय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

दुष्ट वृत्ती हिंसा करताना
सगळीकडे दिसत्यात
शांतीप्रिय लोकांना
भ्याड म्हनून हसत्यात
तुझ्या अहिंसेला हिंसेच
वाटू लागलय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आभाळातला तारा तुटून
अंधारात हरपतोय
अंधाराच्या तिव्रतेनं
प्रकाश झोत करपतोय
होतोय बघा अंधाराचा
प्रकाशावर विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय !
गांधी विचारांचा उदो उदो करणाऱ्यांनी या कवितेतील 1 टक्का जरी अर्थ समजून घेऊन आचरणात आणला तरी खूप आहे .

स्वतः नथुरामला पुजायचं अन् इतरांना गांधीजींच्या विचारांतील १% तरी आचरण करा म्हणायचं... कित्ती मज्जा ना..!! Bw

Dj ,
सतत ब्राह्मणद्वेष करून तुम्ही लोकच गांधीच्या विचारांना तिलांजली देता तर बाकीचे गांधी विचार का पूजत बसतील ?

मी कुठे कुणाचा द्वेष केला..? नगरवाले हे वैनिंचा ड्यू असावा इतके साम्य दोघांच्या आरोपात आहे... थेट ज्ञातीवाचक विशेषण लाऊन आरोप केलाय Wink

झाले का पुन्हा सुरू तो मी नव्हेच ?
स्क्रीनशॉट टाकले असते, पण याधाग्याची वाट लावायची नाही म्हणून शांतता धरतो .

गोडसे स्वतंत्र भारतातला पहिला अतिरेकी होता. ह्या न्यायाने RSS पहिली अतिरेकी संघटना. SIMI प्रमाणे RSS वर पण बंदी घालायला हवी.

स्क्रीनशॉट टाकले असते, पण याधाग्याची वाट लावायची नाही म्हणून शांतता धरतो .>> वैनी पण अशाच धमक्या द्यायच्या, ज्ञातिवाचक शब्द माझ्या तोंडी आले असे धादांत असत्य आरोप करून कल्ला करायच्या, न लिहिलेली वाक्ये मीच लिहिली असा कंठशोष करून राळ उडवायाच्या...
मग सर्वांना खरं कळून चुकलं... चार सुजाण माबोकरानी चारचौघात उलटतपासणी केली... हल्ली त्या कुठं दिसत नाहीत. तुमच्या रुपात त्यांचा वावर जाणवतो..! Bw

सरांच्या कवितेला पहिल्यांदाच एव्हढे प्रतिसाद मिळालेत. ते प्रतिसादांसाठी लिहीत नाहीत हे अर्थातच माहिती आहे.

मग सर्वांना खरं कळून चुकलं... चार सुजाण माबोकरानी चारचौघात उलटतपासणी केली... हल्ली त्या कुठं दिसत नाहीत. तुमच्या रुपात त्यांचा वावर जाणवतो..! Bw>>>>>> Rofl Rofl Rofl

चार सुजाण माबोकरानी चारचौघात उलटतपासणी केली>>>>>> Rofl कोण हे सुजाण माबोकर्स? तुमच्या कंपु गँगचे का?

डिजे, एवढे हास्यास्पद होऊ नका हो. Proud मी इथेच आहे, घरातल्या वयस्कर लोकांची तब्येत ठीक नव्हती म्हणून येत नव्हते. आता ते ठीक आहेत म्हणुन आले. मी इथे दिसले नाही की तुम्ही उठसुठ प्रत्येकाला माझा ड्यु समजत रहाता. Proud

अहो प्रत्येकाचे लिखाण वेगळे असते, पण तुम्ही येऊन जाऊन सारखे अनाजीला कडेवर घेऊन हिंडता, मग कोणी विरोध केला की लगेच त्याला तुम्हीच वैनी असे म्हणून मोकळे होता. Proud

निशीकांत, कविता व लेखन दोन्ही छान व समर्पक.

इतरांनी लिखाण करुच नये म्हणुन आधी प्रशासकांच्या ज्ञातीचे आहोत म्हणुन प्रेशर आणुन बघितले.. नंतर आपणाला हव्या त्याच ज्ञातीबद्दल लिखाण केलं म्हणुन आकाश-पाताळ एक करून झाले.. न लिहिलेली वाक्यं माथी मारून झाले तरीही आता डाळ शिजेना म्हणुन राजकारणाचे सदस्यत्त्व रद्द करते म्हणुन झाले.. परंतु सगळे बिंग फुटल्यामुळे हस्यास्पद झालेले काही आयडीज ड्यु घेऊन लिखाण करते खाले हा इतिहासही फार जुना नाही...

आयडी मॅनेज करण्यासाठी ब्राऊजर-मोबाईल खूप जबर मॅनेज करावं लागत असेल याची कल्पना आहे म्हणा. Wink
-------------------------------
वैनींची घरातील वयस्कर माणसांना लवकर बरे वाटु दे अशी इच्छा व्यक्त करतो.

@ रश्मी
एक तर त्या बालिश बुद्धीला आपल्या लिखाणातील फरक समजत नाही आणि प्रत्येक धाग्यावर त्याची ती एकसुरी ओरड ऐकून हि वैताग आला आहे .
हा च नाही पण इतर कोणत्याही धाग्याची वाट लागू नये म्हणून त्याच्या त्या हास्यास्पद शोधाला उत्तर देण्याचे टाळतोय Happy

एक तर त्या बालिश बुद्धीला आपल्या लिखाणातील फरक समजत नाही आणि प्रत्येक धाग्यावर त्याची ती एकसुरी ओरड ऐकून हि वैताग आला आहे .
हा च नाही पण इतर कोणत्याही धाग्याची वाट लागू नये म्हणून त्याच्या त्या हास्यास्पद शोधाला उत्तर देण्याचे टाळतोय>>>>> बरोबर आहे. Happy

वास्तवीक चांगली विनोद बुद्धी, विनोदी लेखनातली चांगली शैली आणी सहजता, बर्‍यापैकी व्यवहारी ज्ञान यामुळे डिजेंविषयी मला थोडा आदर होता, पण जिथे तिथे अनाजी, पणतु आणी बरेच काही विचीत्र लिखाण, इतर जातीच्या बायकांविषयी खालच्या लेव्हल ची टिका टिपणी यामुळे तो आदर कमी झाला. असो, डिजे भावोजी, अनाजीला त्यांच्या हृदयात एक विशिष्ट मानाचे स्थान देत असल्याने आपण पास !

भारतातल्या सर्वात हरामखोर व्यक्तींविषयी काहीजणांना फार पुळका असतो त्यातला एक म्हणजे अनाजीपंत सुरनिस.

अगदी पुराणकाळा पासून सुरुवात केली तर भारतातील बळीराजाला पाताळात गाडणारा बटू, एकलव्याचा अंगठा मागणारा द्रोणाचार्य, स्वराज्याची धूळ्धाण करू पहाणारा अनाजीपंत सुरनिस, छत्रपतिंवर वार करणारा कृष्णाजी भास्कर, म. गांधींना मारणारा नथुराम गोडसे यांच्याबद्दल काहीजणांना फार कळवळा वाटतो (अगदी पिढ्यानपिढ्या वाटतो हे विषेष..!!) मग त्या कळवळा वाटणार्‍यांत स्त्री-पुरुष सर्व आले.. अशा अनाजी पंतुच्या विखारी विचारधारेचे पाईक असणार्‍या कोणा फालतू राजकारण्याची तोडीस तोड उठवळ बायको आहे म्हणुन तिला चांगलं चुंगलं बोलणं म्हणजे शेणाच्या गोळ्याला सुवासिक म्हणण्यासारखंच आहे...!!...अशा समाजविघातक नतद्रष्टांना पाठीवर घेऊन फिरणार्‍यांच्या शेपटांवर पाय पडला की ते प्रत्येक धाग्यांवर कुई कुई कुई कुई करतात याचाही अनुभव माबोकरांना आता नवा उरला नाही..!!

भारतातल्या सर्वात हरामखोर व्यक्तींविषयी काहीजणांना फार पुळका असतो त्यातला एक म्हणजे अनाजीपंत सुरनिस.>>>>>>> इथे कोणी तसा पुळका दाखवलाय? सिद्ध करा. अनाजीच्या नावाखाली ब्राह्मणांवर वाटेल ते आरोप करणारे तुम्हीच पहिले आहेत, आणी दुसरे तुमचे दोन साथीदार. नाव घ्यायची गरज नाही. अनाजी हरामखोर, नीच , बेईमान सगळेच होता पण मग हा एकटाच हरामखोर होता का? बाकीचे तुमचे गणोजी, मल्हारराव शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी घोरपडे, सुर्वे हे सद्गुणांचे पुतळे होते का? की ते ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांची नीच कृत्ये पाठिशी घालायची? ते तर तुम्ही करता आहातच की डिजे. फडणवीसांना शिवीगाळ करता पण धनंजय मुंडेच्या बाहेरख्यालीपणाला चांगलेच पाठिशी घालता, बरोबर ना? मग हा मुंडे नावाचा शेणाचा गोळा पाठीवर गवरी म्हणून मिरवताय की छातीवर मानचिन्ह म्हणून मिरवताय?

अशा अनाजी पंतुच्या विखारी विचारधारेचे पाईक असणार्‍या कोणा फालतू राजकारण्याची तोडीस तोड उठवळ बायको आहे >>>>>> मा प्रशासक, कृपया लक्ष द्या इकडे. केवळ जातीचा द्वेष या कारणाने हा माणुस काहीही बरळत सुटलाय. मग धागा बंद पडला की आम्हाला दोष नको. प्रत्येक वेळा हा माणुस ब्राह्मणांवर चिखलफेक करतो, मग अश्या कोल्ह्याला कधी न कधी सोलवटुन काढणारच. हाथी चले बाजार कुत्ते भुके हजार म्हणून किती वेळा दुर्लक्ष करणार हे तुम्हीच सांगा.

विव्हळणे थांबवा आता. फालतू राजकारणी स्त्रीचा उठवळ नवरा लिहिलं तर जितक्या संयत शब्दात ते स्विकारता तितक्याच संयतपणे ते स्विकारा. स्त्रीला पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हेच दाखव्वुन देता ना नेहमी. मग आता फालतूपणात अन उठवळपणात का मागे झाकून ठेवता..? एकीकडे स्त्री-पुरुष भेद न मानणारी म्हणुन कांदे सोलायचे अन नको त्या कःयश्चित गोष्टीसाठे पापुद्रे उचकत बसण्याचे उद्योग सर्वांच्या लक्षात येतात. अगदी मा. प्रशासकांनाही निलाजरेपणाने खोटेपणाचे दाखले देत स्वतःचे विखारी विचारधारेचे दात दाखवून देता यातच सर्व आले.

मा. प्रशासक, तुम्हाला या बाईंची पूर्ण हिस्टरी माहीत अस्लच अशी आशा करतो. गेली ११-१२ वर्षे या बाईने किती जणांचे आयडी केवळ खोटेपणातून कागाळ्या करून उडवले असतील याची गणतीच नाही. माबोवरील काही सन्माननिय आयडीज मुळे ह्या बाईंचा पोलखोल झाला आहेच.

<<<<<इथे कोणी तसा पुळका दाखवलाय? सिद्ध करा. अनाजीच्या नावाखाली ब्राह्मणांवर वाटेल ते आरोप करणारे तुम्हीच पहिले आहेत, आणी दुसरे तुमचे दोन साथीदार. नाव घ्यायची गरज नाही. अनाजी हरामखोर, नीच , बेईमान सगळेच होता पण मग हा एकटाच हरामखोर होता का? बाकीचे तुमचे गणोजी, मल्हारराव शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी घोरपडे, सुर्वे हे सद्गुणांचे पुतळे होते का? की ते ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांची नीच कृत्ये पाठिशी घालायची? ते तर तुम्ही करता आहातच की डिजे. फडणवीसांना शिवीगाळ करता पण धनंजय मुंडेच्या बाहेरख्यालीपणाला चांगलेच पाठिशी घालता, बरोबर ना? मग हा मुंडे नावाचा शेणाचा गोळा पाठीवर गवरी म्हणून मिरवताय की छातीवर मानचिन्ह म्हणून मिरवताय?>>>>>> माझ्या या वरील प्रश्नांना उत्तरे देण्याचे सामर्थ्य नसल्याने तुम्ही अजून अजून खालची पातळी गाठत गेलात. Proud अभिनंदन !! अशीच प्रगती चालू ठेवा. धन्यवाद !!

अनाजी हरामखोर, नीच , बेईमान सगळेच होता >>+++११११११११

वरील बंम्मवाक्य सोडले तर इतर काहीही आरोप करणार.. काहीही लिहिणार... दत्तोपंत ठेंगडींना आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक ठरवणार.. माबोच्या प्रशासकांना आपला ज्ञातीभाई समजून इतरांना धाक दाखवणार... महर्षि कर्व्यांना महात्मा फुलेंच्या आधी कार्यरत करणार... आजोबांच्या घरी पत्ता विचारायला आलेल्या दाढीधारी इर्समास थेट दंगलखोर ठरवणार... अशांनी माझ्यावर काहीच्या काही कपोलकल्पित, बिनबुडाचे आरोप केले तर त्या आरोपांना मी उत्तरे देऊ का आता..? Proud

मोदींचे गुणगान असते तर ठीक होते , पण
गांधी जयंती निमित्त काढलेल्या धाग्यावर dj कडून एखाद्या जाती बद्दल कुजक्या प्रतिक्रिया अपेक्षित नव्हत्या .
कदाचित ब्राह्मण वर्गाला टार्गेट करण्याची सवय अंगवळणी पडली असल्या मुळे आणि धागा कर्ता देशपांडे असल्या मुळे धागा बंद पाडण्यासाठी खोटा गांधी समर्थक लपून छपून गांधींना बळी देत आहेत .
काही दिवसांनी हेच लोकं गांधींचे तत्वज्ञान हिंसक कुजकेचं होते हे सिद्ध करतील , अजून काही दिवसांनी गांधींनी मारताना हे राम म्हटलेच नाही हे अल्ला म्हणल्याचे सिद्ध करतील .

गांधी जयंती निमित्त काढलेल्या धाग्यावर dj कडून अशा एखाद्या जाती बद्दल कुजक्या प्रतिक्रिया अपेक्षित नव्हत्या >> बाळ, मी कुठल्या ज्ञातीला टार्गेट केलं..? सांगशील का..?

कदाचित ब्राह्मण वर्गाला टार्गेट करण्याची सवय अंगवळणी पडली असल्या मुळे आणि धागा कर्ता देशपांडे असल्या मुळे धागा बंद पाडण्यासाठी खोटा गांधी समर्थक लपून छपून गांधींना बळी देत आहेत>> हे असं आडनाव बघून आपला की इतरांचा हे ठरवणार्‍या वंशावळीतला नाही हो मी..

काही दिवसांनी हेच लोकं गांधींचे तत्वज्ञान हिंसक कुजकेचं होते हे सिद्ध करतील , अजून काही दिवसांनी गांधींनी मारताना हे राम म्हटलेच नाही हे अल्ला म्हणल्याचे सिद्ध करतील .>> आत्याबाईला मिशा आल्या तर त्यांना आपण काका म्हणु बरं..!!
-------------------------
मा. प्रशासक अन इतर माबोकर यांनी धाग्याच्या पहिल्या प्रतिक्रियेपासुन ते थेट शेवटच्या प्रतिक्रियेपर्यंत सर्व प्रतिक्रिया वाचाव्यात अन हे एकाच माणासाचे दोन ड्यु आयडी कशाप्रकारे न लिहिलेल्या प्रतिक्रियांबद्दल त्यांना इथे नको असलेल्या आयडीजना टर्गेट करत आहेत हे लगेच दिसून येईल.

दुसऱ्यांवर ज्ञातीवचक आरोप करताना तुम्ही थांबवाल तेव्हा..

तुम्ही अतिशय हुशार आहात म्हणून असं एकदा स्त्री आयडीने अन् एकदा पुरुष आयडीने लिहू शकता... कुणावरही काहीही आरोप करू शकता.. ज्ञातिवचक आरोप एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करू शकता.. खोट्याचे खरे अन् खर्याचे खोटे करून तिहास बदलू शकता... धन्य आहात..!!!

@नगरवाले वैनी : किती ते व्हिक्टीम कार्ड खेळायचं. मुळूमुळू हा तुमचा स्थायीभाव आहे का?