लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शॉपर्स स्टॉप वर इरा सोलेल चे कलेक्शन चांगले वाटले.अगदी लग्न नाही पण संगीत वगैरे ला.
असा एखादा टॉप आणि खाली ऑफ व्हाईट/गोल्डन/फ्लोरल स्कर्ट आणि वर मस्त कुंदन ज्वेलरी.
https://www.shoppersstop.com/ira-soleil-solid-dupion-off-shoulder-neck-w...

ताई, हा बघा एक पीस... कसा वाटला सांगा...>> मला ताई म्हणू नका Sad मीच उलट तुम्हाला आदराने ताई म्हणायला पाहिजे होत

Submitted by सीमंतिनी >> खूप सुंदर आहे..थोड्या बारीक सारीक मुलींना खूप गोड दिसेल असा lehnga.. माझं थोड वजन वाढलय लॉकडाऊन मधे तर अशा जाड कापडाच्या lehnga मधे अजून जास्त जाडी दिसण्याची शक्यता आहे

शॉपर्स स्टॉप वर इरा सोलेल चे कलेक्शन चांगले वाटले.अगदी लग्न नाही पण संगीत वगैरे ला. >> एकदम भारी आहेत ते टॉप्स आणि जास्त महाग सुद्धा नाही त्यासोबत एखादा flared plain skirt pair करता येईल..झक्कास दिसेल Happy

>>>>>थोड्या बारीक सारीक मुलींना खूप गोड दिसेल असा lehnga.
नाही अमृता उलट थोडे कर्व्हज हवेत.

चंदेरी म्हणजे इंग्लिश विंग्लिशमध्ये श्रीदेवीने शेवटी नेसली आहे ती रेड कलरची साडी. तिचा नवरा तिच्यासाठी घेऊन येतो ती. किंवा एक सॅंपल
https://www.indiansilkhouseagencies.com/sarees-view/red-chanderi-saree-w...

इरा सोलेल चा त्या लिंक मध्ये आहे फ्युशिया तसा सोनेरी टॉप पण आहे.प्लेन अगदी डार्क जांभळ्या/बॉटल ग्रीन/टोमॅटो रेड मार्बल किंवा सॅटीन साडी वर झकास दिसेल.

https://www.shoppersstop.com/ira-soleil-solid-dupion-off-shoulder-neck-w...

किंवा हा आणि गोल्डन प्लेन साडी
https://www.shoppersstop.com/ira-soleil-solid-dupion-round-neck-womens-c...

(डिस्क्लेमर: इरा सोलेल माझी नातेवाईक नाही Happy )

आता सोलेल पुराण आवरतं घेते.रस्ते चुकले तरी चालतील, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे Happy (आणि स्वतः काही न घेण्याचा पण करते.)

थोडं इंडो वेस्टर्न मिक्स मॅच करायचं असेल तर मिंत्रा वर अर्बनीक कलेक्शन चे क्रॉप टॉप्सपं आहेत पार्टी वाले(अर्बनिक मूळ कंपनी लंडन ची आहे,पण बरेच कपडे चायना हून येतात हे चालत असल्यास)

Submitted by MazeMan >> याला म्हणतात व्हय चंदेरी.. माझ्या होणाऱ्या सासू बाई मला पाहायला आल्या तेव्हा अशीच फिकट अबोली रंगाची साडी नेसून आल्या होत्या मस्त दिसत होती ती साडी.. मी पण घेईल मग अशी मस्त लाल चुटुक साडी..

Submitted by mi_anu >> thank you अनु मला इरा सोलेल माहिती नव्हत मला खूप आवडला हा टॉपचा पॅटर्न..एक गोल्डन घेऊन घ्यावं म्हणते blouse म्हणून पण use होईल आणि जीन्स वर पण छान दिसेल

Submitted by सामो >> try करून पाहीन..कधी असे जाड कापड असलेले कपडे जास्त वापरले नाही त्यामुळे आयडिया नाही.. मला असे झुळझुळीत मटेरियल आवडतात (त्याने आपण बारीक दिसतो असा उगाच माझा गोड गैरसमज Happy )

कुणाला डेस्टिनेशन वेडिंग (इंडिया only) चा अनुभव/आयडिया/माहिती/बजेट/management बद्दल काही कल्पना असेल तर कृपया सांगा..
कुठल्या places चांगल्या आहेत आणि बजेट friendly सुद्धा..
एकूण खर्च किती येईल (including travelling expenses)
Destination wedding managmement कसे करावे इत्यादी

गोव्याला,लोणावळ्यालाही.लोणावळ्यात हॉटेल ग्रँड विसावा ला डेस्टिनेशन वेडिंग होतात.
(अर्थात एमपी आणि नागपूर मध्ये कुठे हवे असेल तर तिथलीच प्लेस बघावी लागेल.)

Submitted by mi_anu >> आमचा तोच प्रॉब्लेम होतोय म्हणजे होणारे सासू सासरे थोडे वयस्कर आणि आजारी (सासरे डायबेटिक आणि सासूबाईंना गुडघेदुखी) सुद्धा आहे त्यांना जास्त travelling करायची इच्छा नाही त्यामुळे नॉर्थ साईड ला त्यांना जवळ पडेल असं ठिकाण शोधतोय (आमचं घर सुद्धा त्यांना दूर वाटतं Sad ) त्यामुळे इतके दिवस आमच्या लग्नाचं ठिकाण फायनल करताना अडचणी येत आहेत..यावर विचार करून थकलो आता म्हणून इथेच विचारतेय

अनु मस्त लिंक आहे.
मला लाल सॉलिड रंग खूप आवडला. त्या साडीत, खरच पेंटिंगसारखी दिसते ती वधू.

वेडिंग प्लानर बुक करा

Submitted by भरत >> ते तर करावच लागणार..पण त्या आधी wedding venue decide व्हायला हवा ना..

त्यांच्या मनात कुठले डेस्टीनेशन आहे ते दोन-तीन ऑप्शन्स विचारा. मग त्यातले तुम्हाला नको असलेले सुचवा, ते 'हे नको' म्हणतील नि तुम्हाला हवे असलेले निवडतील Biggrin

Happy असं असेल तर "ओ आई, हे पहा ह्याचे हे नवे अमके तमके फिचर्स/सोयी कळाले. तुमच्या अमक्या तमक्या बहिणीला हे आवडेल इ इ.. लांबण लांबण.. हे करूया का?" असा नवा संवाद करायचा.. हाकानाका... ते आपलं मन सांभाळणारच असतील तर आपल्याला मन बदलायची परमिशन आहे Wink Happy

त्यांच्या मनात कुठले डेस्टीनेशन आहे ते दोन-तीन ऑप्शन्स विचारा. मग त्यातले तुम्हाला नको असलेले सुचवा, ते 'हे नको' म्हणतील नि तुम्हाला हवे असलेले निवडतील Biggrin

Submitted by सीमंतिनी >> Lol Lol
पहिले हा प्रयोग होणाऱ्या नवऱ्यावर करून पाहते मग सासरच्या मंडळींवर Proud

आणि सुनेचे मन सांभाळायला त्याग करून हो म्हटले तर ? Happy

Submitted by mi_anu >> असे झाले तर मात्र परत मला त्यांचे मन ठेवायचे म्हणून agree करावं लागेल

Happy ... ये बाल मैने सलोनमें नही सफेद किये है गं.... इथे विचारून त्यांना तुम्ही तीन ऑप्शन्स देण्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे ते तीन ऑप्शन्स घेऊन पुढे ऑपरेट करणे सोपे आहे.

Submitted by सीमंतिनी >> मला विश्वास आहे हो तुमच्यावर..मी खरचं हेच करणार आता..ते म्हणतायेत जयपूर उदयपूर किंवा भोपाळ माझी इच्छा आहे माझं घर म्हणजेच नागपूर, कोकण साईड ला कुठेही किंवा नाहीच एकमत झालं तर मग जयपूर..बघू आता काय ठरतंय.. लवकरच इथे update देईल Happy (जयपूरला खूप जास्त खर्च होईल म्हणून मी नको म्हणतेय)

तुझी नि त्यांची सगळीच गावं छान आहेत की... गुड प्रॉब्लेम टू हॅव!!!!

Submitted by सीमंतिनी >> मला सगळा खर्च vennue वरच करायचं नाहीये बाकीचा पण हिशोब आहे(donation, furniture, home decor, future savings etc)..त्यामुळे जयपूर साठी इच्छा असूनही मी नाही म्हणतेय पण पाहू काय होतंय आता(अवांतर झाले हे पण मनातले बोलायचे होते म्हणून हक्काने इथे लीहले)

Submitted by भरत >> स्वागत समारंभ तर त्यांच्या गावीच होणार आहे.. परंपरेनुसार लग्न माझ्या गावी व्हायला पाहिजे होत Sad

Pages