चिंधी २

Submitted by सोहनी सोहनी on 27 September, 2021 - 03:45

चिंधी २

जे काही गाडीवर कोसळलं ते येऊन सरळ समोरच्या काचेवर आपटलं, काच फुटून इतका आवाज आणि तुकडे झाले की मी काही मिनिट पूर्णपणे सुन्न होते, डोळे घट्ट मिटून कान हातांनी गच्च बंद करून होते त्या जागीच अकासून बसले होते.

मनाची भिती थोडी कमी झाली तशी हळूहळू विचारांनी मनात प्रवेश केला आणि क्षणार्धात जे घडलं त्याची उजळणी झाली आणि मी घाबरत समोर पाहिलं,
जे पाहिलं त्याने माझ्याही नकळत मी किंचाळली आणि माझाच आवाज मला पुन्हा ऐकू येऊन मी अक्षरशः शहारले.
मी गाडीतून बाहेर धावत अण्णांच्या जवळ आले, गाडीची हेड लाईट चालू होते.

अण्णा अर्धवट बाहेर आणि अर्धे आत अश्या अवस्थेत होते, त्यांची मान दरवाज्यात अडकली होती.
असंख्य काचा डोकं, डोळे, गाल, ओठ, कान, मान, छाती चिरून आत खोलवर घुसलेले होते.

मी काही वेळ त्यांच्या जखमा पाहत खिळून राहिली, इतक्या जवळून इतकं रक्त आणि एखाद्या माणसाच्या जखमा मी कधीच पहिल्या नव्हत्या.
मी भानावर आले, त्यांची नाडी आणि श्वास तपासले आणि झटका लागल्या सारखं खाली कोसळले.

अण्णा जिवंत नव्हते, आता माझ्या सोबत बोलत होते आणि आता ह्या क्षणाला जिवंत नव्हते, ह्याचं खूप वाईट वाटलं, तरीही मी म्हणत होते नको दुसरा रस्ता, त्यांनीच सुचवलं आणि हे असं घडलं.
आसावे डोळ्यात साठतायेत ना साठतायेत तोच मला जाणवलं मी इथे एकटीच आहे,
म्हणजे अहिर. . . . .
मी विचार पूर्ण व्हायच्या आधीच गाडीच्या समोर उभी राहिले, आवंढा देखील घश्याखाली जात नव्हता, त्यात श्वास वाढले, मला धाप लागत होती, डोकं इतकं पण दुखू शकत होतं ते मला त्या क्षणी जाणवलं, अंगात असलेलं नसलेलं सगळं अवसान गळुन मी डोळ्यांसमोर अंधारी येऊन कोसळले...
कारण अहिर गाडीत नव्हताच. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults