Submitted by Rudraa on 23 September, 2021 - 21:31
थंड गारवा रंग सावळा खुल्या केसांचा गंध बावरा,
का तू सखे नशा अशी लाल ओठ जणू कोरीव नक्षी…..
घारे नयन मर्म अजाण खोल डोह कैक आरजूंचा,
हो तू तडित सोड विरस समर हा तुझ्या लोचनांचा……
रोष यामिनी शूळ नंदिनी कटि तुझिया अंगना,
हास्य मिलिंद पुष्प तनुज मार डंक सुता तू यातनांचा……
शीत सरीता नील अंबरा सुख उत्कर्षा रम्य मीनाक्षी,
धूर्त दुर्जना धर्म रक्षणा हो तू आज कृष्ण सखी द्रोपदी……..
-रुद्रा-
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा