कानिफनाथांविषयी माहिती हवी आहे

Submitted by सुर्या--- on 21 September, 2021 - 02:46

कानिफनाथांविषयी माहिती हवी असुन इगतपुरी येथील तीर्थक्षेत्राचे वैशिष्टय आणि अनुभव सांगितले तर उत्तम. याशिवाय इतरही नाथपंथीय क्षेत्रांचे महत्व आणि आणि अनुभव ऐकायला आवडतील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अ नगर जिल्ह्यात मढी हे कानिफनाथांचे मुख्य स्थान आहे! इथे नाथांची समधी आहे! अ नगरहून शेवगांव रस्त्यावर साधारण ५५ किमी आहे!

पुण्याजवळचे कानिफनाथांचे ठिकाण बोपदेव घाट ओलांडून पुढे सासवड कडे जाताना डाव्या हाताला आहे.

अवांतर - पुण्यातील बर्‍याच रसवंती गृहाची नावे कानिफनाथ / नवनाथ अशी असतात.

विसाव्या शतकात कोंडेश्वरनाथ आणि खटेश्वरनाथ हे प्रसिद्ध गुरुशिष्य विदर्भात होऊन गेले. गाडगे महाराज हे खटेश्वर नाथांचे शिष्य.
अलीकडच्या काळात अनेक थोर नाथसंतांनी काही लक्षणे धारण करणे सोडून दिले असावे असे वाटते. काही तर कानमंत्रसुद्धा देत नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही.

हर्पेन सारखंच लिहिणार होतो .
कानिफनाथ म्हटलं की मला फक्त आणि फक्त रसवंतीगृह आठवते. पुण्यातच नाही, मुंबईतही तेच नाव कायम बघितलेले आहे.

रसवंती गृहे चालवणारे लोक कानिफ नाथांच्या स्थानांच्या आजूबाजूला राहाणारे आणि त्यांना मानणारे असत. ते आपल्या रसपानगृहांच्या नावात मोठ्या भक्तीभावाने कानिफ नाथांचे नाव गुंफत असत.

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला,
गोरक्ष वदला गहिनीप्रति
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
ज्ञानदेवे सार चोजविले

मध्ये कधीतरी एका धाग्यावर काही झाले, काही प्रतिसाद उगाचच उडाले.(किंवा दुसरं काहीतरी असेल.) तेव्हा ते राम राम म्हणाले होते. ह्यापुढे रोमातच राहीन असेही म्हणाले होते.

ओके Sad प्रणवंत आणि हीरा.

नवनाथांची जन्मकथा

Kanif Nath

Vishnu’s command – In the forest of the Himalayas, the semen of Brahma fell for the purpose of Saraswati. A little of it fell on the elephant’s ear. Now Prabuddha Narayana should enter in it and appear as ‘Kanifnath’.

The story of Kanifnath’s birth – Twelve years later, Fire returned to Dattatreya to visit his son, Jalandar. In twelve years, Jalindar had become proficient in all disciplines. Fire was happy to see that. Later, when Fire and Jalindar went to meet Shankara, Shankara told them that it was time for Kanifnath to be born. He also said that he would be born from the ear of an elephant in the Himalayas. Jalindar also expressed his desire to make him his disciple. On hearing this, Fire said, “But tell me where the elephant is. I’ll look at all the following arrangements.”

Then Shankar took Jalindar and Fire to a certain place in the Himalayas. There was a huge elephant wild and crazy. They all started thinking about how to get closer to him. Then Jalindarnath said that I have studied with Dattatreya for twelve years. Believe in my knowledge and command me. Then Jalindar approached the elephant and he used Mohini Vidya (Hypontism) to subdue it. The elephant became very quiet. Sixteen-year-old Kanifnath came out of the elephant’s ear as soon as Jalindar called closer to the elephant

नाथ संप्रदायावरील ही प्रवचनं

https://youtu.be/KQ4tXSPTWlo

https://youtu.be/5qz9TQuPkqE

देवभुबाबा पण याच परंपरेतले आहेत का ? पहिल्या कथेत असेच दोन तीन बाबा आहेत ना एकमेकांना दीक्षा देणारे ?

मला आरती सापडली.

जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।
पतिपावना ओवाळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

ऋषभपुत्र श्रीप्रबुद्ध नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजवस्ती ।।
नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रिकावनी केली तपपूर्ती ।।
नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवूनी मिळवी वरप्राप्ती ।।
जयजय...

गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसूनी रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।
सुवर्णमुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।
सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथा तुमची ।।
जयजय...

गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळती होऊनी हर्षभरी ।।
चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बिद्रावळी गजरी ।।
सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।
जयजय...

नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथें परिक्षियले समयी ।।
प्रेमे गोपीचंद रक्षिला असूनीया अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।
जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तारीली ।।
जयजय...

अवनी भ्रमूनी निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापूनी स्वानंदाने मढी पावन केली ।।
समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।
गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंद झाला लीन सदा चरणी ।।
जयजय...

हा आ, ही आरती कुठल्या चालीत म्हणतात? सुखकर्ता दुःखहर्ता मध्ये बसत नाहीये. ओळ-टू-ओळ पण व्हेरिएशन वाटतंय.

नवनाथांपकी एक अडबंगनाथ यांचे मंदिर आळंदी जवळ डुडुळगाव येथे इंद्रायणी नदीजवळ आहे. असे सांगितले जाते कि डुडुळगावचे मूळनाव अडुळगाव होते व इथे अडबंगनाथ महाराज यांनी १२ वर्षे तप केले ! हे मंदिर आडबाजूला असून गावठाणाच्या शांत भागात आहे. या मंदिराला जरूर भेट द्यावी असे आहे,आपणास वेगळाच प्रसन्न अनुभव इथे येतो.

ही आरती ' जय जय श्री गणराज विद्यासुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मना रमता जय देव जय देव ' ह्या चालीवर थोडी ओढाताण करून म्हणता येईल. ऱ्हस्व दीर्घ व्यवस्थित उच्चारले गेले तर बरोबर म्हणता येते.

अच्छा. सुखकर्ता दुःखहर्ता, युगे अठ्ठावीस, जय जय श्री गणराज - सगळ्यांची एकच चाल आहे. सगळ्या १२ मात्रांत आहेत. तुम्ही म्हणता तसं थोडी ओढाताण करून म्हटलं तर जमू शकेल ही आरती पण १२ मात्रांत.