शशक पूर्ण करा ----- पैश्याचा पाऊस -------- सांताक्लॉज

Submitted by सांताक्लॉज on 20 September, 2021 - 18:04

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

मी सावधपणे आतमध्ये पाऊल टाकले. सगळीकडे अंधारच अंधार.
मी चाचपडत चाचपडत आणि मधले सगळे अडथळे चुकवत योग्य स्थानी जाऊन पोहोचतो.

आहा, ह्याचसाठी केला होता अट्टहास!!!! मनात खूप धाकधूक, इतकं सगळं करूनही माझा मुहूर्त चुकला तर नाही ना ?

अशी संधी खूप भाग्यवंतानाच लाभते. ग्रहमान जुळून यावे लागतात आणि साता जन्माचं पुण्य पणाला लावावा लागतं.

शेवटी तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. वरून नाण्यांचा आणि पैश्याचा पाऊस सुरु झाला

"रजनीकांतची" धमाकेदार एन्ट्री झाली होती ....... "य्येन्ना रास्कला माईंड इट"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच - तमीळनाडूमध्ये रजनीच्या पिक्चरच्या पहिल्या शोला जायला मिळणे म्हणजे भाग्यच!