Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सोनाली मला जुई गडकरी सारखी
सोनाली मला जुई गडकरी सारखी वाटते, अनॉयिंग !
आज सोनालीला ॲंकरींग करायला
आज सोनालीला ॲंकरींग करायला सांगितले होते तर निम्मे ॲंकरींग अक्षयने स्वताच केले
गायत्री जुईसारखी वाटते.
गायत्री जुईसारखी वाटते. विकास आस्ताद सुशांतसारखा..
मीरा चांगली खेळतीय
मीरा चांगली खेळतीय
गायत्रीचे नाव काल दादूस विसरले आणि आज अविष्कार!!
जयला टास्क अवघड होते ते ठीक पण नंतर काय कमोडमध्ये हात घातले असते वगैरे बडबडत होता
अक्षय आणि सोनालीने चांगले एंटरटेन केले दुसऱ्या टास्कमध्ये पण अक्षयचे परत एकदा बॅडलक.... दादूस भाव खाऊन गेला!!
सुरेखा भारी खेळतायत
आता उद्या तो बायकांची वेषभुषा करुन फालतूपणा करणार हे लोक.... हा प्रकार एक काय आवडतो लोकांना काही कळत नाही!!
आजचे दोन्ही टास्क भारी...
आजचे दोन्ही टास्क भारी...
मीरा खूप तयारीने आलीये, जयला चांगलाच वात आणला तिने, शिवानी सारखी आहे ती. जिंकवणार नाहीत तिला पण तिचं उपद्रवमूल्य खूप सो शेवटपर्यंत नेतीलच !
गायत्री कसली dambis आहे, जयवर सॉलिड चान्स मारत असते, रडत होता बिचारा तर तिथंही हीच पुढे ! पण जय solid खेळला, विकास luckily जिंकला !
पण सगळ्यात भारी दादूस वाटले, शेवटपर्यंत खात होते ते, त्रास होत होता तरी ! He deserved that win !!
अजून पर्यंत बघायला सुरू केलं
अजून पर्यंत बघायला सुरू केलं नाही.
पण इथे वाचल्यावर बरच समजून जात.
आरामात वूट वर एपिसोड्स बघेन.
शिव आणि मीनल दोघे ही रोडीज मध्ये होते.
जर फिजिकल टास्क असतील तर मीनल चांगलं खेळू शकते पण जास्त आठवडे टिकेल की नाही ते सांगता येत नाही.
सोनालीऐवजी शिवलीला हिला
सोनालीऐवजी शिवलीला हिला anchoring दिलं असतं तर... तिच्या कीर्तन टोन मध्ये ऐकायला जरा मजा आली असती.
थोडी innocent आहे ती, जरा एकटेपणातून बाहेर आली असती. रडत बसली होती ना आज , आईला कसं वाटेल हे सगळं म्हणून, कसं वागायचं इथे कळत नाही म्हणत होती.
मीनल मलापण आवडली, स्पष्ट बोलते पण by nature चांगली वाटते, उगाच भांडायला येत नाही ! छान समजावलं तिने शिवलीला ला !
सोनाली वाशील्याचे तट्टू वाटत
सोनाली वाशील्याचे तट्टू वाटत आहे.. उगाच फुटेज.. एकदम जुई रडकरी सारखी...
घरात दोन ग्रुप्स पडले आहेत.
घरात दोन ग्रुप्स पडले आहेत. एक सुरेखा, तृप्ती, शिवलीला, स्नेहा, दादूस यान्चा, तर दुसरा मीरा, गायत्री, आणि उत्कर्ष ह्यान्चा. बाकीच्या मुलान्च माहीत नाही.
उत्कर्ष फार हुशार निघाला गेममध्ये.
गायत्रीने ते तोण्डातल्या तोण्डात पुटपुटणे बन्द कराव. ओठ दाबून बोलते ती.
गायत्री आणि जय च पहिल्या
गायत्री आणि जय च पहिल्या दिवसापासून चांगल जमतंय अस जय ने सांगितलं होत म्हणून त्यानें त्या पुलाच्या टास्क मध्ये तिला टिकाऊ ठरवल. बाकी त्या मिरा ने वात आणलाय. ती चांगली खेळते आहे. पण ज्यात त्यत नाक खुपसत असतें. ते स्नेहा आणि त्या सुरेखा ताईंना आणि बऱ्याच जणांना ती आवडतं नाहिये. पण तिने गायत्री/ विकास आणि जय शी जमवून घेतलय. बाकीच्यांमध्ये सुरेखा ताई/ स्नेहा आणि तृप्ती देसाई यांचे एकमेकांशी बरं जुळत असावं आणि बाकी चे अजुन चाचपडत आहेत. कोणाशी आपल जास्त जमतय ते कळत नाही त्यांना. पण दादू ने मात्र कमाल केली. एवढ खारट /तिखट खाऊन सगळ्यांना जिंकल त्यांनी.उद्या त्रास होइल त्यांना.पण ग्रेट च आहेत
उद्या त्यांच्या नंतर रेस्ट
उद्या त्यांच्या नंतर रेस्ट रूम मध्ये जाणाऱ्याचे हाल आहेत...
तो जय कायम उघडा का हिंडत असतो
तो जय कायम उघडा का हिंडत असतो? आम्ही तर त्याला उघड्या असेच म्हणतो. एकदम रडूबाई वाटला. शिव पुढे हा काहीच नाही.
उद्या त्यांच्या नंतर रेस्ट रूम मध्ये जाणाऱ्याचे हाल आहेत...
हो तर... हे असले खाणे फार बेतू शकते. देव करो आणि दादूस यांना काहीच त्रास होऊ नये.
मीरा शिवानी-जुई-नेहा असं
मीरा शिवानी-जुई-नेहा असं कॉम्बिनेशन वाटते. तिचा स्क्रीन प्रेसेन्स annoying आहे.
मी जय टास्क हरला तिथपर्यंत पाहिलं. तोवर सोनाली कुठेच दिसली नाही.
गायत्री बेरकी आहे पक्की.
बाकी आविष्कार, स्नेहा, सुरेखा, शिवलीला, दादूस हे निरुपद्रवी आहेत. अशी माणसं मराठी बिग बॉस मध्ये उगाच बरीच पुढे जातात.(आठवा: उषा नाडकर्णी, भूषण कडू, माधव) दादूसनी टास्क तरी चांगला केला असं इथे वाचून कळतंय.
आज भलेभले बॉडीबिल्डर फेल झाले
आज भलेभले बॉडीबिल्डर फेल झाले आणि अंडररेटेड दादुस नी कमाल केली :टाळ्या:
चेहर्यावर काहीही एक्स्प्रेशसन्स न देता आनंदानी खाल्लं भयंकर फुड दादुसने , याउलट अॅक्टर्स लोकांनी दादुसचे हाल पाहून खोटी आसवं गाळली तिथे सगळे जाम फेक दिसले!
जय स्ट्राँग आहे पण त्यानी नुसतीच शक्ति दाखवली , मालकिणीला पाडलं असतं तरी चालल असतं कि पाठीवरून किंवा उधळलेला घोडा बनला असता, तिला पाण्यात फेकल असत ज्याची तिला भिती वाटते
बाकी मीरा कोणाला आवडो ना आवडो, टास्क्स व्यवस्थित करते आणि कॅमेरा कायम तिच्याच भोवती ठेवण्यात यशस्वी झाली आहे ती !
मला मिनल सुद्धा चांगली वाटतेय , सुरेखा ताई सॉलिड कमांडिंग आहेत , जातील पुढे त्या !
किर्तनकार बाई बिगबॉस साठी टोटली मिसफिट आहेत, काढा तिला लवकर आणि कोणी डिझर्विंग कॅन्डिडेट आणा.
ओव्हरऑल हा सिझन चांगला चालु आहे आणि टास्क्स सुद्धा !
जयमध्ये फक्त ताकद आहे.
जयमध्ये फक्त ताकद आहे. Splitsvila मध्ये पण त्याला बाकीचे बैलबुद्धी बोलायचे.
स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यु
स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यु मांडण्यात पुरुष कमी पडतायेत अजुन तरी, बायका पुढे दिसतायेत या बाबतीत !
>>स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यु
>>स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यु मांडण्यात पुरुष कमी पडतायेत अजुन तरी, बायका पुढे दिसतायेत या बाबतीत !
त्यात नवीन ते काय?
जय स्ट्राँग आहे पण त्यानी
जय स्ट्राँग आहे पण त्यानी नुसतीच शक्ति दाखवली , मालकिणीला पाडलं असतं तरी चालल असतं कि पाठीवरून किंवा उधळलेला घोडा बनला असता, तिला पाण्यात फेकल असत ज्याची तिला भिती वाटते >>
हो आणि त्याने नियम पण नीट समजुन घेतले नव्हते. तृप्ती, स्नेहा आणि मीरा ही ३ नावं त्याने नीट ऐकली पण नव्हती. त्याला तॄप्ती च्या ऐवजी गायत्री वाटत होती मालकीण....
फार अपेक्षा होत्या राव त्याच्याकडुन....
मीरा टास्क जरी चांगले करत
मीरा टास्क जरी चांगले करत असली तरी तिच्यात माणुसकी अज्जिबातच नाही..... तिला दादूसचे कौतुक नव्हते करायचे, तर निदान वाईट तर बोलू नये पण नाही... मला त्यांच्याबद्दल अजिबातच काही वाटत नाहीये असे बोलली ती आणि बाकीचे रडले ते सुद्धा हास्यास्पदच होतं...., आणि कॅमेरा तिच्यावर राहावा म्हणून प्रचंड इरीटेट करते, जे अजिबातच आवडत नाहीये...
येस डीजे शी सहमत. दादूस ने
येस डीजे शी सहमत. दादूस ने कमालच केली. कस्सं तोंड वाकडं न करता ते भयाण काय फूड होतं ते खाल्लं असेल काय माहित.
जय ने मठ्ठ पणे शक्ती वापरली फक्त. फेल होणारच होता. डोके लावायचे ना जरा. मला जमत नाही हे म्हणण्याऐवजी आधीच वेळ काढणे, चालढकल करता आली असती. मीरा ला अनॉय करता आलं असतं. त्याला गेम कळलाच नाहीये अजून.( मीराला कळलाय हे नक्की. )
मला तो विकास समहाऊ आवडत नाहीये. लबाड वाटतो. त्या मानाने विशाल आणि अक्षय यांच्यात लाइकेबल फॅक्टर आहे.
गायत्री मीराला टॅग अलॉम्ग करतेय अजून तरी. स्वतःचा काही प्लान नाही दिसत.
सुरेखा गुड गोइंग! तृप्ती सध्या बरी वाटतेय, काहीतरी खेळात सक्रिय सहभाग दिसतो पण शिवलीला काहीच करताना दिसली नाही. काही बोलत पण नाही. वापरायचं ना तिचं ते बोलण्याचं टेक्निक मुद्दे मांडायला वगैरे.
मीराला निगेटिव्ह रोल दिला आहे
गायत्रीने ते तोण्डातल्या तोण्डात पुटपुटणे बन्द कराव
>>>>>
हो, ते चालत नाही ना बिग बॉस मध्ये
बिग बॉसने ताकीद द्यायला पाहिजे.(उलट यावेळी subtitle देत आहेत.)
---------------------------------------
मीराला निगेटिव्ह रोल दिला आहे किंवा ती मुद्दाम करत आहे.
मागच्या वेळी जस नेहाला
मागच्या वेळी जस नेहाला सगळ्यांकडून पंच मारण्याच्या टास्कमध्ये टार्गेट करून सिम्पथी देण्याचा प्रयत्न झाला ,तसा मीराच्या बाबतीत पुढे करतील.कारण मीराला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स मिळत आहेत आणि ती स्वत:च डोक न वापरणारी गायत्री पण भरडली जात आहे.
मीराला शेवटपर्यंत ठेवणार हे जवळपास निश्चित आहे.
पण अजून महिलांचे टास्क,ग्रुप टास्क सुरू झालेले नाहीत.
स्पेशली तो टॉर्चरचा टास्क(पराग ज्यामुळे बाहेर गेला ,तो टास्क) राहिला आहे.पहिल्या सिझनला पण तिथेच मेघाने जिंकल होत.
शिवाय आता सगळे एकमेकांना सांभाळून घेत आहेत,म्हणावे तसे पक्के ग्रुप्स झालेले नाहीत.
पण यांनी नाही केले.तर ते काम बिबॉस करतीलच.
स्ने हा आणि आविष्कारकडून कंटेंट घेतील अस नाही वाटत ,कारण खूप वर्ष होऊन गेली आहेत,आणि तिचा दुसराही डिवोर्स झालेला आहे.
पण कपल नाही मिळाल ,तर मखत्र यांना विचारतील,नकार दिला तर काढतील कोणालातरी एकाला.
ती गायत्री त्या आविष्कारला जे सांगत होती, ते इतक नाटकी वाटत होत.ती अशीच नाटकी बोलते का एरवीही?
आधी मला आविष्कार केळकरसारखा वाटला होता, पण आता मला विकास तसा वाटत आहे.कलर्सचा चेहरा आहेच.त्यामुळे राहिल अस वाटत आहे.
टास्क आता तरी चांगले आहेत.
यावेळी तसे बर्यापैकी यंग आहेत, ते्व्हा जरा टफ द्यायला हरकत नाही.
हिंदी बिबॉ जर बारावीत असेल,तर आपण अगदीच पहिली ,दुसरीत नको,किमान आठवी ,नववीत तर जाऊ.
आता बिबॉ माहित आहे सगळ्यांना.उगाच नको त्या ठिकाणी संस्क्रुतीची लेबल लावून टास्कची मजा नको घालवायला.
यावेळी कोणी मेघा धाडे किंवा
यावेळी कोणी मेघा धाडे किंवा किशोरी सारखे गुड मॉर्निंग बिग बॉस बोलायचे नाटक करत नाही आहे. नाहीतर फार इरिटेटिंग होते ते. अभिजित केळकर किशोरीच्या पाठीमागे उभे राहून तिची "शुभ सकाळ" ची नक्कल करायचा ते पहायला मजा वाटायची.
ड्रेसिंग अप बद्दल :
ड्रेसिंग अप बद्दल :
आत्ता पर्यन्त मीरा आणि मिनलला १०० पैकी १०० मार्क्स !
टास्क्स प्रमाणे ड्रेसप करतात, मोस्ट्ली अॅथलेटिक वेअर !
ती स्नेहा काल काय भयाण कपडे घालून बसली होती, हळदी कुंकु कॅटॅगरी !
त्यामानाने सुरेखा ओव्हरवेट असल्या तरी छान कॅरी करतात स्वतःला, शॉर्ट्स टी शर्ट्स मधेही व्यवस्थित कॉन्फिडन्ट वावरतात !
स्नेहा चे कपडे तरी बरे,
स्नेहा चे कपडे तरी बरे, त्या गायत्रीचे त्याहून भयाण कपडे असतात. असे काय ते ढगळ अनफ्लॅटरिंग शेप चे फ्रॉक?! टास्क खेळताना ते पण.
अॅथलेटिक वेअर बेस्ट त्यावेळी. त्यापेक्षा मग तृप्ती देसाई तरी फॅशनेबल नसतील घालत पण जे कपडे असतात ते व्यवस्थित आणि इस्त्री वगैरे केलेले असतात
बघायला कंटाळा आलाय. मी फक्त
बघायला कंटाळा आलाय. मी फक्त पहिला सीझन व्यवस्थित फॉलो केला होता आणि मेघा धाडेला सपोर्ट करत होते. इथे अनेकांनी मी पेअड प्रमोशन करतीये असं वाटायचं तेव्हा. असं काही नव्हतं. पण वाटायचं तर वाटू देत, आपुन का क्या जाता है? तर ते असो.
इथे येऊन वाचतेय मात्र नियमित. जरा जमलं तर फोटो-गिटो पण डकवा बरं का लोक्स.
दादूस ना जिंकू देण्यात काय
दादूस ना जिंकू देण्यात काय problem होता ?
मीराचा गेम वेगळाच आहे, पण तिचा1 मुद्दा चांगला की ती तिचा स्टँड सहसा सोडत नाही, भले एकमत नको होऊ दे, पण लगेच सगळ्यांमध्ये mix व्हायला views बदलत नाही गायत्री सारखं !
तिला गेम व्यवस्थित कळला आहे, annyoing असली तरी ती, विकास आणि उत्कर्ष शेवटपर्यंत जातील. बाकीचे चाचपडत आहेत अजून! उद्याच्या गेम मध्ये कळेल खरा विनर आणि कॅप्टन कोण ते ...
शिवलीला आणि दादूस लवकर रामराम करणार वाटतं शोला !
मला तर गायत्री जायला हवी आहे लवकर, जयच्या जवळ जायचा चान्स बघत असते नेहमी
दादूस, सुरेखा, मीनल, सोनाली,
दादूस, सुरेखा, मीनल, सोनाली, स्नेहा आणि विशाल खुपच उत्तम खेळत आहेत. शिवलिलाने थोडी जरी काँट्रोवर्सी केली तर ती अजून ३-४ आठवडे जाणार नाही. पहिले बाहेर पडणारे बहुधा दादूस असतील पण ते रहायला हवेत.
स्नेहाचे फार कौतुक म्हणून आज
स्नेहाचे फार कौतुक म्हणून आज मुद्दाम लक्ष देऊन पाहिला.. ती स्नेहा तोंडच उघडत नाहीय...
फुसका बार....
मला नाही आवडत आहे स्नेहा,
मला नाही आवडत आहे स्नेहा, सिंपथी घेणे आणि अविष्कारला पाहून वाकडी तोंडं करणे यापलिकडे काही करत नाहीये सध्या तरी !
Pages