मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कोण मेघा??तेंव्हा मीपण वोट दिले होते पण सिझन वन संपून आता जमाना झाला >>>

तो कोण युट्युबर मंदार वोटींग किती कोणाला दाखवतो ना, तिथे काल का परवा विशाल एक नं , स्नेहा दोन नं वर होती म्हणून मला वाटलं मेघा फॅन्स वोटींग करतायेत का तिला.

इतक्या लवकर काय वाइल्ड कार्ड ! अजुन एकही एलिमिनेशन झालं नाहीये >>> तो सोळावा नं येणार येणार म्हणतायेतना, तो असेल.

हो मला खुप साम्य वाटले होते विशाल आणि सुशांत मधे. जय चं चिमणीसारखं बारकुसं तोंड आहे. दिसण्यात काहीच एक्सेपशनल नाही बॉडी सोडल्यास. त्याचे अन स्नेहाचे उगीच ओढून ताणून प्रमोट करत आहेत. तसा तो फ्लर्ट सगळ्यांशीच करतो.
तशी थोडी खरी केमिस्ट्री अ‍ॅक्चुअली पुष्की आणि सई मधे दिसली होती. त्यांनी मान्य केले नव्हते तरी. तेवढी केमिस्ट्री शिव -वीणामधे सुद्धा नाही वाटली मला. रेशम -राजेश तर स्क्रिप्टेड होते.
या आठवड्यात सुरेखा गेली तर बरं होईल असे वाटू लागले आहे.वाइल्ड कार्ड एन्ट्री आहे का याच आठवड्यात? लवकर केली मग.

आदिश वैद्य असावा बहुधा.
कोणातर्फे खेळायला सांगितल आहे काय माहित.
त्या कुडची बाईंना काढा आता,फार कंटाळा येत आहे,सारख काय किचन किचन.
पण ती आणि अक्षयने डान्स छान केला.
जय आणि स्नेहाची पेअर दाखवण्याचा दळभद्री विचार बिबॉस करत आहे का?नसली पेअर, तरी चालतय की.
या सिझनला अजूनपर्यंत तरी जबरदस्त ऑनलाइन आणि बार्क टीआरपी आहे.पेअर नसली तरी चालेल.
आज विकासने बिबॉसचा पचका केला का? म्हणजे त्यांची पेअर शेवटी ठेवून निर्णायक ठरत होती,विकास कालच्या भांडणावरून विशालला मत देणार नाही,अस बिबॉसला वाटल का,म्हणजे मग अजून भांडण लावता येतील,हा विचार असेल तर विकासने तोंडावर आपटवल बिबॉसला.
बाकी त्या तुपारेचा आवाज मला अजून बसल्यासारखा वाटला.मला ती गेले दोन दिवस थकलेली पण वाटत होती.

मला वाटलच होतं सुरेखा माती खाणार आणि तसेच झालं. तिने जयला वोट नसते दिले तर विशाल कॅप्टन झाला असता.
जय, मीरा, गादा किती स्वार्थी आहेत ते प्रत्येक वेळेस गडद होत आहे.
माझ्यासाठी पण clear winner विशालाच.

आज विकासने बिबॉसचा पचका केला का? म्हणजे त्यांची पेअर शेवटी ठेवून निर्णायक ठरत होती,विकास कालच्या भांडणावरून विशालला मत देणार नाही,अस बिबॉसला वाटल का,म्हणजे मग अजून भांडण लावता येतील,हा विचार असेल तर विकासने तोंडावर आपटवल बिबॉसला. >>> येस. जय आणि टीम विकासच्या टीम बद्दल म्हणतात की त्यांच्यात एकी नाहीये वैगरे पण सुरेखा सोडली तर सगळे एकत्र आहेत ते.

ती स्नेहा कॅप्टन निवडताना मी थर्ड पर्सन म्हणून सांगते करत होती आणि नंतर तृप्ती की कोणाशी बोलताना टीमसाठी नाही तर त्या एकासाठी (जयसाठी) केलं असं म्हणाली.

https://www.youtube.com/watch?v=t_PBwwCqSXA

आदिश वैद्यच वाटतोय, गुम है किसीके प्यारमे मधे दिसत नाहीये त्यामुळे चर्चा होती मागे (युट्युबवर बघितलेलं) आदीश bb त येणार अशी. त्याने कलर्सवर लिड रोल केलेला, सिरियल चालली नव्हती, बंडल होती. रा खे चा मधला माधवचा मुलगा, पहिला रोल. मला गुम मध्ये आवडायचा. बाकी दोन फार बघितल्या नव्हत्या. कुंकू टिकली मैत्रिणीची भाची एक रोल करायची म्हणून बघितली होती थोडे दिवस.

माझ्या साठी तरी मॅन ऑफ द एपिसोड दादूस. जयला हो म्हणून शांत डोक्याने विशालला मत दिले. सुरेखा फिटनेस नाही म्हणून जयला धरुन ठेवत आहेत. त्रुप्ती परवडली मग, तिने फिजिकल टास्क खेळायची तयारी दाखवली.
मीरा आणि गायत्री मध्ये आता गुणात्मक फरक फार उरलाच नाहीये आता. मीरा दिसते सुंदर हाच काय तो आडव्हांटेज.
जय मध्ये खिलाडू पणा अगदीच कमी वाटतोय.

टीम B डान्स enjoy करत होती तेव्हा उत्कर्ष,जावई, गादा,जय मक्ख चेहऱ्याने बसून होते. मिरा पलटी मास्टर पुन्हा सिद्ध झालं.ती बोललेल कधीच मान्य करत नाही.दादुस बापासारखा आहे म्हणणारा जय मात्र दादुसला आपल्यात घायच नाही म्हणत होता,इथे विशालने जिंकल.रात्री विकास आणि विशालने छान कामे वाटप करून दिली.जय खूप माजोरडा वाटतो.उत्कर्ष पण बऱ्याच लावालाव्या करतो.त्याला सोनालीने भारीच समजावलं.स्नेहाला सांगताना विकास म्हणाला जय लहान भाऊ आहे,त्याला नंतर देऊ चान्स Wink

शिवलीला गेल्यामुळे एक जागा रिकामी झाली आणि या आठवड्यात जाईल न एकजण. अक्षय गेला पाहिजे, तो मौनव्रतात असल्यासारखा वावरतोय आल्या पासून. जय फार गर्विष्ठ वाटतो. कचरा आणि काय काय शब्द वापरतोय. घाबरतात म्हणे आपल्याला, मग बाहेर जायची भीती का वाटते, द्यायची न संधी संतोष आणि तृप्तीला. उलट सगळ्यात जास्त असुरक्षित ए टीमला वाटते आहे म्हणून एवढा थयथयाट. मांजरेकर बोलल्यामुळे सगळे अडून बसले होते कॅप्टनशिपसाठी. मीरा खरंच म्हातारी वाटते. काहीच ग्लो नाही चेहऱ्यावर. स्नेहाने त्या एका माणसासाठी प्रयत्न केले Wink

काल डान्स ऑफ मधे मजा आली. मला तृप्ती आणि मीराचा धाकड परफॉर्मन्स आवडला Happy दादुस ने वोट फिरवून जय च्या कॅप्टनशिप चा पत्ता कट केला त्याची फार मज्जा वाटली. बाकीचे लोक त्याला गृहित धरुन चालले होते. कुणास ठाउक कुठल्या बेसिस वर!
नंतर स्नेहा त्याला जाब विचारत होती जय ला वोट का नाही केले म्हणुन, अरे संबंध काय. दादुस ने बोलायला हवे होते माझे मत माझा चॉइस.
मत न दिलेल्यांबद्दल जय ने चिडून बडबड केली. विशालने मात्र सहज अ‍ॅक्सेप्ट केले. अर्थात या ड्राम्याचे क्रेडीट बिबॉ ला आहे, त्यांनी बरोब्बर जोड्या पाडल्या होत्या Happy
जय म्हणत होता आपला ग्रुप स्ट्रॉम्ग आहे आणि सगळे घाबरतात आपल्याला. काहीही Happy तृप्ती आता अ‍ॅटिट्यूड दाखवत आहे. गुड फॉर हर.. सुरेखा मात्र डोक्यात जाते आहे. उत्कर्ष पण जे काही बोलेल ते निगेटिवच असते.

दादुस ने बोलायला हवे होते माझे मत माझा चॉइस.>>+१ नंतर दादूस त्यांच्यात बसायला आले तेव्हा त्या लोकांनी ठरवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
विशाल आणि सोनाली हसत-खेळत किचन ड्युटी कराण्याबद्दल बोलत असताना लगेच मीराने (आधी नाही करणार असे ठरवूनही) आम्ही करतो म्हणून पलटी मारली.

मज्जा आली काल डान्स मधे, विशालनी प्रत्येक परफॉरमन्स किती मस्त शिट्ट्या मारत एन्जॉय केला, जय वाकडं तोंड घेऊन बसला होता !
जयने दादुस विषयी जे काही स्टेटमेन्ट केलं, अजुनच निगेटिव्ह झाला तो आणि त्याचा गृप !
Btw आजच्या चावडीच्या प्रोमो मधे म.मां नी जयला , स्नेहा आणि सुरेखाला जे सुनावलय ऐकून दिल गार्डन गार्डन झालं आहे ऑलरेडी Wink

<< मिरा पलटी मास्टर पुन्हा सिद्ध झालं.ती बोललेल कधीच मान्य करत नाही.दादुस बापासारखा आहे म्हणणारा जय मात्र दादुसला आपल्यात घायच नाही म्हणत होता,इथे विशालने जिंकल.<< हे आणि

<<<नंतर स्नेहा त्याला जाब विचारत होती जय ला वोट का नाही केले म्हणुन, अरे संबंध काय. दादुस ने बोलायला हवे होते माझे मत माझा चॉइस.
मत न दिलेल्यांबद्दल जय ने चिडून बडबड केली. विशालने मात्र सहज अ‍ॅक्सेप्ट केले. अर्थात या ड्राम्याचे क्रेडीट बिबॉ ला आहे, त्यांनी बरोब्बर जोड्या पाडल्या होत्या Happy
जय म्हणत होता आपला ग्रुप स्ट्रॉम्ग आहे आणि सगळे घाबरतात आपल्याला. काहीही<<<
हे सगळं बिबॉ तसच्या तस बोलले! Lol
बिबॉ या सगळ्यांना २४ तास पाहण्याच्या भानगडीतच पडत नसतील, इथे येऊन इथले प्रतिसाद वाचूनच तिथं बोलत असतील अस वाटायला लागलंय! Biggrin

मीराला ती स्वतः:च काय काय बोलून नाकारते त्याचे व्हिडियो दाखवायला हवेत. पण मग अख्खा शनिवार तिच्यावरच जाईल.

जयमध्ये थोडी शिवानी दिसतेय. आपल्या चुकांबद्दल थोडाही रिग्रेट नसणं.

आदर्शने बाहेर आवाज उठवल्याने उत्कर्षमध्ये सौम्य झाले की काय?

विशाल आणि स्नेहा सेफ.

ममां ते लव्ह सॉंग नक्की जय स्नेहासाठी गात होते का,कारण सदस्यांना पण ते कळल नाही.
टीम ए मधल्या तुपारे,जय आणि उत्कर्षला विशाल सोनालीसाठी असाव अस वाटल.
पण कँमेरा स्नेहावर होता.
स्नेहाला झापल पास्टवरून पर्सनल बोलण्यासाठी ,ते छान.ममांना फुल मार्क्स
जयला अँरोगन्सवरून बोलले ते पण छान.
मीराला बोलून काही उपयोग नाही.
पण सोनालीची मीराबद्दलची चुगली मात्र नाही आवडली.सोनाली कधीकधी मूर्खासारख बोलते.आणि हिने असे किती लीड रोल केले आहेत की ती मीराला म्हणत आहे की आधी लीड कर आणि मग माज कर.
उलट त्या पागल ओमस्वीटूपेक्षा त्या येऊ कशी मध्ये मला मोमोच म्हणजे मीराच आवडली होती.
विकासने चुगलीला उत्तर छान दिले.
एकंदरीत ममां चावडी छान जमवत आहेत अजूनपर्यंततरी.अजिबात पार्शिलिटी नाही,असे कसे सुधारले?

सुरेखा 40 वर्षे वय आहे??? मला एवढी तरुण वाटत नाही, पन्नास असेल, महाश्वेता सिरीयलमधे होती, तेव्हा विशीत असेल असं मानलं (इतकी लहान वाटत नव्हती, तरी धरुया) तरी त्याला पंचवीस वर्ष झाली बहुतेक.

जय हवेत असतो, ममानी शाळा घेतली तरी ब्रेक मधे म्हणत होता की चान्गला खेळतो म्हटल ना मग झाल तर, अजिबात खेद ना खन्त
त्याला एकदा झटका देवुन दरवाजाजवळ नेवुन आणाव ( सलमान करायच अस)
मुलिमधे कुणाचच ड्रेसीन्ग फार खास नसत, मेघा,सई(कधीकधी) ,स्मिता सगळ्यात छान तयार होवुन बसायच्या.
या सगळ्या हळदिकुन्कुला आल्यासारख्या जरिच्या साड्या काय नेसतात? मस्त डिझायनर साड्या,ड्रेसेस घालावे.

मीरा बोललेलं कधीच मान्य करत नाही. काय प्रॉब्लेम आहे नक्की तिचा. विस्मरण होतं का तिला ? धडधडीत नाकारत असते, मी नाहीच बोलले म्हणून... तिला पुढच्या वेळीपासून खरच व्हिडीओ दाखवावेत.
काल सुरेखा ला पण आठवत नव्हतं की ती सोनाली बद्दल नक्की काय बोलली पोळ्यांच्या वादात ते. मांजरेकरांनी आठवण करून दिली तेव्हा ती confuse झाली की खरच आपण असं बोललो का . पण लगेच माफी पण मागितली.
मीरा ते पण नाही करत. तिने अलर्ट राहून डायलॉग मारले पाहिजेत नाहीतर तिला नेहेमी च शिव्या बसणार.
जय अजिबात च आवडत नाहीये. त्याचा माज संपतच नाही. असे लोक फेमस होतात पण जिंकत नाहीत. त्याउलट विशाल ने दोन्ही टीम च्या लोकांना छान जिंकून घेतलं आहे. त्याच्याबद्दल चांगलं मत आहे सगळ्यांच.
सोनाली पण आवडते मला. सिरिअस वातावरण असेल तर काहीतरी गमतीशीर बोलून एकदम ताण हलका करते ती. मनाने मोकळी आहे. विशाल आणि सोनाली love story बघायला मला आवडेल. Happy
मीनल पण फेअर खेळते. खेळात पंगे घेते पण नंतर जास्त उलटसुलट बोलत नाही कोणाला.
विकास , विशाल, सोनाली , मीनल शेवटपर्यंत गेलेले बघायला मला आवडेल.

Pages