प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

उंचावरून काढलेली छायाचित्रे

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

ग्रीनलँडवरचं मानवस्पर्श विरहित, प्रदुषण विरहित असं हे टरक्वाईन ब्ल्यु तळं असावं न? अन सोबत हिरव्याचा मागमूस नसणारे खडकाळ डोंगर!
IMG_20210919_000915.jpg

सुंदर फोटो!
अनु, मस्तच आहे फोटो. इंद्रधनुष्यही दिसतंय.

Hongkong

IMG_20210919_095816.jpg

मस्तच आहेत सगळेच फोटो.
हा लंडन आय मधून घेतलेला बिग बेन घड्याळ, पालमेंट इमारत, टेम्स वरचा मला वाटतय वेस्ट मिनस्टर पूल वैगेरे

. CIMG0424~2_0.JPG

शुभ्र पांढऱ्या बर्फानी
काळ्या भोर दगडावरी
तालिबानी अंमल चढला
हात नका लावू आता
अफगाणिस्तानाला Wink
IMG_20210919_001236.jpg

सगळे फोटो मस्त! अनु यांच्या फोटोतले इंद्रधनुष्य वावे यांनी सांगण्यापूर्वी लक्षात आले नव्हते. मस्तच.

khidki.jpg

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे

सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती

झुळकन्‌ सुळकन्‌ इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती

पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडिल तो सोन्याचा गोळा

कवीवर्य भा रा तांबे

rr38 <<< मस्त. हा व्ह्यू पहिल्यांदाच पाहिला. भारी आहे.
BLACKCAT <<< तुमच्या फोटोतून अगदी वेगळाच मूड समोर आल्यासारखे वाटते. कविताही मस्त!

अवल, धन्यवाद.

---------------------

आज सायंकाळी खिडकीतून अगदी अनपेक्षितपणे चक्क इंद्रधनुष्याचा लाभ झाला!
rainbow1.jpeg

IMG_4832.JPG
विमानातून दिसणारा कॅनकुन चा व्ह्यू.

rr38 - अफाट!!!
मामी - मस्त
गजानन - फोटो आवडले.
मै, ब्लॅककॅट - छान.

हा फार ऊंचावरून नाही. पण घराच्या बाल्कनीतून काढलेला फोटो. समोर ईतके निळे आकाश रोज रोज नाही दिसत. एक सीजन असतो. त्यामुळे लॅपटॉपवर वॉलपेपर म्हणून लावायला फोटो काढला.

1632075467755.jpg

Pages