शशक पूर्ण करा - दोस्ता - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 16 September, 2021 - 07:25

’काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो आणि समुद्राची विव्हळ गाज अजून स्पष्ट साद घालते. सहन होत नाही. आता निघावंच लागेल.’

अश्विनच्या डायरीतल्या या शेवटच्या नोंदीवरून पोलिस संपूर्ण समुद्रकिनारे पिंजून काढताहेत.

मंदार पोलिसांना जबाब देत होता. - ”३ दिवसांपूर्वी अश्विन माझ्या ऑफिसला आलेला. अस्ताव्यस्त. जिवलग मित्र पण त्याचा अवतार बघून मी घाबरलो. मी टाळलं त्याला. कामात आहे नंतर भेटू म्हणालो. तो गेला....”
”परत भेटलास ना? अं?” - आश्विनचा बाप त्याला विनवत होता...
त्या म्हातार्‍याच्या डोळ्यांतल्या समुद्रात मंदारला अश्विन सापडला. जाब विचारणारा.

’एका कटिंगपुरतंच भेटतास दोस्ता.’

Group content visibility: 
Use group defaults

मस्त.

धन्यवाद!

वंदना, तुमच्या विनंतीला मान दिलाय बघा. Happy

Sad म्हातार्‍याच्या डोळ्यांतल्या समुद्रात मंदारला अश्विन सापडला --- श्वास अडकला एक सेकंद..
प्रभावी जमलीये.. समुद्राचा आवाज जाणवला..

माफ करा पण.....
शेवटच्या वाक्यात भेटतास दोस्ता ही वाक्यरचना बरोबर
आहे का ?
कारण मला क्लिकचं होत नाही काय म्हणायचं आहे ते

भेटतोस, दोस्ताला अस काही आहे का ते ?

भेटतास म्हणजे जर भेटला असतास पण शब्दांची मर्यादा असल्याने त्यांनी भेटतास लिहीले आहे जे की व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.

ओके धन्यवाद Happy
पहिल्यांदाच ऐकला / वाचला असा शब्दप्रयोग म्हणून जरा गडबडलो Happy