शशक पूर्ण करा - मंगलमूर्ती - नानबा

Submitted by नानबा on 16 September, 2021 - 00:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

गधडे! झोपून काय राहिलीस - तो यायची वेळ झालीये ना आता ? तिचा आवाज!
भराभरा तोंडावर मारलेले पाण्याचे हाबके , बदललेले कपडे ...

लाईट लाव ना ... अजून पेंगतेच आहेस वाटतं!
झांजा घे जा कपाटातल्या... मन्या तू घंटा घे. अरेच्च्या ताट आणि वस्त्र इथेच तर ठेवलेलं..

धांदल नुसती! हे घेतलं का, ते काढून ठेवलं का...

सजावट भन्नाट झालीये ह्या वर्षी (ही :)) !
आता तो आला की सगळ कसं मंगलमय होईल!
सगळी मरगळ, हुरहुर पळून गेलीये!

सगळीकडे आता दहा दिवस एकच घोष - "गणपती बाप्पा - मोरया!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त _/\_
पहिल्याच दिवशी लिहायला हवे होते हे.. घरचे गणपती गेले आमचे आता Sad

>>>>>>सगळी मरगळ, हुरहुर पळून गेलीये!
करेक्ट विशेषतः या पानगळ ऋतु म्हणजे ऋतुबदलाच्या या काळात प्रचंड मरगळ येते. माझ्या तर कित्येक नोकर्‍या (नोकरी? अनेकवचन) या काळातच फिसकटल्या आहेत. एकदा सॅक झालेले आहे. या काळात व्यायाम केला नाही ना की दे माय धरणी ठाय असा डार्क मूड होउन जातो Sad

असो तर सांगायचा मुद्दा हा की गणपती बाप्पाचे आगमन फार आवश्यक असते या दिवसातच.

पहिल्याच दिवशी लिहायला हवे होते हे.. घरचे गणपती गेले आमचे आता Sad
>> हो ना.. प्लॉट्स तयार होते , पण आवश्यक वेळ मिळत नव्हता..