गौराई आणि महालक्ष्मी

Submitted by मुक्ता.... on 13 September, 2021 - 03:10

आत्ता बातम्या बघत होते. ठिकठिकाणी असलेल्या बाप्पांचे मनोरम देखावे आणि गौराई च्या आगमनासाठी असलेली सजावट पाहून मन प्रसन्न झाले अगदी.

वाशीम जिल्ह्यात महालक्ष्मीचे आगमन अशी बातमी पाहिली. गणेशोत्सव म्हणजे गौराई माहीत आहे पण महालक्ष्मीचे आगमन असते ही वेगळी माहिती आहे, यावर कुणी अधिक प्रकाश टाकू शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माफ करा , हा वेगळा विषय आहे पण एक प्रश्न विचारायचा होता, मी रीतिरिवाज या पानावर पण शेअर केला आहे ,या धाग्यावर परत विचारते.. गौरी कोणी बसवाव्या? आणि त्यामागचा हेतू नक्की काय हे कोणी सांगू शकेल का?.... मी असं ऐकलंय, मुलगी झाली की गौरी बसवतात... काही ठिकाणी एक मुलगी असेल तर एक गौरी अस गणित आहे. माझी आई २ गौरी बसवते आणि घरात मी एकटीच मुलगी आहे. माझी गौरी बसवायची खूप इच्छा आहे. आता मला मुलगा झालाय तर मी गौरी बसवू शकते की नाही?
अजुन एक माझ्या सासरी गौरी बसत नाहीत, हा मुद्दा पण विचारात घ्यावा लागेल का?
कोणी यावर प्रकाश टाकू शकेल का?

@nisarga - manat aala tar basavun rikam vhayach.

@heera amh pakke deshavarache. amachyakade gaurach asate.
pashchim maharashtra ani kokan hya thikani mahalakshmi aikalay.

@mukta - gaur mahervashin ani mahalakshmi sasurvashin asahi ek twist aikalay

gaur mhanaje parvati ani gaur mhanaje ganapatichi bahin hyavarahi pravad aikalet.

आमच्या विदर्भात महालक्ष्मी म्हणतात. त्या पण दोन असतात जेष्ठा कनिष्ठा.. जावा असतात असं मानतात.
सोबत त्यांची मुले पण असतात किमान दोन.. अशीच चार मुर्त्या किमान असतात.. उभ्या.
इकडे असं ऐकलंय की काही जणांकडे कि सुन आली घरी की महालक्ष्मी बसवायला सुरू करु शकतात.

एकाच आदिमायेची वेगवेगळी रूपे आहेत ती. कोंकणात (आणि मुंबई हा कोकणाचा भाग असल्याने मुंबईतही) गौरी ही गणेशाची आई मानली जाते. दीड दिवसाचा गणपती असला तर तृतीयेला पाणवठ्यावरची थोडी माती, सात खडे, आणि हळद व तिरड्याची रोपे त्या खळग्यात ठेवून तिथे त्यांची छोटीशी पूजा करतात. मग मौन धरून हे सर्व धातूच्या सटात घेतात आणि त्याला वस्त्र पांघरून मागे न बघता मौनातच घरी आणतात. कोणी कोणी झांजा वगैरे वाजवीत आणतात. दरवाज्यावर गौरीला आणि आणणारणीला हळद कुंकू वाहून पाणी/ तांदूळ उतरवतात. मग ओवाळतात. तोपर्यंत कोणीतरी घरात देव्हाऱ्यापर्यंत हळदीची पावले रेखते. त्यांवर पाऊल ठेवीत गौरीला स्थानावर आणून स्थानापन्न केले जाते.
यंदा कोंकणात vloggers चे तुफान पीक आले आहे आणि सुंदर सुंदर व्हिडिओज प्रसारित झाले आहेत. गणपती उत्सवाचा सगळा कार्यक्रम, रीतीभाती, मौजमजा, फुगड्या वगैरे सगळे तपशीलवार चित्रित केले आहे.
हे वर लिहिलेले ज्ञान मला त्यातूनच मिळाले.
संधी आणि वेळ मिळाला तर तुम्हीही बघा. मला एका मोठ्या टापूतली अकृत्रिमता, साधेपणा आणि संस्कृती कळण्यास मदत झाली.

मस्त माहिती हिरा. आम्ही कोकणातलेच, खड्याच्या गौरी आणणारे, आम्ही गौरीला बहीण मानतो. आईचा सण हरतालिका. बहीण माहेरी येते अस मानतो (माहेरवाशीण गौरी) .

आमच्याकडे पाच खडे पाणवठयावरून आणतात आणि आणणारीने तोंडात पाण्याची चूळ धरायची असते.