शशक पूर्ण करा - एका सुपरस्टारचा जन्म- च्रप्स

Submitted by च्रप्स on 11 September, 2021 - 17:20

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

एक आवाज- डोळे उघड, विचार करत असशील की आता रेल्वेस्टेशन वर होतो परत खोलीत कसा?मी तुला तिकडून इकडे टेलिपोर्ट केले आहे, हताश होऊन त्या ट्रेनने अलाहाबाद परत गेलास, तुझे पुढचे आयुष्य एका छोट्याश्या फॅक्टरी मध्ये कारकुनीत घालवण्यात आहे, छंद म्हणून थोडीफार नाटक करशील पण तुझ्यामुळे आपली पुढची पिढी साधारण आयुष्य जगेल जर येणारा कॉल हुकवलास तर. चलतो मी...

फोन वाजतो- हॅलो मेहरा बोलतोय, कबसे फोन कर रहा हू... हिरो बनेगा, मेरी अगली पिच्चर का? नाम है जंजिर !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा च्रप्स
फक्त सुपर्रस्टार चुकीचा निवडलात
तो निवडला असता तर धाग्यावर तासाभरात बारा पंधरा प्रतिसाद असते Wink

छान

पहिले आणि शेवटचे.. ते 100 शब्द मोजून मोजून कोणते शब्द डिलीट करावे विचार करून करून डोके दुखायला लागले... Happy

Solid! खूप छान.

इतके दिवस निव्वळ प्रतिसादक राहण्यातली मजा भरपूर घेतली . लेख लिहील्यावर प्रतिसादकळा सुरू होतात. त्याचं दु:खंही अनुभवता येईल. प्रत्येकाला दिलेले प्रतिसाद पाहता चाहत्यांची संख्या १७९ + असायला हवी होती खरे तर. असूद्या नसली तर. होईल हळू हळू. ( शब्द मोजायचा सराव करत होतो).

छान.

छान

हा नंबर कसा कालक्युलेट केला... >> कॅल्कुलेट नाही केला त्यांनी. ऋन्मेषच्या चाहत्यांची संख्या आहे ती.

छान...
पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला...!

मस्त कल्पना.

प्रत्येकाला दिलेले प्रतिसाद पाहता चाहत्यांची संख्या १७९ + असायला हवी>>>>
हाहा..

हा नंबर कसा कालक्युलेट केला... >> कॅल्कुलेट नाही केला त्यांनी. ऋन्मेषच्या चाहत्यांची संख्या आहे ती.
>>>>>
हो, तो आकडा बरोबर मॅच आहे.. पण च्यायला मी कुठून आलो यात Uhoh