शशक पूर्ण करा - तू हैं तो I will be alright - रीया

Submitted by रीया on 11 September, 2021 - 15:33

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..समोर ती दिसते.
मी भावनातिरेकाने तिच्या कुशीत शिरते. तिला विचारते - 'कुठे असतेस गं आई, मला गरज असते तेंव्हा कुठे जातेस? मला खरंच वाटलं या अंधारात एकटीच चाचपडणार मी'....
ती किंचित हसते, डोक्यावर हात ठेवून म्हणते "देहाचा दरवाजा उघडलास तेंव्हा सगुणातली मी दिसले, मनाचा उघडशील तेंव्हा समजेल की मी तुझ्या अंतरातच आहे, मग कसला अंधार आणि कशाचं एकटेपण?"
मी समाधानाने डोळ्यांतून ओघळणारं टपटप पाणी पुसते....पुन्हा डोळे बंद करून घेते.... केवळ तिला अनुभवण्यासाठी... तिच्या असण्याची जाणीव खोल आतवर रुजवण्यासाठी!!
___/\___

_______________________________________

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

_/\_

भावूक....

छान!

धन्यवाद तुम्हा दोघांना सुद्धा!

सामो, तुमची अध्यात्मिक लेव्हल माझ्यापेक्षा खूप अति जास्त उच्च आहे. पण तरीही मला लिहिताना जे वाटलं होतं तेच तुम्हाला वाटत असणार याची मला खात्री आहे <3