स्वतःशी पाहिजे आहेस तू बोलायला

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 September, 2021 - 19:55

*स्वतःशी पाहिजे आहेस तू बोलायला*

हवेशी मारल्या गप्पा हवेमध्येच विरल्या
नभाशी साधला सवांद सारा व्यर्थ गेला
निखळ नाते तुझ्याशी तू पुन्हा जोडायला
स्वतःशी पाहिजे आहेस तू बोलायला

स्मृतींचा सूर घुमता अंग होते बासरी
मनाचा मोर हा... पडता कटाक्षांच्या सरी
थिरकत्या जाणिवांमध्ये पुन्हा थिरकायला
स्वतःशी पाहिजे आहेस तू बोलायला

स्वतःशी पाहिजे आहेस तू बोलायला

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users