शशक पूर्ण करा - हुरहूर - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 17:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... अश्या परिस्थितीत तो दचकून उभा राहिला, तेवढ्यात जोरात त्याच्या मुस्काटीत मारून हॉटेलचा मालक खेकसला, "एः @#$&! तुमकू क्या इदर बैठनेकू लाया क्या? अंदर आर्डर लेने तेरा बाप जायेगा क्या?" ते कळायलाच त्याला पाच सेकंद लागले. आलेल्या झिणझिण्यांतून तो सावरला. डोळे वटारून बघत असलेल्या मालकाकडे भेदरून बघत कसाबसा भेलकांडत पळत गेला. डोळ्यांतून मुके अश्रू वाहत होते. आईबापाविना असलेल्या बारा तेरा वर्षाच्या त्या गरीब पोराची अनामिक हुरहूर तो बघत असलेल्या त्या काळोख्या गल्लीतल्या भिंतीवर चिटकलेल्या दिपीका पदुकोणला थोडीच कळणार होती?

Group content visibility: 
Use group defaults

छान.
शेवटच्या वाक्यातला कर्ता कोण आहे हे आधी समजत न्हवतं. थोडा अंदाज बांधल्यावर मग ही जीएंची स्टाईल आहे की काय वाटलं.
शशक आवडली.

बारा तेरा वर्षाच्या त्या गरीब पोराची अनामिक हुरहूर तो बघत होता त्या काळोख्या गल्लीतल्या भिंतीवर चिटकलेल्या दिपीका पदुकोणला थोडीच कळणार होती?

- हुरहूर नंतर स्वल्पविराम हवा. नाहीतर कळत नाहीये. आणि तो बघत असलेल्या अशी वाक्यरचना हवी - असे मला वाटते.

धन्यवाद अमित. आजकाल जीएंचं साहित्य पुन्हा वाचतो आहे खरा.

सामो, 'असलेल्या' केलं आहे. तशी झोपेतच कथा लिहिली जरा. Happy