विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास - सामो

Submitted by सामो on 10 September, 2021 - 15:53

नमस्कार, मायबोली २४ तास मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या अशा आहेत.

(१) 'पुण्यामधील दुकाने दुपारी १-४ या वेळेत बंद न ठेवण्याचा' मुख्यमंत्र्यांचा आदेश.
- या आदेशामुळे, पुणेकर विक्री संघटनेत हाहाकार माजला असून संघटनेचे अध्यक्ष स.दा.दुर्मुख लेले यांनी आदेशाविरुद्ध आंदोलन केले जाइल अशी धमकी दिलेली आहे.
- पुण्यातील ग्राहकांना मात्र या आदेशामुळे हर्षवायु होउन, अनेक ग्राहकांवर तातडीचे उपचार ससून रुग्णालयात चालू आहेत.
- या आदेशामुळे पुण्याच्या आदर्श अशा 'आमचे ध्येय ग्राहकांचा असंतोष' या परंपरेस बट्टा लागणार असून 'मुख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा अग्रलेख केसरी वृत्तपत्रात लिहून आलेला आहे.
- मात्र १-४ या वेळेत दुकानदार डुलक्या खात कसेबसे दुकान चालवत असतेवेळी, भुरट्या चोरांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे चोरबाजार तेजीत चाललेला आहे.

(२) मुंबईकरांना इंग्रजी शब्द वापरास बंदी घालण्याचा सनसनाटी फतवा मुख्यमंत्र्यांनी काढलेला असून,
- या फतव्याविरुद्ध शिवाजी पार्कवरती भव्य मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. मूक मोर्चा कारण प्रत्येक वाक्यात एक तरी इंग्रजी शब्द न आला तर मुंबईत फाऊल समजला जातो त्यामुळे एकही मुंबईकर या फतव्यामुळे, बोलू शकत नाहीये.
- मात्र मुंबईकर स्त्रियासुद्धा या फतव्यामुळे, बोलू शकत नसल्याने 'अखिल मुंबई नवरेबुवा सक्षमीकरण' संघटनेमध्ये जल्लोशाचे वातावरण आढळुन आलेले आमच्या निदर्शनास, आलेले आहे.
- एकंदर या फतव्याला विरोध करावा की सपोर्ट समर्थन करावे याबाबत बुचकळ्यात पडल्याने 'अखिल मुंबई नवरेबुवा सक्षमीकरण' संघटनेच्या सदस्यांची 'इकडे आड तर तिकडे विहीर' अशातली गत झालेली आढळुन आलेली आहे.
- या संघटनेच्या सदस्यांपैकी ७% नवविवाहीत सदस्य कसेबसे या फतव्यास सपोर्ट समर्थन करत आहेत. तर उरलेले ९३% सदस्य ज्यांना की लग्न होउन बरीच वर्षे लोटल्यामुळे, स्वत:चे असे कोणतेच मत राहीलेले नसल्याकारणाने, वैचारीक आघाडिवर, कुचकामी झालेले आहेत.

तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. यापुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बातमीत चूक आहे. १-४ या वेळेत भुरटे चोरसुध्दा डुलक्या काढतात.

सपोर्ट (support) = समर्थन

Happy

सपोर्ट खोडून समर्थन हे मला वाक्यात इंग्रजी शब्द नको म्हणून केलेला विनोद वाटलेला आणि गालातल्यागालात हसू आलेलं.
बाकी छान आहे. Happy

Lol छान.

ठीक

Happy

छान.
नागपूर, नाशिक, कोल्हापूर वगैरेंच्या पण बातम्या सांगायच्या की