प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १ - हास्य

Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:52

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे

हास्य

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सीमंतिनी
मला नक्की नाही सांगता येणार !
सर्व भावंडांचा मिळून असा एक चित्रांचा संग्रह आहे.
त्यातून घेतले

ओह..खरंच कि मानव..विसरलेच होते Happy शोधते आता क्लिक केलेले.

६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

IMG_7582 copy.jpg
गाईला घेऊन चाललेले एक मामा. त्यांना विचारलं फोटो काढू का? तर हसून काढा म्हणाले. फोटो दाखवला तसे अजूनच छान हसले, ते मात्र टिपता आलं नाही Happy

थांकु सगळ्यांना
सगळी हास्य भारी गोड Happy
माझ्याकडून अजून एक, खरं तर दोन Wink
एक लेकाचे एक घोडोबाचे Biggrin
IMG_20210910_134401.jpg

मी काढलेला फोटो Wink

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLX3H75v2-nxKXiCGkjjhDk1HnSaSZEl2D7XbSWyjL5EybvaEUsk0CzQKWBV5Z0f-UePMfBOoNZzFFqtXGJUKduy9CeQ8cE_YU7X65kLlJfy7c3E3QdtM7tDnZLpkbFnK2IH09DXhjq5WhXp23YNZ_58Tg=w88-h84-no?authuser=0
-------------------------------------------------------------
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXXdrkPSz6asuFT_CSXwM2Uc4FpRyUoa5f7k7TXvXHKypbvdaDklCwpQsj0KpW2tLPNj7OKD6km4IAYY6t22eRkak0kWqPKxz7Tnrz8ZJ51tWXcJt6zydgbr5hJPfNIL5W7Bz7_Z3nA29D7mf57miuKPg=w236-h327-no?authuser=0

हास्य म्हटले की सर्वात पहिले पोरांचे निरागस हास्यच आठवते
ते हास्य मग आपल्याही चेहऱ्यावर हास्य फुलवते Happy

IMG_20210910_130722.jpg

IMG_20210607_171040_542.jpg
रमा. Happy
माझी लेक.
वारकरी रूपात..

छान विषय! मस्त वाटलं एकेक हास्य प्रचि बघून... लहान मुलं आणि हास्य एकदम फेविकॉल का जोड.. माझाही झब्बू ... लेक ४ महिन्यांचा असताना टोटली बोळकं Lol

IMG_2465.JPG

Pages