मी एक साधासुधा मराठी मध्यमवर्गीय, ज्याच्या कानावर लहानपणापासून शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार, ते आपले काम नाही, हेच आलेले. साहजिकच त्यामुळे मी कायमच त्यापासून चार हात लांबच राहीलो. पण गेल्या काही वर्षांपुर्वी मी शेवटी मार्केट मधे यायचे धाडस केलेच आणि आता माझे हेच मत झाले आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगारच....
आपल्या सारख्यांसाठी, रिटेलर्ससाठी.
आपण ट्रेडिंग करतोय/मार्केट मधे गुंतवणूक करतोय तीच जुगार खेळल्यासारखी. मार्केट मधून पैसे कमावण्यासाठी जेवढे ज्ञान असायला हवे त्यातले १% तरी आपल्याकडे आहे का? आपण मार्केटमधून पैसे कमावू शकू याची शक्यता कितपत आहे?
मार्केट मधे आल्या पासून मी एक गोष्ट सातत्याने ऐकत आहे की फक्त ४ ते ५% लोकच ट्रेडिंग मधे यशस्वी होतात. आपल्या पैकी बर्याच लोकांनी हे ऐकले असेलच. डे ट्रेडिंग तर तसेही बदनामच आहे. पण मी माझ्या ओळखीच्या Buy and Hold करणार्या गुंतवणूकदारांना पण विचारले की त्यांना आज पर्यंत किती वर्षे गुंतवणूक करुन नक्की किती CAGR मिळाला? मला आजपर्यंत एकही सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर भेटला नाही की जो त्याला मिळालेले रिटर्न खात्रीने सांगू शकेल किंवा त्याचे रेकॉर्ड दाखवू शकेल.
माझ्या मते मार्केट मते मोठ्या प्रमाणात survivorship bias आहे. सगळे जण चांगले रिटर्न दिलेल्या स्टॉक्सबद्दल, यशस्वी झालेल्या ट्रेडर्स, गुंतवणूकदारांबद्दल लिहित असतात. ज्याच्याकडे बघून आपल्यासारखे लोक मार्केट मधे पैसे गुंतवत असतात. फार कमी लोक आहेत की जे सामान्य गुंतवणूक दारांना जागृत करण्याचे काम करत असतात. मार्केट मधे असलेल्या रिस्क समजावून सांगत असतात.
नितीन कामथ ने एका लेखात लिहिल्याप्रमाणे तीन वर्षां पेक्षा जास्त कालाव धी मधे फक्त १% टक्के अॅक्टिव्ह ट्रेडर फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त रिटर्न कमावू शकतात. त्यांनीच केलेल्या एका ट्विट नुसार एखाद्या ट्रेडरचा (ब्रोकरेज आणि टॅक्सेसमुळे) ब्रेक ईव्हन पॉईंटच २०% टक्के असतो. म्हणजे ट्रेडरला नफ्यात राहण्यासाठी वर्षाला २०% पेक्षा जास्त रिटर्न कमवणे गरजेचे आहे. आजमितीला भारतात चार साडेचार हजार स्टॉक लिस्टेड आहेत पण मागील दशकात त्यातले फक्त ३०० ते ४०० म्हणजे फक्त १०% स्टॉक्स १०% पेक्षा जास्त CAGR देऊ शकले आहेत. हे सगळे नंबर्स बघितले की जाणीव होत राहते की मार्केट मधून पैसे कमावणे किती अवघड आहे.
मी पाहिलेला एका सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर चा प्रवास बर्यापैकी सारखा आहे. आपण गुगल करुन चांगल्या वेबसाईट्स शोधून त्यावर वाचन करायला सुरुवात करतो, युट्युब चॅनल बघतो, कुठेतरी छोटे मोठे क्लास करतो. त्यातून आपण कँडलस्टिक, चार्ट पॅटर्न, ईंडिकेटर्स शिकतो. त्यात टार्गेट कसे काढायचे, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, रिस्क रिवॉर्ड रेशिओ कसा ठरवायचा हे सगळं शिकतो आणि सुरुवात करतो. नंतर अनेक जण वेगवेगळ्या पद्धती शिकून, अॅडव्हान्स क्लासेस करुन अजून प्रगती करतात. माझा पण प्रवास असाच काहीसा सुरू झाला. फंडामेंटल अॅनेलेसिस करणारे थोड्या वेगळ्या प्रवासातून जातात. फंडामेंटल अॅनेलेसिस चे जास्त ज्ञान नसल्याने जास्त लिहू शकत नाही.
पण मला एक प्रश्न सारखा सतावतो.
कशावरुन हे सगळं खरं आहे? कशावरुन कँडल्स्टीक, चार्ट पॅटर्न, ईंडिकेटर्स, व्हॅल्यू ईन्व्हेस्टिंग वापरुन नफा होतो? मी का यावर विश्वास ठेवावा? कोणी एक सो कॉल्ड यशस्वी ट्रेडर, गुंतवणूकदार सांगतो म्हणून? काय पुरावा की तो खरे बोलत आहे? त्याने सांगितलेले सगळे मी जसेच्या तसे केले तरी मला नफा होईल याची शाश्वती काय? शाश्वती तर जाऊ द्या शक्यता किती आहे ते तरी माहित आहे का? मी दोन मिनिटे खरे मानतो की त्याने ती पद्धत वापरुन पैसे कमावले असतील. पण मार्केट हे कायम बदलत असते, नवनविन गोष्टी घडत असतात. जी गोष्ट मागच्या दहा पंधरा वर्षात घडली ती पुढच्या दहा पंधरा वर्षात पण घडेलच याची शक्यता किती आहे?
एखाद्या प्रकारे गुंतवणूक करुन आपल्याला किती रिटर्न मिळायची शक्यता आहे, किंवा गेला बाजार आपल्याला मागील काही वर्षात किती रिटर्न मिळालेले आहेत, हे माहित नसताना पैसे गुंतवत राहणे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे.
सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर ईतक्या बिनधास्तपणे पैसे घेऊन मार्केट मधे ऊतरत असतात त्याचे कारण कदाचित त्यांची मानसिकतेत असावे. एकतर आपल्यातले फार कमी जण पुर्णवेळ मार्केटला देणारे असतात. आपले ब्रेड अँड बटर त्यावर अवलंबून नसते. शिवाय आपण गुंतवले ली रक्कम ईतकी पण मोठि नसते की ती बुडाल्याने आपल्या गळ्यापर्यंत पाणी येईल. जे उगीच भलत्या रिस्क घेउन जे लिव्हरेज वापरुन आंधळे पणाने FNO, डे ट्रेड मधे पैसे मोठी पोझिशन घेतात त्यांची एक चूक त्यांना कर्जबाजारी करु शकते. पण जे कॅश सेगमेण्ट मधे ट्रेड करतात आणि ते पण डिलिव्हरी बेस्ड त्यांना जरा तरी रिस्क कमी आहे. पैसे गेले तरी त्यामानाने कमी जातात. त्यामुळे कदाचित आपण या बाबतीत फार खोलात जाऊन अभ्यास करत नाही. आपण शेअर मार्केट मधील गुंतवणूकी विषयी ईतके सिरियस नसतो.
असे समजा एखाद्याला थोडीफार रक्कम टाकून लॉटरी काढायची असेल, विमा काढायचा असेल, जुगार खेळायचा असेल तर तो फार खोलात जात नाही. पैसे बुडालेच तरी फार काही बिघडत नाही. पण समजा जर तुम्हाला करोडो रुपये खर्चून विमा कंपनी काढायची असेल, कॅसिनो चालू करायचा असेल तर ? तर किती अभ्यास करायला लागेल याचा विचार करुन पहा. आपण जेव्हा गुंतवणूकीकडे, ट्रेडींग कडे या पद्धतीने पहायला लागतो तेव्हा आपला अॅप्रोच पुर्ण पणे बदलतो. मोठ्या प्लेअर्सचा मार्केट मधला अॅप्रोच आणि आपला अॅप्रोच यामधे हा महत्वाचा फरक आहे. अॅप्रोच एवढाच फरक आपल्या आणि त्यांच्या रिसोर्सेस मधे आहे.
Institutional Investors/ मोठमोठ्या प्लेअर्स कडे आपल्यापेक्षा कैक पटीने हुशार, qualified, Financial market चे ज्ञान असलेले लोक आहेत, अत्यंत हुशार mathematician, statistician आहेत. त्यांच्याकडे कैक वर्षांचा financial instruments चा historical data आहे. त्या डेटाच्या आधारे वेगवेगळे अॅनेलेसिस करुन सेट अप तयार करु शकतील असे अनुभवी लोक आहेत. मार्केट संबंधित प्रत्येक माहिती आपल्या आधी ते अॅक्सेस करु शकतात. एखादा ट्रेड घेण्याआधी आपण केलेला अभ्यास आणि त्यांनी केलेला अभ्यास यात जमिन अस्मानाचा फरक आहे. मोठे प्लेअर्स कोणत्या पद्धतीने ट्रेडींग करतात आणि एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायच्या आधीची त्यांची प्रोसेस काय आहे हे आपण पुढे पाहूच.
वर लिहिल्याप्रमाणे जर एखाद्या प्रकारे गुंतवणूक करुन आपल्याला किती रिटर्न मिळायची शक्यता आहे, किंवा गेला बाजार आपल्याला मागील काही वर्षात किती रिटर्न मिळालेले आहेत, हे माहित नसताना पैसे गुंतवत राहणे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. मोठमोठ्या प्लेअर्सकडे आजमिती पर्यंत जे बेनिफिट होते ते आज आपल्या सारख्या रिटेलर्स साठी उपलब्ध आहेत. टिक डेटा असो की फंडामेंटल डेटा आज आपण तो विकत घेऊ शकतो. अनेक जणांना प्रोग्रॅमिंग लँग्वेज येतात त्या वापरुन वेग्वेगळ्या स्ट्रॅटेजीज बॅकटेस्ट करणे शक्य आहे. Quantitative Analysis शिकून त्या आधारे ट्रेडिंग/ गुंतवणूक करणे हा जास्त सुरक्षित मार्ग आहे. Quantitative Analysis कसा करायचा हे सुद्धा आपण पुढील भागात पाहू.
पण या भागात जाता जाता शेवटी एक छोटेसे ऊदाहरण घेऊ.
समजा तुमच्या समोर दोन व्यक्ती आहेत.
पहिली व्यक्ती म्हणत आहे की मी मागची २५ वर्षे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत आहे. कपड्यांच्या व्यवसायात भरपुर नफा होतो. जीन्स आणि टि शर्ट ची दुकाने कॉलेज च्या आसपास भरपुर चालतात. मुंबईच्या होलसेल मार्केट मधून माल ऊचलायचा आणि पुणे, नाशिक, कोल्हापुर मधे विकायचा. फार छान व्यवसाय आहे.
दुसरी व्यक्ती म्हणत आहे की मी अनेक वर्षे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत आहे. माझ्याकडे गेल्या २० वर्षांचा रेडिमेड कपड्यांच्या विक्रीचा डेटा आहे. गेल्या २० वर्षात रेडिमेड कपडे विकून २९.५८% सरासरी नफा मिळाला आहे. दरवर्षी रेडिमेड कपड्यांची मागणी सरासरी १८% ने वाढत आहे. जी दुकाने कॉलेज पासून १ किमी परिघात आहेत त्यांची विक्री सरासरी पेक्षा ३८.६३% जास्त आहे. दरवर्षी एप्रिल, मे, नोव्हेंबर या तीन महिन्यात विक्रित ४३% घट निदर्शनास आलेली आहे. रेडिमेड कपड्यांची फॅशन त्यातले पॅटर्न साधारण ५ ते ६ वर्षांनी बदलत आहेत.
दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, टॅक्स, पॅटर्न बदलल्यावर लावावा लागणार्या सेल मधले नुकसान हे सर्व वजा केल्यावर १९.१८% सरासरी नफा राहतो. जर एप्रिल, मे मधे सुती कपडे आणि ऑक्टोंबर, नोव्हेंबर मधे सणासुदीला, लग्नांना वापरायचे कपडे विकायला ठेवल्यास ८ ते ९% नफा वाढू शकतो.
या दोन व्यक्तीमधील कोणत्या व्यक्तीने पद्धतशीर अभ्यास केला आहे? तुम्ही कोणाच्या सोबत व्यवसाय केल्यास तुम्हाला नफा व्हायची शक्यता जास्त आहे? तुम्हाला जर रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करायचाच असेल तर तुम्ही कोणाचे मार्गदर्शन घ्याल?
युट्युब वरचे शेअर मार्केट वरचे बहुतांश व्हिडिओ, गल्लोगल्ली चालणारे शेअर मार्केटचे क्लासेस त्यात शिकवणारे गुरु हे पहिल्या प्रकारच्या व्यक्तींसारखे आहेत. मी असे म्हणत नाही की त्यांना ज्ञान नाही, ते यशस्वी नाहित किंवा त्यांनी नफा कमावलेलाच नाही. पण ते जे काही शिकवत आहेत त्याचे बॅकटेस्टेड रिझल्ट, त्याचे प्रॉपर अॅनेलेसिस त्यांना तरी ठाऊक आहे की नाही याविषयी मी साशंक आहे.
आपण जेव्हा जेव्हा मार्केट मधे पैसे गुंतवतो तेव्हा समोर एक आपल्या पेक्षा ज्ञान, माहिती, ईन्फ्रास्ट्रक्चर, कंप्युटींग पॉवर या सर्व बाबतीत आपल्यापेक्षा अतिशय वरचढ, आपल्यापेक्षा मुरलेला असा प्रतिस्पर्धी आहे. आपण जर त्याच्या ईतका अभ्यास करुन मार्केट मधे ऊतरणार नसू तर आपल्यासाठी शेअर मार्केट हा एक जुगारच आहे, सट्टाच आहे.
Quantitative Analysis कसा
Quantitative Analysis कसा करायचा हे सुद्धा आपण पुढील भागात पाहू.
>>>>>
याबद्दल वाचायला आवडेल.
मटका आणि टेक्निकल अ
मटका आणि टेक्निकल अॅनेलेसिसमध्ये साम्य दिसतेय.
गेले तीन चार वर्षे
गेले तीन चार वर्षे ट्रेडिंगमध्ये अनेक प्रयोग करुन झाल्यानंतर सध्या तरी माझे असे मत बनलेले आहे की ट्रेडिंगच करायचे असेल तर BTST बऱ्यापैकी फायदा देते.
लॉंगटर्मसाठी मात्र ब्ल्यू चीप मध्ये किंवा Nifty50 मधल्या निवडक शेअर्समध्ये SIP प्रमाणे गुंतवणूक करणे चांगले
मी एक इन्व्हेस्टर्स क्लब जॉईन
मी एक इन्व्हेस्टर्स क्लब जॉईन केला अलीकडेच, चार महिने झाले. तो क्लबही नवीनच आहे तसा फक्त दोन वर्षे झालीत. गेल्या वर्षी मार्केट क्रॅश मुळे सगळ्यांची दणकून कमाई झाली तेव्हा त्यांचा सध्याचा परतावा जास्त आहे, तो सरासरी वार्षिक परतावा म्हणुन ग्राह्य धरता येणार नाही, या वर्षी पासून पूढे पाहावे लागेल.
त्यात केवळ फंडामेंटल ऍनॅलिसिस वरून value आणि growth स्टॉक्स निवडून इन्व्हेस्ट करतात. काही ETF पण आहेत.
त्यातील मुख्य बाबी म्हणजे:
१. मार्केट खाली वर टाइमिंग न करता इन्व्हेस्ट करणे, ठरल्या तारखेला SIP.
२. १५-२० % कॅश park करून ठेवणे, आणि मोठ्या मार्केट डीप्स opportuinites मध्ये इन्व्हेस्ट करायला वापरणे.
३. मोठ्या मूव्ह मध्ये स्टॉक FA प्रमाणे २५ ते ५०% प्रॉफिट बुक करणे (STCG होत असेल तरी.)
४. वर्षातून एकदा पोर्टफोलिओ बॅलन्स करणे (LTCG त गेल्या वर).
५. मार्केट अनरिझनेबली वर गेले की पोर्टफोलिओ हेज करणे. (इतर माहीत असलेल्या uncertainty वेळीही.)
सध्या हेज केला आहे.
यातून किती परतावा मिळेल, वगैरे साठी काही वर्षे वाट पहावी लागेल. दोन वर्षात दिशा बरोबर आहे की नाही कळेल.
बघु या.
Bt st कसे करता
Bt st कसे करता
राकेश झुंझुंवालाचे निधन
राकेश झुंझुंवालाचे निधन
Pages