सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

आज फार मज्जा आली. सगळे त्या मल्हारला झाप झा झापत होते. पुरता बेअब्रू करून टाकला त्याला. Biggrin
काय तर म्हणे मल्हारच्या घरचे त्या नव्या नवरीला घरी घेऊन जाणार नाहीत तर आम्ही आमच्या घरी घेऊन जातो. पोर वाढवतो. मला तर इथल्या एका धाग्याची आठवण झाली. तो धागा या शिरेलीच्या लेखकांनी वाचलं नाही ना अशी शंका येते.

आज फार मज्जा आली. सगळे त्या मल्हारला झाप झा झापत होते. >>>बघायला पाहिजे. इथे युट्युबवर ६८ भाग दिसत आहेत. म्हणजे वरमायची रडारड चालू आहे आणि जेष्ठ प्रेमी आडून आडून एकमेकांना प्रेमाची कबूली/इशारे देत आहेत इथपर्यंत.

मी धावत पळवत पाहिले काही भाग. ती अश्विनी म्हणालीच , तुझा होणारा नवरा जरा डम्ब आहे.
मीतू जरा overreact च होते. Childish वागत आणि दिसत असले तरीही दोघेही सज्ञान आहेत.

सिरियसली एकेकाला पुढ्यात धरून बडवाव असे तामसी विचार येतात ही सिरीयल बघताना

आता काय 9 महिने झाल्यावर त्यांनी लग्न करायला हवं होतं का
आता का केलं म्हणे
अरे केलं ते कुठंच गेलं

आम्ही लग्नच करणार नाही, लिव्ह इन मध्ये राहतो म्हणले असते तर त्या म्हाताऱ्या प्रेमजोडप्याने काय केलं असतं

लिव इन मध्ये राहणार कुठे. त्यांचेच खायचे वांदे त्यात आणखी ती प्रेमाची निशाणी. आजोबा गाडीतून जाताना चांगले समजावत होते पण मल्हार पडला त्याच्या आईचा मुलगा. सगळे डॉ पाठक यांच्या जीवावर प्रेम करतात. पाठकबाईच्या एन्ट्रीला मला हसूच येते. एखाद्या शेहनशा सारखी येते ती चाकाच्या खुर्चीत बसून. बाकी सौरभ इतका बुटका आहे पण त्याचे कपडे बरे बसले मल्हारला. मल्हारला तो लग्नात कसा दिसणार याची चिंता, लग्न करून राहणार कुठे याची नाही. अश्विनीला पिंट्याबरोबर पळून जाऊन लग्न करायचे होते Lol

मल्हारला तो लग्नात कसा दिसणार याची चिंता, लग्न करून राहणार कुठे याची नाही. >> अगदी अगदी !
सिरियसली एकेकाला पुढ्यात धरून बडवाव असे तामसी विचार येतात ही सिरीयल बघताना>>>+ १००
मधुराचा एकच मुद्दा पटला की मुल होवु द्यायची काय घाई आहे? बाकी आदिमाय मनुबाळाला उथळ म्हणत होत्या पण म्ल्हार बाळ काय आहे मग?
कठिण आहेत सगळेच.
त्या मनुचा रडका चेहरा बघवत नाही अगदी एकदम बेक्कार दिसते तशी. सतत एकच अभिनय करतात मनु-मल्हार.

आताच मूल होउ द्यायची काय घाई आहे हा मुद्दा पटला.

आणि मीरा काय म्हणे तर आत्ता मल्हारने नकार दिला तर आम्ही तिला घरी घेऊन जाऊ आणि हे बाळ वाढवायला मदत करु. तिच्या आईला पटणार आहे का हे? मुळात तिच्या आईने काय काय खपवून घ्यावं हे आईशी काही न बोलता मीरा ठरवणार का? आई थोडी ट्रॅडीशनल, समाजाला भिऊन वागणारी आहे म्हणून तिला म्हातारपणी नस्ते मनस्ताप आणि व्याप करून न घेण्याचा हक्क नाही का? की फक्त मनूचा बाळ वाढवायचा हक्क अबाधित, आणि आईला नेहमीप्रमाणे गृहीत धरलंय?

बरं सगळ्यांची सम्मती होणार आहेच हे कशाच्या जिवावर वाटतं मीराला आणि तिच्या घरच्यांना? मल्हारच्या आईला आणि आजोबांना तो जास्त ओळखतो का मीरा? नाहीच ऐकले मल्हारचे घरातले तर काय करायचं याचं डिस्कशन पण नाही मनूच्या घरी.

आणि लग्न करणारं जोडपं काय घरबिर शोधत नाही, एकही जण निदान काही पार्ट टाइम किंवा वर्क फ्रॉम होम जॉब बघत नाही. आणि मल्हारच्या आईला असं का वाटतं की काहीही करून मल्हारलाच पटवायचं आहे मनूला? एवढा काय ग्रेट आहे तो?

आईला नेहमीप्रमाणे गृहीत धरलंय?

अगदी मनातले, म्हणजे ती आई आहे तर यांचं सगळं पोटात घालून परत माया करणारच असं गृहीत धरलं आहे

आईने सांगायला हवं होतं, मल्हार किंवा मीरा ने आधी चारपैसे कमवावेत आणि मग वंश वाढवावा
आमच्या जीवावर हे पोर वाढवणार हे चालणार नाही

मल्हारच्या आईला असं का वाटतं की काहीही करून मल्हारलाच पटवायचं आहे मनूला? एवढा काय ग्रेट आहे तो?>> पैसेवाला आहे, सुप्रसिद्ध डॉक्टर पाठकाचा नातु आहे वैगरे वैगरे !
मधुराने स्वत: फार लवकर लग्न केल त्यामुळे कशात काही नसताना लग्न वैगरे हा मुद्दा पटण्यासारखा होता पण त्यासाठी मल्हार एव़जी फक्त मनु आणी तिच्या घरच्याना ती जबाबदार धरतेय हे भयकर चुकिच होत वर मनुच्या घरचे पण अगदी सगळ निमुट एकुण घेत होते.
मल्हार-मनु एकदाही अगदी एकदाही लग्न करुन आपण कुठे राहणार? काय करणार याची चर्चा करताना दिसत नाहित फक्त लग्न कस होणार याचीच चिन्ता!!

जाउद्या... एकदाचं लग्न झालं. आता काय ते बघतील सगळे. अश्विनिने जाम कामाला लावलं. यातुन कसा मार्ग काढणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे.

ते पोर आणि यांच्या वर कडी करणारं निपजलं नाही म्हणजे मिळवली... नाहीतर थत्ते बाईंना अजुन डोकेदुखी.

बरंच पुढे गाडा सरकला की!
एक घाव दोन तुकडे करून टाकले अश्विनीने आणि सिनियर प्रेम वीर बघत बसले!

पण लग्न झाल्यामुळे कथानक जरा तरी पुढे सरकलं. नाहीतर आदी मीरा फक्त आडाखे आखत रहाणं, साईड बाय साईड निखिल सानिका यांची लुडबुड हेच सुरु राहीलं असतं.

सानिका फोन न करता का टपकते सगळीकडे. आज तीच म्हणत होती सकाळी क्लिनिकलाही जाऊन आले, काही काम नाही का तिला की आदिला काहीच काम नसतं यावर तिचा विश्वास आहे. आदी आजकाल फार पारोसा दिसतो. तो आणि अमोल पारोसे दिसतात, आदिमाय आणि आदीभगिनी नेहमी टकाटक आणि मल्हारला दोनच टी शर्ट आहेत. मल्हार च्या चेहऱ्यावर नेहमी गोंधळलेले भाव असतात आणि मनू सतत रडत असते. मीरा सतत कोणालातरी ओरडत असते. मीराचे केस खरंच जटा दिसतात. आता बहुतेक आदिबाबा परत अट घालणार की आदी-सानिका लग्न झाले तरच ते मल्हारला घरात घेतील. अश्विनीला सानिका भेटली पाहिजे, मस्त मजा येईल. निखिलला तिने आधीच मीराच्या मागे लावून दिले आहे.

मला असे वाटते की आदी च हा प्रस्ताव ठेवेल
त्याने सानिका शी लग्न करायला हवे असेल तर रडक्या पोरीला नातसून म्हणून स्वीकारलं पाहिजे
अखिल भारतीय त्यागमूर्ती समाज Happy

मोठ्या तोंडाने आज रात्रीपर्यंत तिला घरी आणून दाखवतो अशी पैज मारली आहे तर काहीतरी द्रस्टिक करावं लागेलच

आता बहुतेक आदिबाबा परत अट घालणार की आदी-सानिका लग्न झाले तरच ते मल्हारला घरात घेतील. अश्विनीला सानिका भेटली पाहिजे, मस्त मजा येईल. निखिलला तिने आधीच मीराच्या मागे लावून दिले आहे.
submitted by चंपा on 7 October, 2021-05:41

क्षणभर असे वाटले कि "चंपा" हा आयडी मुग्धा गोडबोलेंचाच आहे कि काय?

मीरा चा कपडेपट बिल्कुल आवडला नाहि. किती विचित्र असतात. एकवेळ ते सहन हो इल पण मनू चा रडका चेहेरा आणि मख्खपणा कमाल आहे

मीराचे कपडे, केस त्यात मु ब चा पोक्त चेहरा, तोच तो अभिनय, रटाळ संवाद फेक सगळंच गंडल आहे एकूणच! उ का तर अलीकडच्या ज्या एक दोन क्लिप्स बघितल्या त्यात अंघोळ सोडाच पण दात घासून तरी आलाय की नाही असं वाटतं!
मधुराचा कपडेपट, अभिनय , वावर छान आहे! लग्नाच्या आधी बाप होऊ घातलेल्या मुलाच्या आईची उद्विग्नता जमली आहे तिला! ती मिताली गोड आहे पण किंचाळते फार मधून मधून Lol

चाललं एकदाचं मनू बाळ सासरी. वाटलं होतं तसा काहीच राडा केला नाही डॉनी. मला हे पटलेलं नाही एव्हडंच म्हणाले ते. उगीच नाही मल्हार एवढा पुचाट आहे. मीराताईची वरात आहे मागून बाळाला सांभाळायला. अश्विनीची फार ईच्छा होती जायची पण तिला बिचारीला कोण विचारतंय. ती गेली असती मीराबरोबर तर मीराचं लग्न लावुनच आली असती आणि एकटी गेली असती तर निदान ठरवून तरी आली असती. मीरा तिथेही माज दाखवणार नक्की.

म्हणजे मला समजलं नाही. मीरा आदीच्या घरी राहणार का आता पण बाळ व्हायला वेळ आहेना मग संगोपन वगैरे, का त्याच्या आई बाबांचे संगोपन करायला जाणार मीरा.

अंजू ती चार दिवसासाठी गेली आहे पाठराखीण म्हणून. बाळ कुठे जन्माला येणार वगैरे काही बोलणं झालं नाही अजून. तशी घरचीच सुईण म्हणजे आदी आहेच तिथे. आता सानिका येणार नेमकी घरी आणि गैरसमज होणार मीराचा आणि सानिकाचा. आदी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी नाही राहिला म्हणजे झालं. चार दिवसांनी शक्यता आहे की तेच मीराला बाहेर काढतील.

आदीबाबा चा विरोध अगदीच फुसका बार निघाला
मला आणि आता तर फुल्ल दाऊत आहे याचं बाहेर काहीतरी चक्कर आहे
कुठल्याही वेळी हे माझं महत्वाचे काम आहे म्हणून गायब होतात
मीरा आणि आदि कडे डॉ असून वेळच वेळ
आणि हे बघा सतत बिझी

Pages