Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37
सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.
या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरेरे किती दळीद्रीपणा चाललाय,
अरेरे किती दळीद्रीपणा चाललाय, बरं झालं बंद आहे आमच्याकडे ही आता. मनु काय, तीचा नवरा काय अन् सासू काय, सगळे एकाच माळेचे मणी आहेत, निर्लज्ज. ही प्रेग्नट आहे हे कळल्यावरच हाकलून दिले नाही ना, त्याची फळं भोगताय आता आई वडील. मला वाटलं होतं मीरा आदीचं लग्न झाल्यावर संपवतील सिरीयल पण हे कुठच्या कुठे नेलीय,,, सगळाच कळस आहे.
या सगळ्या येड्या लोकांना
या सगळ्या येड्या लोकांना कंटाळून आदि आणि मीरा खेड्यात जायला निघतील
खांद्यावर पडशी टाकून कायमचे
आणि बॅकग्राउंड ला गाणे वाजेल
आ अब लौट चले
हो.. कदाचित ते भंडार्याच्या
हो.. कदाचित ते भंडार्याच्या आदिवासी भागात वैद्यकीय मदत करायला जातील अन तिथे शिरेल संपेल.
काय सांगता येत नाही
काय सांगता येत नाही
तिकडे आदीबाबा आणि सानीबाबा यांची फुस लावलेले गुंड येतील
मग निखिल येईल वाचवण्यासाठी पण त्याचा प्लॅन मिराला आदीपासून दूर करण्याचा
मग बालिश कट कारस्थान सुरूच राहतील
नका हो चर्चा करू.... अजून
नका हो चर्चा करू.... अजून निनावं खावी लागतील आपल्याला (निनावे बाईंची मुक्ताफळ म्हणजे निनावं अस सुचलं मला आत्ताच)
निनावं
निनावं
निनावं खावी लागली तर एक वेळ ठिक आहे परंतु मानबा सारखं ते निनावं स्क्रीनवर आलं तर खरंच प्रेक्षकांवर संक्रांत येईल..!!
बर झालं मानबा बघत नव्हते मी
बर झालं मानबा बघत नव्हते मी फारशी
त्या मधुराने आयतोबा मनू आणि
त्या मधुराने आयतोबा मनू आणि मल्हारलाही घेऊन जावं स्वतःचं अस्तित्व शोधायला जाताना. आयत्या बिळावरचे नागोबे कुठले!!!
हे घरचं रामायण सोडलं तर हॉस्पिटलचा व्यवहार इंटरेस्टिंग होईल बघायला. ज्यावेळी सगळे गैरव्यवहार बाहेर येतील, मीराचा उदोउदो होईल, घरच्यांना मीरा ही किती देवमुलगी आहे ह्याचा साक्षात्कार होईल त्याआधी आपण सुडोमि म्हणजे बघणं बंद करावं.
आयत्या बिळावरचे नागोबे कुठले!
आयत्या बिळावरचे नागोबे कुठले!!!
निनावं >>> हाहाहा.
निनावं >>> हाहाहा.
बर झालं मानबा बघत नव्हते मी फारशी >>> सेम पिंच. हीपण बघत नाही, मधेच आठ मिनिटं किंवा प्रोमोज बघून अंदाज येतो.
त्या मधुराने आयतोबा मनू आणि मल्हारलाही घेऊन जावं स्वतःचं अस्तित्व शोधायला जाताना. आयत्या बिळावरचे नागोबे कुठले!!! >>> अगदी अगदी.
ते हॉस्पिटलमधे सानिकाबाबा काय उद्योग करतात, किडन्या वगैरे काढून विकतात की काय पेशंटच्या, आदीबाबापण सामील आहेत का यात. एक शॉट बघितला त्यात आदीच्या पेशंटला वॉर्डबॉय नेत असतो, मीरा बघते बहुतेक. हे असले वाईट उद्योग करायचे असतील तर आदी मीराला का सामावून घेतलं तिथे. त्यांच्यावर घालायला का. हे उद्योग इतक्या वर्षात बाहेर कसे आले नाहीत. संत मीराबाई खणून काढेल ही वाट बघत होते का. आदीला जरा डॅशिंग दाखवा, त्याला सुगावा लागूदे.
तिळगूळ द्यायला मीरा जाते तेव्हा निदान मधुरा तोंडाने तरी सुनावते पण मनु जी काही ताईला झिडकारते ते बघून, मनु दुसरी वैशंपायन होत चाललीय असं वाटतं. मल्हारला तेव्हढा व्हिलनपणा जमत नाहीये.
त्या आदी मीराने मनु मल्हारला काडीची किंमत देऊ नये.
बाय द वे मागे मनुची आई मनुसमोर तिच्या चुकांचा पाढा वाचते, तेव्हा ती काय उत्तर देते, प्रॅक्टीकल विचार करा असं बाबांना वसकन ओरडून सांगत असते, तो शॉट.
हयात म वे मुलीला शोधायला
हयात म वे मुलीला शोधायला बाहेर पडेल तेव्हा वेग येईल, त्यानंतर बघायला हवी. आत्ता तशी बोअर होतेय>> फाइनली तुमची.मुलगी काय करते मध्ये मधुरा वेलणकर ची मुलगी गायब झाली.. कर्जत ला पार्टी असते.. आणि वेलणकर च्या नवर्याला जुगार खेळायला जायचं असत नवी मुंबई ला.. दोघ एकत्र पुण्याला जात आहोत असं खोट सांगून बाहेर पडतात.. हा बाबा मुलीला गाडी तू घेऊन जा सांगतो..ना तिच्या सोबत च्या कोणाचे नम्बर घेत..ना मध्ये फोन करत..सकाळी एकत्र भेटू म्हणुन सांगतो..मुलगी पार्टी ला जाते तिथे गेल्यावर कळत की ही रेव्ह पार्टी आहे..ती निघते.. आणि मागून कोणी ओळखीचाच तिला गायब करतो..
तुमची.मुलगी काय करते आणि
तुमची.मुलगी काय करते आणि कलर्सवरची ' आई- मायेच कवच' दोन्ही सिरियल्सची कथा एकच आहे. काही ट्रॅक्स, पात्रे हेसुद्दा सिमिलर घेतलेत, उदा. मुलीच्या वडिलान्चे विबान्स, आईला मदत करणारा पोलिस ( इथे हरिश दुधाडे, तिथे विजय चव्हाणचा मुलगा) ई.
दोन्ही सिरियल्स आलटून पालटून अधूनमधून बघते. एकेकाळी भगतसिन्गवरती चार पाच हिन्दी चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले होते त्याची आठवण झाली.
मधुरा वेलणकरच्या सिरीयलमधे
मधुरा वेलणकरच्या सिरीयलमधे मला गीतांजली कुलकर्णी (बेडरीडन म्हातारी) आणि विवेक गोरे (शाळेतला शिक्षक मित्र) यांच्या कॅरॅक्टर्सवर संशय येतोय. मी तीन चार मिनिटांचे प्रोमोज बघते, क्वचित आठ मिनीटं बघते. मंत्र्याचा हात असेलच पण मुलीचे बाबा जर त्या मंत्री का आमदारासाठी काम करतात तर पंधरा लाख चिल्लर रक्कम तो देऊ शकत नाही त्यांना.
मधुराच्या आईचा संशय आलेला पण नातीला गायब करणार नाही ती.
ती जमदाडे मस्त काम करते हा.
मधुरा, भार्गवीमधे मधुरा एकदम सहज काम करते. भार्गवी आवडते मला, मधुरा जास्त आवडते पण त्या भार्गवीच्या सिरीयलचे प्रोमोज फार बघितले जात नाही, वरद चव्हाण जीवलगा मधे पण इन्स्पेक्टर होता.
मधुराचे दीर दाखवलेत का, ते कसे आहेत. मला जाऊ दिसली पण दीर नाही दिसले.
तुमची मुलगी.. साठी नवीन धागा
तुमची मुलगी.. साठी नवीन धागा उघडला आहे : https://www.maayboli.com/node/80933
इथे बरसातची चर्चा चालू रहावी
घोर निराशा होतेय बरसात पाहून
घोर निराशा होतेय बरसात पाहून हलली … कपील शरमा वर
शिफट झालोय
शिफट झालोय
तुम्हाला टाईप करायचीही इच्छा
तुम्हाला टाईप करायचीही इच्छा नाही उरली स्वप्नाली तुमची निराशा पोचली.
चंपा
चंपा
भावना पोचल्या तुम्हाला
ही आठ वाजता असते रात्री,
ही आठ वाजता असते रात्री, सोनी हिंदीवर बडे अच्छे लगते है २ पण आठला असते आणि दोघांचे रीपिट टेलिकास्ट नसतात, मी हिंदी बघायची असं ठरवलं आहे, राम प्रिया फार गोड आहेत. त्यांची पुर्वीची एक सिरीयल पण मधे मधे या दोघांसाठी बघितली होती, त्यात आपली सोनाली पंडीत व्हिलन होती. आदित्य पंखुडी असं या दोघांच्या कॅरॅक्टरचं नाव होतं.
कैच्या कै दाखवू लागलेत बरसात
कैच्या कै दाखवू लागलेत बरसात मधे.. ते येडं माजोर्डं मल्हार बाळ ज्याच्याकडे पैसा त्याच्या कंपूत शिरु लागला आहे... ग्यानमुड्याला आई-बाप पण कळेनात त्याची बायको एकपट अन हा दुप्पट..! दोघांचे आई-बाप एकमेकांचं टाळकं धरून बस्लेले....
ते आदी मीरा खोटं खोटं भांडतात
ते आदी मीरा खोटं खोटं भांडतात तो शॉट डोक्यात गेला, त्यामुळे हिंदीच बघुया वर शिक्कामोर्तब केलं.
त्यांची पुर्वीची एक सिरीयल पण
त्यांची पुर्वीची एक सिरीयल पण मधे मधे या दोघांसाठी बघितली होती, त्यात आपली सोनाली पंडीत व्हिलन होती. आदित्य पंखुडी असं या दोघांच्या कॅरॅक्टरचं नाव होतं. >>>>>>>> मानसी साळवीसुद्दा होती त्यात हिरोची आई म्हणून.
फायनली ही सिरियल संपतेय
फायनली ही सिरियल संपतेय बहुतेक, त्यावेळी सुकन्या कुलकर्णी सासू असलेली एक सिरियल येतेय.
https://www.youtube.com/watch?v=jL4lXdMuUPM हा प्रोमो त्याचा.
आजचा भाग भन्नाट होता.... माठक
आजचा भाग भन्नाट होता.... माठक डॉक्टरना मुब ने चांगलंच सुनावलं..! मल्हार आईस पण असंच झमकावलं तिने.. एकाच एपिसोडात हे सासर्याला असं सुनावणं अन नणंदेला झमकावणं खरेच खूप एनर्जी खाऊ काम आहे पण मुबने ते केलं त्याबद्दल तिचे करावे तेवढे कौतुक. आदिमाय ते सुनावणं अन झमकावणं भक्तिभावाने बघत होती. ठोम्या मल्हारबाप स्तिमित झाला होता. मनुबाळ भयाकलं होतं. उका वेड पांघरून पेडगावला जात होता.
उद्या काय होईल ते बघण्याची उत्सुकता आहे... मल्हार आई मुब अन उकाची भांडाफोड करणार असं वाटतंय.
मी ही तो शॉट बघितला,
मी ही तो शॉट बघितला, आदीबाबाना सुनावले तो, मस्त होता.
मी सोनी हिन्दी बघत होते त्यावेळी, तिथे अॅड आल्या की इथे यायचे.
डीजे तुम्ही ताराराणी बघत नाही
डीजे तुम्ही ताराराणी बघत नाही का, त्यावर धागा नाही काढला म्हणून विचारते. मला ती क्वचित पूर्ण बघता येते.
हो ना अन्जू, मलाही नाही पाहता
हो ना अन्जू, मलाही नाही पाहता येत ताराराणी. शनिवारी मी एकदम सगळे एपिसोड बघतो. तसेही प्राईम टाईम व्यतिरिक्तच्या मालिकांचे धागे इथे चालत नाहीत हा अनुभव गाठीशी आहे
चला शेवट गोड झाला आज शेवटच्या
चला शेवट गोड झाला आज शेवटच्या भागात आणि प्रेक्षकांची सुटका
मी आजचा नाही बघितला पण कालचा
मी आजचा नाही बघितला पण कालचा बघितलेला, संपत आली म्हणून ठरवलं दोन भाग बघुया पण आज बाहेर होते, विसरले.
मला असं वाटतंय की मालिकेच्या
मला असं वाटतंय की मालिकेच्या लेखकाची शाळेची परिक्षा सुरु झाली असावी आणि आई वडीलांनी सांगितले असेल बास आता टाईमपास, आणि बघता बघता एकदम गुंडाळून टाकली.
सगळे यशस्वी झाले, शेवट शेवयाच्या खीरीसारखा गोड करून एकदाचा सगळ्यांनी निश्वास टाकला
Pages