काही निश्चय

Submitted by वैभव जगदाळे. on 22 August, 2021 - 22:14

मला शोधायचेत पर्याय तुझ्या आठवांना
माझ्या कवितेच्या तुटपुंज्या प्रतिभेने

मला विरघळवायचेत तुझे पाणीदार डोळे
माझ्या ओसाड डोळ्यांच्या खिन्नतेने

मला दडवायचाय तुझा हसरा चेहरा
माझ्या गर्भगळीत मनाच्या पडद्याने

मला विझवायचीये काळजातली आग
मध्यरात्री भरलेल्या दारूच्या प्याल्याने

मला लिहायच्यात मेंदूला डसणाऱ्या मुंग्या
माझं दुर्दम्य मौन खोडत जाणाऱ्या लेखणीने

मला संपवायचाय हा जीवघेणा प्रवास
मी केलेल्या माझ्याच निर्घृण खुनाने

Group content visibility: 
Use group defaults