ती

Submitted by अमृता रोहिणी प्... on 16 August, 2021 - 14:00

सगळे पुढे निघून गेले
ती मात्र मागेच राहिली
उगाचच रेंगाळत....
सगळे कसे बदलत गेले
ती मात्र तशीच राहिली
साधीसरळ अन स्थितप्रज्ञ....
सगळे कसे व्यवहारी झाले
ती मात्र तशीच राहिली
निर्व्याज, निरपेक्ष....
सगळे अगदी कामात बुडाले
ती मात्र तशीच राहिली
तिला हवं ते करत....
सगळे कसे यशस्वी झाले
ती मात्र जगत राहिली
तिच्याच विश्वात....समाधानात
सगळे रमून गेले भविष्यात
ती मात्र जगत राहिली
प्रत्येक क्षणात....
हळूहळू सगळे bored झाले
तिने फुलविली बाग
तिच्या आवडीच्या फुलांची....
आणि आता........
जातात सगळे त्याच बागेत
Mood fresh करायला
गळून पडलेली फुले वेचायला....
मागे राहिलेल्या तिला आनंदात बघायला
-अमृता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! साधी...
ते bored, mood, fresh ला मराठी शब्द शोधा.
पुलेशु.