झी-मराठी : माझी तुझी रेशिमगाठ

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12

२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्‍याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

परी च्या छोट्या मुलीच्या शरीरात एका मोठ्या मुलीचा आत्मा आहे असे वाटते ती cute दिसते पण वागत बोलत नाही। तिच्यापेक्षा तो पिकाचू आणि ओजस तिचा मित्र छान लहान मुलेच वाटतात .

"पुरूषांचं असच असतं. मोठे बिझिनेस सांभाळतात आणि आपल्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो" हे कालचे एक "जेम". एक स्वतः नोकरी करणारी सिंगल मॉम हे वाक्य म्हणत आहे. म्हणजे नोकरीसारखे काहीतरी. डेस्क वर नुसते बसायचे का होईना.

पूर्ण एपिसोड मधे कुंथून कुंथून एक दोन संवाद म्हणतात त्यातला हा एक. नंतर तो यश हिच्या नकळत मोबाईलवर हिचा फोटो त्याच्या केबिनमधे काढतोय. टोटल क्रीपी. मग बाहेर येउन तिला "इथं नको तिथं जाउ, आडोशाला उभा र्‍हाउ, का? बघत्यात" हे गाणे ऐकवतो. एरव्ही तिकडे यश त्याच्या केबिनमधे उभा राहिला तरी बाहेर सगळे जण हातातील कामे टाकून खाडकन उभे राहतात. आता तो आरामात हॉल मधे फिरतोय आणि पब्लिकला नो फिकिर. म्हणजे बॉस हॉलवे मधे कधी बॉस की हैसियतसे येतो व कधी फ्लर्टिंग की हैसियत असे येतो याचे त्यांना बरोब्बर ज्ञान असावे.

काय खाउन सिरीयल लिहीतात माहीत नाही. मग एक कोणतरी अगम्य मड्डमच आली एकदम. तो ही प्रसंग हास्यास्पद आहे. कोणत्याही प्रसंगाची प्रतिक्रिया १५ मिनीटे द्यायची असा रिवाज दिसतोय. गरिबांची तुपारे आहे ही. तेथे निदान मिटिंग्ज होत, प्रेझेण्टेशन्स होत. इथे काही म्हणजे काहीही होत नाही.

आपली सतिसावित्री गोदी सांडग्याची भाजी करते. दोन फुलके अंग चोरून बसतील एवढ्याशा चपट्या डब्यात भरून ती आणते. त्यातच मग गाव जेवून जातो. आजवर इतकी भारी भाजी म्हणे कोणीच खाल्ली नसते. ती उपाशीच रहाते. आनंदानं.

ती सोशीक, समंजस, प्रामाणिक, धट्टीकट्टी गरीबी मिरवणारी सहनशील आणि चोख काम करणारी कामगार आहै त्या कंपनीतली.

तिच्या मॅनिक्युअर केलेल्या हातात एक हि-याची आणि एक पाचूची अशा दोन गरीब अंगठ्या असतात. केरसुणीसारख्या लांब पापण्या चिकटवून ती कसाबसा दिवस ढकलत असते. तिची लेक शेजारी जेवून खावून फुकट सांभाळतात.

असो....दीर्घ श्वसन करावं झालं. Happy .......

काहीही दाखवतात, कोण ती फॉरेनर आणलीय त्या मित्राने यशसाठी, नेहाला जळवायला. ऑफीसमधे एवढी गळेपडूपणा करते की बास रे बास.

ऑफिसमध्ये बाहेरचा कोणीही माणूस कधीही येऊ शकतो. एखादी फाईल (अजूनही फाईलच) चोरीला जाईल अशी कोणाला भीती वाटत नाही. सुरक्षारक्षक कसला पगार घेतात. मागे त्या मित्राने लिफ्ट मध्येच बंद ठेवायला लावली काही वेळ. किती धोकादायक आहे हे.

फा, +१ सगळ्या पोस्टला.
ती सिम्मी कशीही असो, पण मोजो पण तिच्याशी काहीही वागताना दाखवला आहे. ह्यांची बाजू सत्याची मग ह्यांना कसंही वागायचं लायसन्स असतंय.

त्या palace च्या बाबतीत कोणी एक गोष्ट नोटीस केली का?
त्या palace मधील खोल्यांना काचेची तावदाने असलेले दरवाजे आहेत आणि privacy साठी दरवाज्याच्या 'बाहेरून' पडदे आहेत!!!
म्हणजे खोलीच्या बाहेर उभा असणारा माणूस हलकेच पडदा बाजूला करून काचेतून आत डोकावू शकतो!!!

>>म्हणजे खोलीच्या बाहेर उभा असणारा माणूस हलकेच पडदा बाजूला करून काचेतून आत डोकावू शकतो!!!
लोल!

आणि एखादा प्लॅन दाखवला तर ते तो तडीस नेतील ह्याची काही खात्री नसते. मागे एकदा सिम्मीकाकु त्या यशच्या पार्टीत येण्यासाठी कोणा मुलीला पैसे देते. ड्रिंक अंगावर सांडून मग यशनी काहितरी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यासाठी. पण त्याचं पुढे काहिच होत नाही.
तसंच ते पाळणाघराचं. एक तर एका दिवसात सगळे परवाने, शिक्षक वगैरे कसे मिळाले. आणि सगळा सेट-अप झाल्यावर कोणीही तिथे फिरकत नाही Lol

Lol हो ते पाळणाघर फक्त एकच दिवस परीसाठी चालले नंतर सगळे प्रॉब्लेम तसेच असतानाही परी परत काकाकाकूंकडेच आहे.

म्हणजे खोलीच्या बाहेर उभा असणारा माणूस हलकेच पडदा बाजूला करून काचेतून आत डोकावू शकतो!!! >>>>>>> उदा. सिम्मी.

परवाचा प्राबेचा गुलाबी ड्रेस छान होता.

हो तो गुलाबी ड्रेस बघून ऑफिस (म्हणजे ती वास्तु) खुश झालं असेल, सतत बोअर ड्रेसेस घालून येते ते बघावे लागते ना एरवी.

अब्जपतीचा साखरपुडा चाळीत झाला. त्याआधी अंगठी घरंगळत बेडखाली गेली. गोदी बारीक झाली आहे पण चेहरा अगदीच इतकुसा झालाय तिचा. पारंपरिक काठपदराच्या साडीवर ऑक्सिडाईझ दागिने चांगले दिसत नाहीत हेमावैम. लग्नाच्या प्रोमोत तर ती फारच दागिन्यात बुडून गेलीये. त्याचा बिझनेस आहे म्हणून ही लग्न करतेय का त्याच्याशी. तो एक सॅटिन काका तर फारच बावळट चेहरा करून असतो व भलतीकडेच बघत असतो. दारुड्याची बायको छान आहे दिसायला. मोजोने का सोडली मालिका. छान आजोबा होते ते.

दारुड्याची बायको छान आहे दिसायला. >>> हो, तो ही छान आहे दिसायला. मोठा भाऊही चांगला आहे. simmi च नाहीये दिसायला खास खरंतर.

हळद बघितली मी आज, खरंच पांढरी होती Biggrin इडलीचं पीठ जसं हाताला लागल्यावर सुकतं तसं काहीतरी होतं. नेहाची साडी आंबेहळद रंगाची, अतिशय स्वस्तातली वाटत होती. मला वाटलं फक्त साखरपुडा चाळीत होणारे पण हळदही तिथेच होती आणि संगीतही बहुतेक तिथेच होणार आहे. एकंदरीत सगळा फार लो बजेट मामला आहे. एकट्या परिच्या जीवावर आहे सगळं. तीही मला आता ईतर लहान मुलांसारखी निरागस वाटत नाही, अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटते.

हल्ली बऱ्याच (सगळ्याच) सिरियल मध्ये हळदीचा कार्यक्रम असेल तर त्यातली हळद याच रंगाची असते. मुलतानी माती वगैरे लावतात का काय माहित हळद म्हणून.

तीही मला आता ईतर लहान मुलांसारखी निरागस वाटत नाही, अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटते.>> +१

ते वाटलंच होतं नेहाचा नवरा येईल, सिरियलवाले नवीन ट्रिक वापरतात का कधी.

परीपण लग्नाला ऐनवेळी विरोध करेल वाटलेले. मी उशिरा बघितली. दोन तास कोण वाया घालवणार.

ही सिरियल अजून सुरू आहे, मग मध्येच ते चला हवा देऊया का दाखवत होते बराच वेळ, म्हणून मी कलर्सकडे वळले, बरंच झालं .

Pages